वसईतील नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करून, वृद्धाश्रमाला खासदार निधीतून दहा लाखांची मदत जाहीर
खासदार मा. राजेंद्र गावीत
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) तोक्ते चक्रीवादळाने पालघर जिल्ह्यातील समुद्र किनारपट्टीवरील गावांचे अतोनात नुकसान झालेले असल्याने मा. राजेंद्र गावीत साहेब - खासदार यांनी दिनांक २८ मे २०२१ रोजी वसई विभागातील सत्पाळा, नवापूर, अर्नाळा किल्ला, अर्नाळा आदी भागातील नुकसानीची पाहणी आणी आढावा घेत असताना, स्थानिक सरकारी अधिकारी व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सह पाहणी केली.
वसई तालुक्यातील मच्छिमार बांधवांचे झालेले नुकसान,तसेच सत्पाळा जेलडी येथील न्यु लाईफ केअर फाउंडेशन चा वृद्धाश्रम, मदर तेरेसा होम वृद्धाश्रम यांची, वादळी वाऱ्याने केलेल्या नुकसानीची पाहणी करून, वृद्धाश्रमाच्या दुरूस्ती साठी दहा लाखांचा खासदार निधीतून त्वरीत निधी उपल्ब्ध करून देण्यात येईल असे सांगितले. वृध्दश्रमात असलेल्या २९ वृद्धांची आपुलकीने विचारपूस केली. श्रीमती सुमन रणदिवे या शिक्षिकेची आपुलकीने भेट घेतली. कारण त्यांनी घडवलेले विद्यार्थी आज महाराष्ट्र राज्यातील राजकीय शेत्रातील, प्रमुख पदावर विराजमान आहेत. मा. श्री मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब, श्री राज ठाकरे साहेब श्री जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री, असे अनेक मान्यवरांना त्यानी घडविले आहेत.
नुकसानीची पाहणी करताना श्री हरिचंद्र पाटील शिवसेना वसई विधानसभा समन्वयक, श्री पंकज देशमुख आणि सेनेचे पदाधिकारी, श्री तरुण वैती कृषी अधिकारी, मेरी टाईम बोर्डाचे पतन अभियंता, अर्नाळा फिशरमेन सर्वोदय सोसायटी लि. चे पदाधिकारी याच्या सह मा.खासदार साहेब यांनी नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करून अधिकारी वर्गास योग्यता सूचनाही दिल्या, त्या मुळे नुकसानीची मदत मिळण्यासाठी विलंब होऊ नये.
No comments:
Post a Comment