Saturday, April 10, 2021

कोविड लसीकरण केंद्र वाढवण्याची आमदार श्रीनिवास वनगा यांची राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी*

*कोविड लसीकरण केंद्र वाढवण्याची आमदार श्रीनिवास वनगा यांची राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी*

पालघर(प्रतिनिधी)  जागतीक महामारी कोविड-१९ चा सद्या पालघर जिल्ह्यासह राज्यात व देशात मोठ्या प्रमाणात प्रार्दुभाव वाढत आहे. सर्व सामान्य जनता या आजाराने त्रस्त झाली आहे. मा. मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली महाआघाडी शासन सर्वसामान्य जनतेच्या सोबत उभी असुन मोठ्या हिमतीने कोविड-१९ या आजाराशी खंबीर पणे लढत आहे. यामध्ये प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचारी व विषेशता: आरोग्य व पोलिस विभागातील अधिकारी कर्मचारी, डॉक्टर, नर्स, रुग्ण सेवक, सफाई कामगार मोठ्या हिमतीने शासनाला साथ देत आहेत. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून व एक शिवसैनिक म्हणून या कोविड विरुद्धच्या लढाईत आपल्या सोबत आहोत.असे ही पत्रात नमूद केलं आहे.
पालघर जिल्ह्यातील वाढती कोविड रुग्णांची संख्या लक्षात घेवून जास्तीचे बेड सह वेंटीलेटर ची व्यवस्था करणे गरजेची आहे. तसेच कोविड केअर सेंटर सुद्धा वाढविण्यात यावेत, विलगीकरण कक्ष उभारण्यात यावेत. कोविड लसीकरण केंद्रांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. सदर केंद्र प्राथमीक आरोग्य केंद्रा सह इतर ठिकाणी खाजगी ठिकाणी ही लसीकरण केंद्र उभारून लस उपलब्ध केल्यास कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यास जलद गतीने मदद होईल, पालघर जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेवून  उपाय योजनांची अंमल बजावणी होणे बाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.उद्वव ठाकरे यांना लेखी पत्राद्वारे विनंती केली आहे,तसेच प्रत्येकानी काळजी घ्यावी,सॅनिटायजर चा वापर करावा,सुरक्षित अंतर ठेवावा आणि तोंडावर मास्क लावावा असे आवाहन आमदार श्री.श्रीनिवास वनगा यांनी केल आहे.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...