दातीवरे येथे दिवसाढवळ्या जबरी चोरी.
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) दिनांक १४ एप्रिल २०२१ हा दिवस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्साह दिवस. या दिवशी केंद्रसरकार, राज्यसरकार यांनी चाकरमान्यांना ( सैन्य व पोलीस विभाग सोडून ) दिलेला आपला हक्काचा सण दिवस. यामुळे प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने त्याचा उपभोग घेत असतो .अनेक कुटूंबातील मंडळी सहपरिवार आपल्या घरांना कुलूपात बंद करून जातात. अश्या बंद घरांचा फायदा घेत अनेक ठिकाणी चोऱ्यांचे प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे.
समुद्र किनारी आणी वनराईने नटलेल्या दातीवरे ( ता,जि पालघर ) गावातील सत्वादेवी मंदिराच्या जवळपास राहणारे रूपेश शिवराम घरत, हे १४ एप्रिल रोजी आपल्या घरातील सर्व मंडळी सह सकाळी सुमारे ११ वाजेनंतर, काही कामानिमित्त बाहेरगावी गेले असताना, या संधिचा फायदा घेत, चोरट्यांनी त्याच्या बंद घराचे कुलुप तोडून, घरातील दागदागिने - रोख रक्कम आदी सह घेऊन गेल्याचे त्यांना, ते संध्याकाळी सुमारे ६ च्या सुमारास घरी परत आले असताना घरांचे कुलूप तोडल्याचे निर्दशनास आले. घरात प्रवेश केल्यानंतर घरातील दागदागिने, रोख रक्कम आढळून न आल्यानंतर केळवा सागरी पोलीस ठाणे येथे धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला.
सदर घटनेत रूपेश घरत यांच्या घरातील एक मंगळसुत्र, चार अंगठ्या, चेन, कानातले सर्व दागिने सोन्याचे तसेच दहा हजार रूपये रोख असे एकूण २,५०,०००-/ रूपये ( अक्षरी दोन लाख पन्नास हजार रूपये ) यांची चोरी झाल्याची तक्रार सागरी पोलीस ठाणे येथे रूपेश घरत यांनी दिली असून सागरी पो, ठाणे केळवा येथे गुन्हा रजि, नं १७ /२०२१ ने व भा, द, सं, क ४५४,३८० या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून ,तपासणी अंमलदार श्री धनगर साहेब, हे श्री भीमसेन गायकवाड साहेब सहा,पो निरीक्षक यांच्या अधिपत्याखाली व वरिष्ठ अधिकारी पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहे.
No comments:
Post a Comment