विश्वास अभियानांर्तगत, एक हात मदतीचा.
सफाळे पो, ठाणे
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) कोविड १९ विषाणूंचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढत असताना, लाॅक डाऊनचा कालावधी वाढत आहे. त्यामुळे, आदिवासी, गोरगरीब, वस्ती, वाड्या, पाड्या मधील लोकांची जीवनावश्यक वस्तू मिळवण्यासाठी त्यांना सफाळे बाजारपेठेत जावे लागते किंवा गांवात चढ्या भावाने वस्तू मिळाल्यातरी नाईलाजाने घ्याव्या लागत आहे. ते ही सर्वाना परवडते असे नाही. वरिल परिस्थितीचा विचार करता, सफाळे पोलीस ठाणे, ता,जि पालघर येथील प्रभारी पोलीस अधिकारी श्री संदीप कहाळे सहा,पो निरीक्षक यांनी " विश्वास अभियानांर्तगत " एक हात मदतीचा.या साठी समाजातील सामाजिक कार्यकर्ते, दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, व्यापारी असोसिएशन यांनी आवाहन केले असताना, या कार्यासाठी अनेकजण प्रतिसाद देत आहे. सफाळे व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी यांनी धान्याचे शंभर किट तयार करून दिनांक ४ मे २०२१ रोजी दारशेत ( ग्रामपंचायत दारशेत-उंबरपाडा ता,जि पालघर ) येथे श्री ललित बाफना व्यापारी असोसिएशन सफाळे अध्यक्ष, श्री मनिष जैन - उपाध्यक्ष श्री जयंती जैन, श्री भारतकुमार जैन सदस्य तसेच श्री संदिप कहाळे सहा,पो उपनिरीक्षक सफाळे, श्री कैलास शेळके - पो. नाईक, श्री महेश शर्मा - पो. ह. श्री ए. व्ही. खोत - पो. नाईक श्री नित्यानंद मोकल पो. काॅन्सटेबल आदींच्या उपस्थितीत दारशेत या आदिवासी पाड्यात मोफत वाटण्यात आले. या प्रसंगी श्री संदिप कहाळे साहेब यांनी लाॅक डाऊन मध्ये ,कोणत्याही प्रकारच्या अफवा आदिवासी पाड्यावर पसरणार नाही. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास पोलिसांना माहिती देण्याबद्दल गांवक-यांना सुचना दिल्या.
या पूर्वीही सफाळे पोलीस ठाणे व्दारा सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते यांच्या संयुक्तपणे उचावली ग्रामपंचायत तांदुळवाडी अंतर्गत, चौकी उंबरपाडा, टेपाचा पाडा येथे जीवनावश्यक वस्तू किट वाटण्यात आले आहेत.
No comments:
Post a Comment