Friday, June 4, 2021

आकर्षक व पसंतीच्या वाहन नोंदणी चिन्हासाठी 07 जून 2021 पर्यंत अर्ज करावे

*आकर्षक व पसंतीच्या वाहन नोंदणी चिन्हासाठी 07 जून 2021 पर्यंत अर्ज करावे*.

पालघर(प्रतिनिधी) दि. 04 : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, वसई येथे परिवहनेत्तर (चारचाकी) संवर्गाकरिता वाहन नोंदणीकरिता सध्या BT ही मालिका सुरु आहे. सदर मालिका दि. 03.06.2021 रोजी पर्यंत संपण्याची शक्यता असल्याने परिवहनेत्तर (चारचाकी) संवर्गाकरिता वाहन नोंदणीसाठी CC ही मालिका सुरू करण्यात येणार आहे.
सदर नवीन मालिकेतील आकर्षक वा पसंतीच्या वाहन नोंदणी चिन्हासाठी दि.07.06.2021 रोजी दुपारी 11.00 वाजेपर्यंत सर्व संबंधितांनी अर्ज सादर करावेत. आकर्षक व पसंती क्रमांकाचे विहित शुल्क आकारून नोंदणी चिन्ह आरक्षित करण्यात येईल. जर एखाद्या नोंदणी चिन्हासाठी एकापेक्षा जास्त अर्जदारांनी अर्ज केले तर दुसऱ्या दिवशी संबंधित अर्जदारांनी आकर्षक व पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या शासकीय शुल्कापोटी पाकीट बंद स्वरूपातील धनाकर्ष या कार्यालयास जमा करावेत. दुसऱ्या दिवशी 4 वाजता सादर केलेले लिफाफे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे समोर उघडले जातील. ज्याचा सर्वाधिक रकमेचा धनाकर्ष असेल त्यांना नोंदणी चिन्ह देण्याची कारवाई करण्यात येईल.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...