*पालघर जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटासाठी ऑफलाइन नोंदणी करण्याची आमदार श्रीनिवास वनगा यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे मागणी*
पालघर(प्रतिनिधी)
पालघर मतदार संघा सह पालघर जिल्ह्यातील सध्या सुरू असलेले वयोगट १८ ते ४४ या वयोगटातील युवा वर्गाला शासनाकडून देण्यात येणाऱ्या कोविड-१९ या गंभिर आजारावरील लसिकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करून लसिकरण केले जाते.
लसिकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करतांना खुप मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. तसेच पालघर जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार, विक्रमगड, तलासरी, वाडा, डहाणू, पालघर यां ग्रामिण आदिवासी भागात आदिवासी गरीब जनतेकडे स्मार्ट फोन उपलबध नसतात. तसेच ऑनलाईन नोंदणीसाठी नेटवर्क नसल्याने मोठा गोंधळ निर्माण होत आहे. त्यामुळे स्थानिक युवा वर्गाला लसिकरणा पासुन वंचित राहावे लागत आहे. बाहेरील तालुका किंवा जिल्ह्यातील व जवळपासच्या शहरीभागातील युवा, नागरीक लस घेण्यासाठी पालघर, विक्रमगड, डहाणू, तलासरी, वाडा, मोखाडा, जव्हार येथे येत असल्याने स्थानिकांना लसिकरणापासुन वंचित राहावे लागते आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड नाराजी दिसुन येत आहे. बऱ्याच वेळा लसिकरण केंद्रांवर वाद निर्माण होत आहेत.
दरम्यान, पालघर जिल्ह्यातील ग्रामिण आदिवासी भागत लसिकरण ऑफलाईन करण्याबाबत सहानुभूतीपुर्वक विचार व्हावा, तसेच लसिकरणासाठी स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे व १८ ते ४४ वयोगटातील लसिकरण केंद्र पालघर जिल्ह्यात वाढविण्यात यावीत अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे यांच्याकडे पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे.
No comments:
Post a Comment