*जव्हार शहरातील बँकासमोर अँटीजन तपासणी केंद्र सुरू
पालघर (प्रतिनिधी)दि. १४ : पालघर जिल्हयातील जव्हार सारख्या दुर्गम भागात सद्यस्थितीत कोरोनाचा प्रार्दुभाव कमी होत असला तरी खावटी योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य सुरु असल्याने बँकामध्ये मोठया प्रमाणात गर्दी होत आहे. ही ठिकाणे भविष्यात कोरोना प्रसाराची ठिकाणे होउ नयेत यासाठी जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या मार्गदर्शनाखाली अपर जिल्हाधिकारी . दिलीप गुट्टे यांच्या उपस्थितीत जव्हार शहरातील बँकासमोर आरोग्य विभागामार्फत अँटीजन तपासणी केंद्र सुरू करण्यात आली.
जव्हार शहारातील स्टेट बँक ऑफ इंडिया, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांच्या प्रवेशव्दारावर ही अँटीजन तपासणी केंद्र सुरु करण्यात आली असुन, तपासणी शिवाय बँक ग्राहकांना बँकेत प्रवेश देऊ नये अशा सुचना उपविभागीय अधिकारी संदीप पवार यांनी दिलेल्या आहेत.
अशा स्वरुपाची कोरोंना तपासणी केंद्र उभारल्यामुळे जव्हार सारख्या ग्रामीण भाग कोरोनाचा होणारा प्रसार रोखण्यासाठी चांगली मदत होईल अशी माहिती तहसिलदार संतोष शिंदे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment