नाशिक येथे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अविनाशजी पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक व सत्कार समारंभ संपन्न.
नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.
नाशिक दि.२९/०५/२०२१ रोजी उत्तर महाराष्ट्र प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे उत्तर महाराष्ट्र आढावा बैठक घेण्यात आली यावेळी नवनिर्वाचित उत्तर महाराष्ट्र प्रमुख अविनाशजी पाटील, तसेच प्रमुख अतिथी उत्तर महाराष्ट्र संघटक पवनजी बोरसे, गुजरात राज्य प्रभारी महेशजी पाटील, नाशिक जिल्हा प्रमुख भुषणजी बोरसे, धुळे जिल्हा प्रमुख रामकृष्ण भाऊ बोरसे , नाशिक तालुका अध्यक्ष दिलीप पाटील आदींच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी उत्तर महाराष्ट्र मध्ये क्षत्रिय मराठा परिवार कसा आपण घरा-घरात पोहचवू शकतो तसेच सामाजिक कार्य कसे योग्य रित्या आपण लोकांपुढे मांडू शकतो. महिलांवर होणारे आत्यचाराला कसा आपण आळा घालू शकतो.त्याप्रमाणेच क्षत्रिय मराठा परिवाराकडून काय नवीन धेय्य धोरणं आयोजित करू शकतो या प्रमुख विषयांवर चर्चा झाली आणि झालेल्या बैठकीत नवनिर्वाचित उत्तर महाराष्ट्र प्रमुख आविनाशजी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. उत्तर महाराष्ट्राचे संघटक पवनजी बोरसे यांचा तसेच गुजरात राज्य प्रभारी महेशजी पाटील यांचा देखील आज सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
No comments:
Post a Comment