*डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मित्र फाउंडेशन कडून अनोखा उपक्रम*
*कोविड साहित्याचे केलं वाटप
पालघर (प्रतिनिधी)आज पालघर जिल्ह्यातील पालघर ग्रामीण रुग्णालय मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्त साधून पालघर जिल्ह्यातील कोविड महामारी काळात महत्त्वाची भूमिका पार पाडणारी १०८ रुग्णवाहिका कोविड-१९ व त्यातील कर्मचारी यांच्या सुरक्षितता साठी सामाजिक कार्यकर्ते श्री.निलेश राऊत यांच्या मित्र फाउंडेशन, पालघर या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ९ रुग्णवाहिका व बाईक अंमब्युलन्स साठी २५ लिटर सॅनिटायजर व ५०० मास्क दिवसरात्र काम करणाऱ्या कर्मचारी व दैद्यकिय अधिकारी साठी देण्यात आले, पालघर जिल्हा अति शल्यचिकित्सक डॉ.केळकर, 108 रुग्णवाहिका जिल्हा पर्यवेक्षक श्री.अमित वडे,मित्र फाउंडेशन चे श्री.उचित पाटील,श्री.हरीश वझे,श्री.शेखर पाटेकर तसेच १०८ रुग्णवाहिका चालक रविंद्र राऊत , शैलेश कातारे , विनायक किणी व डॉक्टर डॉ.राजेश राय , डॉ.अल्ताफ मंसुरी , व बाईक अंबुलन्स डॉ.ईश्वर उमतोल आदी उपस्थित होते,
यावेळी जिल्हा अति.शल्य चिकित्सक डॉ.केळकर यांनी श्री निलेश राऊत व त्यांच्या मित्र परिवार यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले तर 108 अम्ब्युलन्स पर्यवेक्षक श्री अमित वडे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment