Tuesday, April 13, 2021

आमदार सुनिल भुसारा यांनी आमदार निधीतून आरोग्य विभागास दिल्या १२ रुग्णवाहिका*


*आमदार सुनिल भुसारा यांनी आमदार निधीतून आरोग्य विभागास दिल्या १२ रुग्णवाहिका*

         जव्हार(प्रतिनिधी)   जव्हार मोखाडा विक्रमगड वाडा या तालुक्यात दुर्गम भाग अधिक असून आरोग्य विभागावर असलेला ताण आणि अपुऱ्या सोयीसुविधा यामुळे रुग्णांना लवकर मदत मिळणे थोडे जिकरीचे होते. परिणामी कधी कधी रुग्णास आपला जीव गमवावा लागतो यामुळे ही अडचण दूर व्हावी व प्रशासनावरील थोडा ताण  हलका व्हावा या हेतूने विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनिल भुसारा यांनी  १२ रुग्णवाहिका आपल्या आमदार निधीतून दिल्या असून त्याचा नुकताच छोटेखानी लोकार्पण सोहळा  जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ निवासी जिल्हाधिकारी किरण  महाजन,नगराध्यक्षा डॉ.उज्वला काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दयानंद सुर्यवंशी इ मान्यवरांच्या हस्ते पालघर येथे झाले आहे. 

 १२ पैकी 9 रुग्णवाहिका या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास देण्यात आल्या त्यात मोखाडा तालुक्यातील आसे, खोडाळा, सुर्यमाळ  जव्हार तालुक्यातील साखरशेत, वावर विक्रमगड  तालुक्यातील तलवाडा , मलवाडा तर  वाडा तालुक्यातील गोर्‍हे, खानिवली या प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात आल्या. तर तीन रुग्णवाहिका जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयास देण्यात  आल्या .त्यात जव्हार उपजिल्हा रुग्णालय, विक्रमगड ग्रामीण रुग्णालय, वाडा ग्रामीण रुग्णालय यांचा समावेश आहे
    या भागात  आजारामुळे मरणाचे प्रमाण शुन्यावर यावे यासाठी माझा प्रयत्न असून माझ्याकडील निधीतून जास्तीत जास्त आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करणार असल्याचे भुसारा यांनी यावेळी सांगितले. 
यावेळी प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
              आमदार सुनील भुसारा यांच्या या कार्याबद्दल जिल्हाधिकारी आणि सर्व प्रशासनाने  त्यांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...