Friday, April 30, 2021

पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण

*पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण*
पालघर(प्रतिनिधी) दि 1 : महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन  कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात संपन्न झाला.
    मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रसंगी खासदार राजेंद्र गावित,आमदार श्रीनिवास वनगा जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ,, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, जिल्हा परिषदेचे     प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे,निवासी उपजिल्हधिकारी किरण महाजन, आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

खावटी अनुदान योजनेच्या अनुदान वितरणाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी शुभारंभ

*खावटी अनुदान योजनेच्या अनुदान वितरणाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी शुभारंभ*

*- आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी*

मुंबई, (प्रतिनिधी)दि. ३० : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने लागू केलेल्या निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनुसूचित जमातीसाठी जाहीर केलेल्या पॅकेज अंतर्गत खावटी अनुदान योजनेचे निधी वितरणांचा शुभारंभ उद्या, महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री ऍड. के.सी. पाडवी यांनी दिली आहे. 

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आदिवासी जमाती सर्वात जास्त प्रभावित झाली आहे. आदिवासी जमातीत मजुरांची संख्या जास्त असल्याने अश्या परिस्थितीत त्यांना खावटी अनुदान योजनेचा लाभ मिळावा, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १३ एप्रिल २०२१ रोजी  जाहीर केलेल्या कोरोना मदत पॅकेज अंतर्गत या निधीचे वाटप उद्या, महाराष्ट्र दिनापासून करण्यात येणार आहे.

श्री. पाडवी म्हणाले की, कोविड १९ च्या साथरोगामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि कडक निर्बंधामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा फटका बसलेल्या  राज्यातील आदिवासी कुटुंबांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू तसेच आर्थिक मदत पुरवण्याची खावटी योजना पुनर्जीवित करण्यात आली आहे. रोख रक्कम आणि किराणा वस्तुचे वितरण असे या योजनेचे स्वरूप आहे. 

दुरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते या निधीचे वितरण लाभार्थ्यांना करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री श्री अजित पवार, आदिवासी विकास मंत्री ऍड. के.सी. पाडवी, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आदी उपस्थित राहणार आहेत. 

*अशी आहे खावटी योजना*

1) आदिवासी विकास विभागाची खावटी कर्ज योजना सन २०१३ नंतर बंद झाली होती. या योजनेऐवजी कोरोना कालावधीसाठी 'खावटी अनुदान योजना'  सुरु केली.
2) या योजनेत लाभार्थी आदिवासी कुटूंबाना जीवनावश्यक वस्तूंसोबत रोख पैसे देण्यात येणार असून यासाठी सुमारे 486 कोटी रु. खर्च अपेक्षित आहे.
3) प्रति कुटूंब एकूण ४ हजार रुपये देण्यात येणार असून त्यापैकी 2 हजार रुपये पात्र लाभार्थी कुटूंबाना बँक खात्यात 'थेट लाभ हस्तांतरण' (DBT) या माध्यमातून देण्यात येणार आहेत.
4) उर्वरित रु. 2 हजार किंमतीच्या किराणा वस्तू देण्यात येणार आहेत. यामध्ये मटकी, चवळी, हरबरा, वाटाणा, उडीद डाळ, तूर डाळ, साखर, स्वयंपाकाचे तेल, गरम मसाला, मिर्ची पावडर, मीठ, चहा पत्ती  या वस्तूंचा समावेश आहे.
5) या योजनेत पहिल्यांदाच अति मागास प्रवर्गातील   कातकरी, माडीया ,कोलाम यांचा समावेश केला

जि.प.पालघर येथे संत तुकडोजी महाराज जयंती साजरी


*जि.प.पालघर येथे संत तुकडोजी महाराज जयंती साजरी*

पालघर(प्रतिनिधी)जिल्हा परिषद पालघर येथे संत तुकडोजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. 

मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

३० एप्रिल १९०९ साली अमरावती जिल्ह्यात तुकडोजी महाराज यांचा जन्म झाला. माणिक बंडुजी इंगळे हे त्यांचे मूळ नाव.
 तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. आडकोजी महाराज हे त्यांचे गुरू. त्यांनी त्यांचे मूळचे माणिक बॅन हे नाव त्यांचे गुरू आडकोजी महाराज यांनी बदलून तुकडोजी असे केले. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना
विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. सन १९४२च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. "आते है नाथ हमारे" हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत टी.ओ.चव्हाण, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी नितीन ओगले तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रोजेक्ट आरोग्यम -पालघर जिल्ह्यासाठी बाईक ॲम्बुलन्स

*प्रोजेक्ट आरोग्यम -पालघर  जिल्ह्यासाठी बाईक ॲम्बुलन्स*
 पालघर (प्रतिनिधी)जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे आ. श्रीनिवास  वनगा आणि जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या हस्ते बाईक ॲम्बुलन्स चे अनावरण करण्यात आले. अलर्ट सिटीझन फोरम यांच्या आणि स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय मार्फत पालघर जिल्ह्यासाठी या बाईक पुरवण्यात आल्या. प्रोजेक्ट आरोग्यम असा हा संस्थेचा  उपक्रम आहे.स्ट्रेचर, ऑक्सिजन, अतिरिक्त बॅटरी, पंखा संपूर्णतः विलगीकरण असलेली ही बाइक ॲम्बुलन्स विशेषतः गर्भवती महिलेसाठी तयार करण्यात आली असून सध्याच्या या कोव्हीड काळातही त्याचा उपयोग करता येईल.   जव्हार, मोखाडा सारख्या दुर्गम ठिकाणी या बाईक ॲम्बुलन्स उपयोगी पडतील या हेतूने  बनवण्यात आल्या असल्याची माहिती  संस्थेचे संस्थापक निरंजन आहेर यांनी यावेळी दिली. 
या ऍम्ब्युलन्स साठी असणारे चालक हे  वैद्यकीय ज्ञान असणारे (वैद्यकीय प्रशिक्षित स्वयंसेवक)असतील.

 संस्थेचा हा स्तुत्य उपक्रम असून आदिवासी भागासाठी  जेथे चार चाकी वाहन पोहोचू शकत नाही अशा ठिकाणांसाठी ह्या ॲम्बुलन्स नक्कीच उपयोगी पडतील असे मत यावेळी आमदार श्रीनिवास वनगा यांनी व्यक्त केले.

पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात रस्त्याशी जोडले न गेलेले असे एकूण २२ पाडे आहेत.तसेच पावसाळ्यात किंवा अन्य वेळीही गरोदर मातांना झोळीतून रुग्णालयात आणावे लागते हा प्रश्न लक्षात आल्यावर अलर्ट सिटीझन फोरम आणि एसबीआय ने ही बाइक ॲम्बुलन्स ची संकल्पना अमलात आणली. ज्या रस्त्यावरून मोटरसायकल जाते त्या रस्त्यावरून या बाईक मधून गरोदर मातांना किंवा गंभीर स्थितीतील रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचणे शक्य होईल तसेच त्यामुळे रुग्णांचे जीव वाचून मातामृत्यू ही टळतील असे मत यावेळी जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी व्यक्त केले.
 या अंबुलन्स जव्हार मोखाडा सारख्या दुर्गम ठिकाणी तसेच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर पुरवण्यात येतील. सध्या दोन ॲम्बुलन्स संस्थेने दिल्या असून आणखी २३ ॲम्बुलन्स संस्थेकडून पुरवण्यात येणार आहेत अशी माहिती यावेळी जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दिली.

औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेब पोर्टलचे अनावरण

*औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेब पोर्टलचे अनावरण*

पालघर(प्रतिनिधी) दि.30 (जिमाका):राज्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक (Index of Industrial Production) तयार करण्यासाठी पोर्टलचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने संपन्न झाले. 
याप्रसंगी उद्योग मंत्री श्री. सुभाष देसाई, नियोजन व वित्त राज्य मंत्री श्री .शंभुराज देसाई, उद्योग राज्य मंत्री श्रीमती आदिती तटकरे, नियोजन विभाग व उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव केंद्रिय सांख्यिकी कार्यालयाचे अधिकारी, उद्योग आयुक्त, अर्थ व सांख्यिकी संचालक, Industry Associates ने प्रतिनिधी, अर्थ व सांख्यिकी संचालनालय व उद्योग संचालनालयाचे सर्व अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते. 
राज्याच्या औद्योगिक विकासाचे उद्दिष्ट साध्य करणे, राज्याचे औद्योगिक धोरण निश्चित करणे, औद्योगिक विकासाच्या योजना ठरविणे यासाठी औद्योगिक क्षेत्रातील चढउताराचे मोजमाप आवश्यक असते. महाराष्ट्र हे देशातील औद्योगिकदृष्ट्या अग्रेसर राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनामधे तसेच एकूण उत्पन्नामध्ये राज्याचा हिस्सा मोठा आहे.
  निर्देशांक राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय उत्पन्न काढणे, देशातील राज्यातील औद्योगिक प्रगती मोजणे यासाठी तसेच नियोजन करण्याच्या उद्देशाने शासनास अत्यंत उपयुक्त आहे. उद्योग जगतास या क्षेत्रातील संशोधन तसेच उत्पादन करणाच्या संस्था यांना नेहमी याची आवश्यकता भासते. केंद्रिय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या अधिपत्याखालील अर्थ व सांख्यिकी संचालनालय, व उद्योग विभागाच्या अधिपत्याखालील उद्योग संचालनालय, यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे. 
जिल्ह्यांमधील निवडलेल्या ५६८ कारखान्यांकडून दरमहा विहित कालावधीत माहिती या वेब पोर्टलवर नोंद करण्याची जबाबदारी उद्योग संचालनालयाच्या महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र यांच्यावर सोपविण्यात आली आहे. माहितीवर संस्करण करून राज्याच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांक अर्थ व सांख्यिकी संचालनालय प्रकाशित करणार आहे.

Thursday, April 29, 2021

सोशल वर्क्स गृप सफाळे व्दारा जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप

सोशल वर्क्स गृप सफाळे व्दारा जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप 


सफाळे ( हिरालाल लोखंडे ) कोविड १९ च्या वाढत्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील अनेक विभागात रुग्णांची वाढती संख्या पाहात, महाराष्ट्र शासनाने आदेश " ब्रेक द चेन " अनुशंगाने कोविड १९  विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या दृष्टिकोनातून पालघर जिल्ह्यात काही निर्बंध लागु केले. त्यामुळे हातावर पोट असलेल्या आणि मोलमजुरी करणार्‍याना मजुर वर्गाला घरीच राहवे लागत आहे. सफाळे पुर्व विभागातील डोंगराळ - जंगलपट्टीत वसलेल्या चौकी उंबरपाडा ( ग्रामपंचायत दारशेत उंबरपाडा ता,जि पालघर ) येथील   गोरगरीब आदिवासी वस्ती असलेल्या गरजूंना सोशल वर्क्स गृप सफाळे व सफाळे पोलीस ठाणे ता,जि पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने, सामाजिक कार्याचा एक भाग समजून, एक हात मदतीचा देत, दिनांक २९ एप्रिल २०२१ रोजी, मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या ८० कुटूंबाना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. 
    या कार्यक्रम प्रसंगी सफाळा सोशल गृपचे पदाधिकारी सैफ शेख, दीपक ठाकुर, आयुब खान  व गृपचे अनेक सदस्य यांचा कार्यक्रम यशस्वी करण्यात मोठा सहभाग आहे. तर कार्यक्रमात खाकी वर्दीने कळत न कळत सामाजिक बांधीलकीला आपला सलाम करीत, सहभाग दर्शवत सफाळे पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री संदिप कहाळे सहा,पो निरीक्षक. श्री बाबुराव चिमटे सहा, पो, उपनिरीक्षक. श्री विशाल विसावे पो, नाईक. श्री कैलास शेळके पो, नाईक. श्री सचिन मोरे पो, नाईक. व श्री मनोज कवळी ग्रा,पं.सद्स्य दारशेत उंबरपाडा, श्री सुरेश किरकिरे सामाजिक कार्यकर्ते, रमेश ठाकुर, श्री जतिन कदम सर आदी मान्यवर मंडळाच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

कोविड लसीकरण केंद्र वाढवा:आमदार श्रीनिवास वनगा

*कोविड लसीकरण केंद्र वाढवा:आमदार श्रीनिवास वनगा* 
पालघर (प्रतिनिधी)पालघर विधानसभा मतदार संघातील कोरोना चा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेवून जनतेमध्ये कोविड चे लसीकरण जलदगतीने होणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी सामाजीक व राजकीय कार्यकर्ते, सामाजीक संस्था, संघटना, यांच्या मागणी व सुचने नुसार खालील ठिकाणी कोविड लसीकरण केंद्र सुरू करणे तसेच असलेल्या ठिकाणी वाढीव लसीकरण केंद्रा बाबत मान्यता देण्याबाबत पालघर चे आमदार श्रीनिवास वनगा यांनी जिल्हाधिकारी यांना विनंती केली आहे.त्यानुसार मोठी लोकसंख्या असलेल्या खालील विभागात व गावात लसीकरण नवीन सुरू करावीत व जिथे मोठी लोकसंख्या आहे तिथे आणखी केंद्र निर्माण करता येतील का याबाबत चाचपणी करून ती सेवा नागरिकांना उपलब्ध करून द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे,खालील गावे ही मोठ्या लोकसंख्या ची आहेत,त्यात
१) माहिम २) केळवा ३) केळवे रोड ४) नंडोरे  ५) शिरगावं ६) सातपाटी ७) मुरबे 
८) पाचमार्ग ९) दांडी १०) चिंचणी ११) बहाड १२) धाकटी-डहाणू १३) वाणगावं 
१४) गंजाड १५) रायतळी १६) कासा ग्रामपंचायत १७) चारोटी १८) महालक्ष्मी १९)धनसार
तरी वरिल ठिकाणी तात्काळ कोविड लसीकरण केंद्र सुरू करणे बाबत जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांना लेखी पत्राद्वारे विनंती केली आहे.

Wednesday, April 28, 2021

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मनाई आदेश लागू

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मनाई आदेश लागू 
पालघर (प्रतिनिधी)दि. 28 :- पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मोर्चे, उपोषणे, धरणे, आंदोलन व रास्ता रोको करणेकामी बसण्याकरीता व ध्वनीक्षेपकाचा वापर करण्याकामी पोलीस विभागामार्फत परवानगी देण्यात येते. परंतू त्यामुळे निर्माण होणाऱ्या गोंधळामुळे कार्यालयात काम करणे अशक्य होते. तसेच या कार्यालयासमोरील रस्त्यालगतची जागा खाजगी असून ती निमुळती असल्याने सदर ठिकाणी मोर्चे, उपोषणे, धरणे, आंदोलन व रास्ता रोकोकर्ते यांनी मंडप उभारल्याने अथवा ते सदर ठिकाणी उभे राहील्याने सदरच्या जागेवरुन येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचा धक्का लागून अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय हे खाजगी इमारतीत असल्याने व त्यासमोर उपोषणकर्ते, आंदोलनकर्ते यांचेसाठी मंडप उभारणे अथवा उभे राहण्याकरीता पुरेशी जागा उपलब्ध होत नसल्याने तसेच या भागात रासायनिक कंपन्या असल्याने त्यांचे अवजड वाहनांची ये-जा होत असल्याने वाहनांचा धक्का लागून अपघात घडण्याची शक्यता लक्षात घेता, सदर जागेत मोर्चे, उपोषणे, धरणे, रास्ता रोको व आंदोलनकर्ते यांना जिल्हाधिकारी कार्यालय, पार्श्वनार्थ-9 इमारत, बिडको नाका, नवली, ता.जि.पालघर पासून 100 मीटरचे परीसरात प्रवेश करण्यास मनाई आदेश लागू करण्यात आला असल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण महाजन यांनी अधिसुचनेद्वारे कळविले आहे. 
फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 (1) (2) (3) अन्वये जिल्हादंडाधिकारी पालघर यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी कार्यालय, पार्श्वनाथ 9 इमारत, बिडको नाका, नवली, ता.जि. पालघर या कार्यालयापासून 100 मीटरचे परीसरात विविध राजकीय पक्ष व विविध संघटना, तसेच इतर व्यक्ती यांचेकडून त्यांचे विविध मागण्यांकरीता मोर्चे, उपोषणे, धरणे, आंदोलन व रास्ता रोको करणाऱ्या व्यक्तींना सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, ध्वनीक्षेपक (लाऊडस्पिकर) सुरु ठेवणे, वाद्य वाजवणे, कार्यालयसमोर मोर्चे, उपोषणे, धरणे आंदोलने व रास्ता रोको करण्याकामी प्रवेश करण्यास दि. 04/05/2021 रोजी 00.01 वा. पासून ते दि. 01/07/2021 रोजी 24.00 वाजेपर्यंतच्या कालावधीमध्ये मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.
सदरचा मनाई आदेश जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामांकरीता शासकीय, निमशासकीय व खाजगी कार्यालयातून येणारे अधिकारी व त्यांचे कर्मचारी, विविध उपक्रमांकरीता आमंत्रित करण्यात येणारे शासकीय, निमशासकीय व खाजगी कार्यालयातून येणारे अधिकारी व त्यांचे कर्मचारी व खाजगी व्यक्ती, शासकीय कामकाजानिमित्त येणारे नागरीक, राजकीय पक्ष व विविध संघटनांच्या व्यक्ती, तसेच विविध राजकीय पक्ष व विविध संघटना, तसेच इतर व्यक्ती यांचेकडून त्यांचे विविध मागण्यांकरीता मोर्चे, उपोषणे, धरणे, आंदोलन व रास्ता रोको करणाऱ्या ज्या व्यक्ती जिल्हाधिकारी यांना निवेदन देणेकामी येणेकरीता जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस विभागाची परवानगी घेऊन पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या सोबत येतील अशा 5 पेक्षा कमी संख्येने येणाऱ्या व्यक्ती यांना सदरचा मनाई आदेश लागू राहणार नाही.

मुब्रा येतील प्राईम क्रीटीकेअर रुग्णालयातील आगीत मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटूंबियांना पालिकेकडून 5 लाखाची मदत

*मुब्रा येतील प्राईम क्रीटीकेअर रुग्णालयातील आगीत मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटूंबियांना पालिकेकडून 5 लाखाची मदत* 

*रुग्णालयाला भेट दिल्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा* 
*ठाण्यातील सर्व रुग्णालयाचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट पूर्ण करण्याचे  आयुक्तांना निर्देश*  :- मुंब्रा येथील प्राईम क्रीटीकेअर रुग्णालयात काल मध्यरात्री अचानक आग लागल्याने त्यात 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या आगीत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटूंबियांना मुख्यमंत्र्यांनी 5 लाखाची आणि जखमींना 1 लाखाची मदत जाहीर केली होती. आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी याठिकाणी भेट देऊन या रुग्णालयाची पाहणी केली. , त्यानंतर त्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मृत व्यक्तीना अतिरिक्त 5 लाख रुपयांची मदत जाहीर जाहीर केली. 

मुंब्रा येथील रुग्णालयात रात्री 3 वाजता लागलेल्या आगीत अनेक रुग्ण मृत्युमुखी पडले असते. मात्र  आग लागल्याचे समजताच तत्काळ या रुग्णाना इतरत्र हलवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. प्राथमिक पाहणीनुसार ही आग शॉर्टसर्किट मुळे लागली असल्याचा अंदाज आहे. तसच ही आग आयसीयू मध्ये लागली नव्हती मात्र रुग्णांना हलवताना श्वास गुदमरून या चार जणांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. 

रुग्णालयातील या आगीच्या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन आशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठीच प्रत्येक रुग्णालयाचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट लवकरात लवकर करण्याचे निर्देश श्री.शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा याना दिलेले आहेत. तसेच ही आग नक्की कशामुळे लागली याचा शोध घेण्याचे देखील आदेश संबंधित अधिकाऱ्यांना पालकमंत्री श्री शिंदे यांनी दिलेले आहेत.

जिल्ह्यातील लसीकरणाचा आकडा दोन लाखाच्या पार



*जिल्ह्यातील लसीकरणाचा आकडा दोन लाखाच्या पार*

*जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ* 

पालघर  दि.27 : जिल्ह्यामधील आठ तालुक्यात 2 लाख 7 हजार 849 व्यक्तींचे लसीकरण करून  जिल्ह्याने कमी कालावधीत दोन लाखाचा आकडा पार केला असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ  यांनी सांगितले
              जिल्ह्यामध्ये एकूण 88 लसीकरण सत्र असून 71 शासकीय तर 17 खाजगी सत्रा मधून दैनंदिन साधारण 6 हजार 600 व्यक्तींना लस दिली जाते आतापर्यंत 1 लाख 74 हजार 645 जणांना पहिला डोस दिला गेला तर 32 हजार 204 जणांना दुसरा डोस देण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ  यांनी सांगितले.

              तालुकानिहाय लसीकरणा मध्ये डहाणू 18 हजार 558, जव्हार 4 हजार 443, मोखाडा 2281, पालघर 59 हजार 771, तलासरी 2485 वसई 13526, विक्रमगड  4235,      वाडा 10882,  पालघर ग्रामीण 1 लाख 16 हजार 181, वसई विरार 91 हजार 668, असे  एकूण 2 लाख 7 हजार 849 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले.

Tuesday, April 27, 2021

बोईसरला(अफाट गर्दी टाळण्यासाठी) लसीकरण केन्द्र वाढविण्याची शिवसेनेची मागणी

बोईसरला(अफाट गर्दी टाळण्यासाठी) लसीकरण केन्द्र वाढविण्याची शिवसेनेची मागणी

बोईसर ,(प्रतिनिधी)दि.27 एप्रिल 2021 

          तारापूर औद्योगिक क्षेत्रातील हजारो कामगार  व परिसरातील गावांत प्रचंड मोठया प्रमाणात असलेली  लोकसंख्या पाहता सद्या तारापूर एमआयडीसी तील टीमा हॉल मधे  सुरु असलेल्या  लसिकरण केन्द्राची क्षमता अत्यंत कमी आहे त्यातच  1 मेपासून 

18 वर्षावरील नागरिकांचे  लसीकरण सुरु 

 करण्यात येणार असल्याने अफाट गर्दी

उसळणार असल्याने बोईसर शहरात लसीकरण केंद्रे वाढविण्याची मागणी  शिवसेनेचे विधानसभा संघटक  निलम संखे यांनी केली आहे 

          संखे यांनी आज पालघरचे तहसीलदार ,  गटविकास अधिकारी  व आरोग्य अधिकारी 

यांची प्रत्यक्ष भेट घेवून निवेदन देवून वास्तवही सांगितले त्यांनी दिलेल्या निवेदनात सद्या 45 वर्षावरील नागरिकांची लसीकरणासाठी अफाट गर्दी होत  असुन ती नियंत्रणा बाहेर जात आहे  

त्या मुळे 1मेपासून या गर्दिच्या कीती तरी अधिक पट  मोठीगर्दी वाढेल त्यामुळे शासकीय यंत्रणेवर ताण पडून मोठा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे हे सर्व लक्ष्यात घेऊन  लसीकरण केंद्र वाढवण्यात यावे  अशी मागणी  केल्या नंतर 

सर्वांनी सकारात्मक भूमिका घेवून लवकरात लवकर बोईसर मध्ये अजून नवीन लसीकरण केंद्र चालू करण्याचे आश्वासन दिल्याचे संखे यांनी सांगितले

मुंबई महानगर क्षेत्रातीलमधील सर्व खाजगी आणि सरकारी रुग्णालयाचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट करण्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे महापालिकांना निर्देश

*मुंबई महानगर क्षेत्रातीलमधील सर्व खाजगी आणि सरकारी रुग्णालयाचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट करण्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे महापालिकांना निर्देश*

*खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी सहायक आयुक्त आणि वॉर्ड ऑफिसर यांना जबाबदारी देण्याची सूचना*

*आगीमुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येक कोविड केंद्राच्या आवारात अग्निशमन दलाचे वाहन तैनात ठेवण्याची सूचना* 

मुंबई,(प्रतिनिधी) दि.२७: मुंबई महानगर क्षेत्रातीलमधील सर्व महानगरपालिकांच्या अखत्यारीतील सरकारी आणि खाजगी रुग्णालयांचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट करण्याचे निर्देश आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. आगीच्या घटना टाळण्यासाठी हे ऑडिट त्रयस्थ तज्ञ संस्थेच्या माध्यमातून करण्याचे त्यांनी सर्व महानगरपालिकांच्या आयुक्तांना सांगितले. 

एमएमआर क्षेत्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज नगरविकास मंत्री श्री. शिंदे यांच्या उपस्थितीत दुरदृष्य प्रणालीद्वारे बैठक झाली. यावेळी ठाणे,रायगड, पालघर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. ऑक्सिजन, रेमडेसिवीर उपलब्धतेचा आढावाही घेण्यात आला. त्यासोबतच होम आयसोलेशन मध्ये असलेल्या रुग्णांची विचारपूस करण्यासाठी आणि त्यांच्या तब्येतीची माहिती मिळवण्यासाठी कॉल सेंटरचा प्रभावी वापर करण्याची सूचना श्री. शिंदे यांनी केली. 

उन्हाळा सुरु झाल्याने वातानुकूलित यंत्र आणि व्हेंटिलेटर यामुळे अतिरिक्त वीज वापरली जाते. त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन आगी लागण्याची शक्यता असल्याने कोविड केअर सेंटरच्या ठिकाणी अग्निशमन दलाचे वाहन तैनात करण्याची सूचना श्री. शिंदे यांनी केली. यासोबतच अनेकदा खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजन संपल्याच्या  घटना टाळण्यासाठी सहायक आयुक्त आणि वॉर्ड ऑफिसर यांच्या मदतीने या ऑक्सिजन पुरवठ्यावर लक्ष ठेवणे आणि ऑक्सिजन कमी होताच पालिकेला कळवणे बंधनकारक करण्याची सूचनाही त्यांनी केली. तसेच कोविड केअर सेंटर मधील महिला रुग्णांसोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्ष राहण्याचे आदेश देखील श्री. शिंदे यांनी दिलेत. 

काही महानगरपालिकांच्या भागातील कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याचे निरीक्षण काही महापालिका आयुक्तांनी नोंदवले. मात्र तरीही ऑक्सिजन निर्मिती प्लांटचे काम शक्य तेवढ्या लवकर पूर्ण करून कार्यान्वित करण्याचे निर्देश देखील नगरविकास मंत्र्यांनी सर्व आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना  दिले आहेत.

0000

मनोर गावातून जाणारी जड वाहतुक इतर मार्गाने वळविन्यासाठी वाहतूक अधिसूचना जारी

*मनोर गावातून जाणारी जड वाहतुक इतर मार्गाने वळविन्यासाठी वाहतूक अधिसूचना जारी*

पालघर दि. 27 :- कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, ठाणे यांनी राष्ट्रीय महामार्ग क्र. 160 अ, सिन्नर-घोटी-त्रिंबकेश्वर-मोखाडा-जव्हार-मनोर-पालघर रस्ता कि.मी. 197/200 ते 217/700 या रस्त्याचे मजबूतीकरण करणेसाठी मनोर गावातून जाणारी जड वाहतुक इतर मार्गाने वळविन्यासाठी वाहतूक अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
अपर जिल्हादंडाधिकारी पालघर, डॉ. किरण महाजन यांनी ही अधिसूचना जारी केली आहे.

वाहतूकीकरीता बंद करण्यात येणारा मार्ग
राष्ट्रीय महामार्ग क्र. 160 अ. सिन्नर-घोटी त्रिंबकेश्वर-मोखाडा जव्हार- मनोर- पालघर रस्ता कि.मी. 197/200 ते 217/700 या रस्त्याचे मजबूतीकरण करणेसाठी पालघर तालुक्यातील मनोर गावातून जड-अवजड वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात येत आहे.
वाहतूकीकरीता रस्ता बंद करण्याचा कालावधी
बुधवार दि. 28/04/2021 रोजी पासून ते गुरुवार दि. 27/05/2021 पर्यंत.
वाहतुकीकरीता पर्यायी मार्ग
1) जड अवजड वाहने शिवाजी चौक (पालघर) बोईसर चिल्हार फाटा (रा.म.क्र.8) मार्गे ये-जा करतील.
2) जड अवजड वाहने शिवाजी चौक (पालघर) चहाडे नाका वरई नाका(रा.म.क्र.8) मार्गे ये-जा करतील.
उपरोक्त मार्गावर बुधवार दि. 28/04/2021 रोजी पासून ते गुरुवार दि. 27/05/2021 पर्यंत सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांस प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदरची वाहतुक नियंत्रण अधिसूचना ही पोलीस वाहने, महसूल विभागाची वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहने, पोलिसांनी परवानगी दिलेली वाहने, उपविभागीय दंडाधिकारी व तालुका दंडाधिकारी यांनी परवानगी दिलेली वाहने तसेच राष्ट्रीय महामार्ग विभाग, ठाणे यांनी परवानगी दिलेल्या वाहनांना अधिसूचना लागू राहणार नाही.

पालघर शिवसेनेचा मदतीचा हाथ..**कोविड हेल्पलाईन सेंटर ने रुग्णच्या नातेवाईकांना दिलासा

*पालघर शिवसेनेचा मदतीचा हाथ..*
*कोविड हेल्पलाईन सेंटर ने रुग्णच्या नातेवाईकांना दिलासा*
पालघर(प्रतिनिधी)
पालघर जिल्हा शिवसेना व पालघर प्रतिष्ठान यांच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. राजेशभाई शाह व आमदार श्री. श्रीनिवास वनगा यांच्या नेतृत्वाखाली श्री.सुनील महेंद्रकर, पालघर प्रतिष्ठान व शिवसेना शहर प्रमुख श्री.भूषण संखे यांनी शिवसेनेच्या वतीने करोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मदतीचा हाथ म्हणून पालघर शिवसेना कोविड मदद कक्षा ची स्थापना केली असून नुकताच आमदार श्रीनिवास वनगा व जिल्हाप्रमुख राजेशभाई शाह यांच्याहस्ते औपचारिक उद्धघाटन करण्यात आले,याठिकाणी रुगण व त्यांच्या नातेवाईकाना कोविड बेड कुठे उपलब्ध आहेत, ऑक्सिजन बेड कुठे आहेत,व्हेंटिलेटरची व्यवस्था कुठेय तस्सेच रेमडिसिव्हीर इंजेक्शन व इतर माहिती फोन वरून दिली जाते,त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना खूप मोठे सहकार्य मिळत आहे,
तसेच जवळच शिवसेनेचे वतीने कोविड चाचणी केंद्र सुद्धा सुरू करणयात आले आहे,येथे आर. टी. पी सी .आर . ची टेस्ट केली जाते,
या शिवसेनेच्या अभिनव  उपक्रमाचे पालघर मध्ये कौतुक होत असून जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख श्री.राजेशभाई शाह यांनी केले आहे. तर आवश्यक ती मदतीसाठी पालघर प्रतिष्ठान चे सुनील महेंद्रकर यांनी 08668227593 व 80446658848 या फोन नंबर वर सकाळी 11 ते दु 1 वाजेपर्यंत कॉल करावा असे आवाहन केले आहे.

Sunday, April 25, 2021

महाराष्ट्र नवनिर्माण सेना इगतपुरी तालुक्याच्या वतीने ईगतपुरी ग्रामीण रुग्णालयास ऑक्सीजन सिलिंडर चा पुरवठा.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना इगतपुरी तालुक्याच्या वतीने ईगतपुरी ग्रामीण रुग्णालयास ऑक्सीजन सिलिंडर चा पुरवठा.

 नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.

ईगतपुरी :- ईगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते डॉ.प्रदिप चंद्रजी पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उप जिल्हा अध्यक्ष संदीप भाऊ किर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली दहा(१०) ऑक्सीजन सिलिंडर देण्यात आले यावेळी मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मागणी केली होती कि, ईगतपुरी तालुक्यात कोरोनाचा वाढत संसर्ग वाढणारी रुग्ण संख्या याची दखल घेऊन आक्सीजन बेडची संख्या वाढवावी. या मागणी ची दखल घेऊन पुर्वी जे २० बेड होते ते ५० बेड करण्यात आले यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या मागणी ला यश आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी नी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता पुर्ण ५० च्या ५० बेड फुल असुन फार मोठी भयानक परिस्थिती या तालुक्यात उदभवली आहे. आरोग्य कर्मचारी डॉ.देवरे मॅडम सर्व कर्मचारी यांनी या कोरोना महामारी च्या काळत ऑक्सीजनचा तुटवडा असताना ग्रामीण रुग्णालयास ऑक्सीजन सिलिंडर दिल्या बद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आभार व्यक्त केले.
    त्यावेळी तेथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उप जिल्हा अध्यक्ष संदीप किर्वे डॉ.देवरे मॅडम मनसेचे उप तालुका अध्यक्ष भोलेनाथ चव्हाण ईगतपुरी शहर अध्यक्ष सुमित बोधक महिला तालुका अध्यक्ष पुनम राखेचा घोटी मनविसे उप तालुका अध्यक्ष पिंटू चव्हाण शहर उपाध्यक्ष राजु राखेचा सोशल मीडिया घोटी शहर अध्यक्ष अर्जुन कर्पे युवा नेते निलेश बुधवारे युवा नेते धीरज गौड मनसे रेल्वे ईगतपुरी युनिट अध्यक्ष शत्रुघ्न भागडे सचिव दिलीप लहाने सहसचिव समीर शेख खजिनदार रवी भागडे गौरव सोनवणे निलेश कराड अविनाश कडु तसेच एस.के.मित्रपरिवार आदी उपस्थित होते.

पालघर मित्र फाउंडेशन व्दारा केल्याची सामाजिक कार्याची दखल

पालघर मित्र फाउंडेशन व्दारा केल्याची सामाजिक कार्याची दखल
 ! 
प्रतिनिधी - सफाळे   
मित्र फाउंडेशन पालघरचे अध्यक्ष आणी सामाजिक कार्यकर्ते श्री निलेश रमेश राऊत व त्यांच्या सह असलेले मित्र फाउंडेशनचे सदस्य, यांनी केलेल्या १ ) ग्रामीण रुग्णालयात पालघर येथील, १०८ नंबर रुग्णवाहिका डॉक्टर, कर्मचारी, ड्रायव्हर,यांना त्याच्या सुरक्षेच्या साठी सॅनिटायझर, मास्क, हॅडग्लोज मोफत वाटप. २) मौज आंबोडे ता,जि पालघर येथे डाॅ. बाबासाहेब जयंती निमित्ताने गावकर्‍यांना मास्क - सॅनिटायझर मोफत वाटप. ३) पालघर,माहीम,केळवा,माकुणसर चेकपोस्टवर जनतेच्या सुरक्षेच्या साठी तैनात असलेल्या पोलिस बांधवांना बिस्किटे, पिण्यासाठी पाणी बोट, तसेच त्याच्या सुरक्षिततेसाठी मास्क, सॅनिटायझर मोफत वाटप.४) सफाळे पोलीस ठाणे येथील कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी या सर्वाना त्यांच्या सुरक्षितते साठी मास्क व सॅनिटायझर मोफत वाटप. ५) सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथील सर्व वैद्यकीय अधिकारी, नर्स, कर्मचारी, आशा,आदी शंभर कर्मचारी यांना कोविडच्या सुरक्षेच्या कारणास्तव,    मास्क, हॅडग्लोज, सॅनिटायझर मोफत वाटप. अश्या प्रकारे करीत असलेल्या आणी या पुढेही असे कार्य करीत राहणार्‍या मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष श्री निलेश राऊत यांना ते करीत असलेल्या कौतुकास्पद सामाजिक कार्याची दखल घेत, दिनांक २४  एप्रिल २०२१ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रातील जेष्ठ आरोग्य अधिकारी डॉक्टर, श्री मिलींद रणदिवे सर यांनी, प्रशस्तीपत्र देऊन ते करीत असलेल्या कार्याची एक पोच दिली. त्या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप घरत, वरिष्ठ सल्लागार हिरालाल लोखंडे, सदस्य रोहित मोरे, उचित पाटील, संकेत पाटील, शेखर पाटेकर आदी पदाधिकारी, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राती अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

मुंबई महानगर क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हवेतून ऑक्सिजन तयार करणाऱ्या १४ प्लांटच्या उभारणीस सुरूवात*- *नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

*मुंबई महानगर क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हवेतून ऑक्सिजन तयार करणाऱ्या १४ प्लांटच्या उभारणीस सुरूवात*
- *नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे*

मुंबई, (प्रतिनिधी)दि.२५: ऑक्सिजनची  वाढती मागणी लक्षात घेऊन हवेतून ऑक्सिजन तयार करणारे १४ प्लांट मुंबई महानगर क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बसविण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा भाईंदर, वसई विरार, नवी मुंबई आणि पनवेल या महापालिकांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये हे प्लांट कार्यान्वित होतील, असे मंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनची गरज भासू लागली आहे. त्यावर मात करतानाच भविष्यात अशा प्रकारचा तुटवडा जाणवू नये यासाठी हवेतून ऑक्सिजन शोषून रुग्णांना पुरविणाऱ्या प्लांटची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले. 
हवेतून ऑक्सिजन शोषून त्यातून शुद्ध ऑक्सिजन रुग्णांना पुरविण्यात येतो. साधारणता एका प्लांटमधून दररोज सुमारे २ टन (९६० एलपीएम) ऑक्सिजनची निर्मिती होऊन सुमारे २०० ऑक्सिजन बेडला त्याचा पुरवठा करता येऊ शकतो, असे मंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. 
मुंबई महानगर क्षेत्रातील ऑक्सिजनची गरज लक्षात घेता ठाणे महापालिका क्षेत्रात ३, कल्याण डोंबिवली व नवी मुंबई महापालिका क्षेत्रात प्रत्येकी २ तर भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा भाईंदर, वसई विरार आणि पनवेल येथे प्रत्येकी एक प्लांट उभारण्यास सुरूवात झाली आहे. त्यासाठी संस्थांची निवड करून त्यांना कार्यादेशही देण्यात आला. पुढील काही दिवसांमध्ये ते कार्यान्वित होतील, अशी अपेक्षा नगरविकास मंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केली आहे. 
सध्याच्या परिस्थितीत आणि भविष्यातही ऑक्सिजनची गरज भासल्यास या प्लांटमधून निर्माण होणारा ऑक्सिजन त्यासाठी उपयुक्त ठरेल असेही त्यांनी सांगितले. याच धर्तीवर गडचिरोली जिल्ह्यातही दिवसाला एक ते दीड टन ऑक्सिजन निर्मिती करणारे पाच ते सहा प्लांट उभारण्यात येणार असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

Saturday, April 24, 2021

मित्र फाउंडेशनचा, करोना योध्दाना मदतीचा हात, सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्र + सफाळे पोलीस ठाणे यांना मोफत कोविड साहित्य वाटप

मित्र फाउंडेशनचा, करोना योध्दाना मदतीचा हात, 
सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्र + सफाळे पोलीस ठाणे यांना मोफत कोविड साहित्य वाटप 
सफाळे प्रतिनिधी 
 दिनांक २४ एप्रिल २०२१ रोजी मित्र फाउंडेशन पालघर या सामाजिक व सेवाभावी कार्य करणार्‍या संस्थेच्या व्दारा करोना काळात स्वतःच्या कुटूंबा पासून दुर राहुन, सर्वसामान्य लोकांनचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी रात्र न दिवस आपली सेवा देणारे. सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, नर्स, आशा तसेच आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले इतर असे एकूण  शंभर कर्मचारी यांना सॅनिटायझर, मास्क, हॅन्डग्लोज व रात्रंदिवस जागता पहारा देणारे सफाळे पोलीस ठाणे येथिल अधिकार व पोलिस कर्मचारी व त्यांचे सहयोगी असे एकूण चाळीस सहकारी यांना सॅनिटायजर, मास्क चे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळेस डॉक्टर मिलींद रणदिवे जेष्ठ आरोग्य अधिकारी , डाॅ. गायकवाड, उपस्थित होते. सहाय्यक श्री पाटील, श्री मनोज पिंपळे, श्री   पवार,  तसेच आरोग्य कर्मचारी आशा आदी उपस्थित होते 
      सफाळे पोलीस ठाणे येथे साहित्य वाटप प्रसंगी मा. श्री संदीप कहाळे सहा. पो.निरीक्षक प्रभारी अधिकारी, यांच्या उपस्थित साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजक मित्र फाउंडेशन चे अध्यक्ष श्री निलेश रमेश राऊत, संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप घरत, सल्लागार सदस्य श्री हिरालाल लोखंडे - पत्रकार,श्री रोहित मोरे, श्री उचित पाटील, श्री संकेत पाटील, श्री शेखर पाटेकर आदी मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला

राज्यात ५७ जणांचा आगीत होरपळून मृत्यू!खाजगी रुग्णालयांना कोव्हिड १९ साठी परवानगी देण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाने त्यांचे फायर ऑडिट व ऑक्सिजन ऑडिट रिपोर्ट तपासून पाहणे आवश्यक आहे- किशोर पाटील

राज्यात ५७ जणांचा आगीत होरपळून मृत्यू!
खाजगी रुग्णालयांना कोव्हिड १९  साठी परवानगी देण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाने त्यांचे फायर ऑडिट व ऑक्सिजन ऑडिट  रिपोर्ट तपासून पाहणे आवश्यक आहे- किशोर पाटील

भिवंडी (प्रतिनिधी)दी.२४(स्व.रा.तो) संपूर्ण महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत आहे त्यामुळे संपूर्ण राज्यात हॉस्पिटल ची संख्या कमी पडत आहे असे असतानादेखील शासनाकडून अनेक ठिकाणी कोव्हिड रुग्णालये आप आपल्या परीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात  पालकमंत्र्यांच्या आदेशाने उभारली गेली आहेत. त्या ठिकाणी ऑक्सिजन व वेंटिलेटर  ची व्यवस्था करून रुग्णांना अत्यावश्यक सेवा देण्याचे काम युद्ध पातळीवर  सुरू आहे. व जास्तीत जास्त बेड कसे  वाढविण्यात  येतील याकडे सरकार व प्रशासन प्रयत्न करत आहेत. असे असताना देखील रुग्ण संख्या दिवसा गणीक  वाढत असल्याने बेड कमी पडत आहेत त्यामुळे स्थानिक महानगरपालिका नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून खाजगी रुग्णालयांना परवानगी देत आहे मात्र ही परवानगी देत असताना खाजगी रुग्णालयांनचे फायर ऑडिट रिपोर्ट व ऑक्सीजन ऑडिट रिपोर्ट पाहणे आवश्यक आहे. रुग्ण संख्या वाढत असल्याने परिस्थिती हाताळणे कठीण झाल्याने स्थानिक प्रशासन  हे खाजगी रुग्णालयांना परवानगी देत आहे . अशा कठीण प्रसंगी मात्र त्यांचे फायर ऑडिट ऑक्सिजन ऑडिट तपासून घेतले जात नाही.त्यामुळे दुर्देवाने काही रुग्णालयांना आग लागून मोठ्या प्रमाणात जिवीत हानी झाल्याचे दिसून येत आहे.गेल्या दोन तीन महिन्यात ५७ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.त्यामधे भंडाऱ्याला १७ पैकी १० बालकांचा मृत्यू झाला,भांडुप ला १० जणांचा मृत्यू झाला.तर नाशिक येथे २४जणांचा मृत्यू झाला.व काल विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयात १७ पैकी १३ जणांचा मृत्यू झाला आहे .अशा प्रकारे एकूण  राज्यात ५७ जणांचा  आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.या घटना अतिशय दुःखद असून राज्य सरकार व स्थानिक प्रशासन यांच्या दुर्लक्ष पणामुळे घडल्या असल्याचा आक्षेप नागरिक व विरोधकांकडून केला जात आहे.म्हणून राज्य सरकार व स्थानिक प्रशासन यांनी खाजगी रुग्णालयांना फायर ऑडिट रिपोर्ट, ऑक्सिजन ऑडिट  रिपोर्ट,तपासून परवानगी द्यावी अशी विनंती दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सरचिटणीस श्री किशोर बळीराम पाटील यांनी स्वराज्य तोरण च्या माध्यमातून राज्य सरकार व स्थानिक प्रशासन यांना केली आहे.
तसेच फायर ऑडिट, ऑक्सिजन ऑडिट,  बरोबरच स्ट्रक्चरल ऑडिट व इलेक्ट्रिक ऑडिट  रिपोर्ट पाहून खाजगी रुग्णालयांना परवानगी द्यावी असे ही सांगितले आहे...
सरकारी व खाजगी रुग्णालयांना फायर ऑडिट ,ऑक्सिजन ऑडिट,स्ट्रक्चरल ऑडिट व इलेक्ट्रिक ऑडिट रिपोर्ट हे प्रत्येक सहा महिन्यांनी करणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र आग प्रतिबंधक योजना २००६ या कायद्यानुसार फायर यंत्रणा कशाप्रकारे असावी यासाठी मुंबई अग्निशामक दलाकडून परवानगी दिली जाते त्याचप्रमाणे अधिकृत लायसन्स एजन्सी यांना परवानगी दिली जाते व त्यांच्या मार्फत प्रत्येक  स्थानिक  अधिकृत अग्निशमन दलाकडून खाजगी रुग्णालयांना फायर लायसन्स दिले जातात.
म्हणून सर्व  ऑडिट रिपोर्ट तपासून रुग्णालयांना परवानगी द्यावी  जेणे करून रुग्णालयांना आग लागणार नाही  व जिवीत हानी रोखण्यात यश येईल असे ही शेवटी त्यांनी सांगितले आहे....

पालघर जिल्ह्यात हवेतून ऑक्सीजन निर्मितीसाठी 3 कोटी 20 लाखाच्या प्रशासकीय मंजूऱ्या

पालघर जिल्ह्यात हवेतून ऑक्सीजन निर्मितीसाठी
                   3 कोटी 20 लाखाच्या प्रशासकीय मंजूऱ्या

Friday, April 23, 2021

एस टी मधून फक्त अत्यावश्यक प्रवासी वाहतूक !

एस टी मधून फक्त अत्यावश्यक प्रवासी वाहतूक !
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ पालघर आगर येथील आगर व्यवस्थापक प्रमुख यांनी सर्व चालक / वाहक व सबंधित कर्मचाऱ्यांना शासन आदेश ब्रेक द चेन दिनांक २१ मार्च २०२१ च्या संदर्भित आदेशान्वये प्रवासी वाहतूक करताना बस मधून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या ओळख पत्राच्या आधारे प्रवास करण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. 
सर्व शासकीय कर्मचारी राज्य व केंद्र सरकार, स्थानिक प्रशासकीय कर्मचारी, वैद्यकीय क्षेत्रातील व वैद्यकीय क्षेत्राला निगडीत असलेल्या शेत्रात काम करणारे सर्व व्यक्ती. डॉक्टर, नर्स, लॅब - टेक्निशियन, हॉस्पीटल, मेडिकल, क्लिनिक स्टॉफ, तसेच स्थानिक प्रशासना मार्फत अत्यावश्यक सेवेतील विषेश नेमणूक झालेल्या व्यक्ती. 
वैद्यकीय उपचारांसाठी असलेल्या पार्श्वभूमीवर रुग्णास व तो ज्याच्यावर अवलंबून आहे, अश्या एका साथीदाराला ( वैद्यकीय उपचाराचे डॉक्टर यांचे कागदपत्रे सोबत असावे )प्रवास सवलत देण्यात आली आहे 
बसच्या आसन क्षमतेच्या ५० % टक्के वाहतूक चालक - वाहक यांना बंधनकारक असेल याची खातरजमा सबंधित स्थानक प्रमुख यांनी करावयाची आहे. अशी लेखी सुचना आगर व्यवस्थापक पालघर यांनी दिलेली आहे. तरी जनतेने सहकार्य करावे 
घरी रहा, सुरक्षित रहा.

दुर्घटने संदर्भातील चौकशी समितीच्या सूचना अमलात आणणार*

*दुर्घटने संदर्भातील चौकशी समितीच्या सूचना अमलात आणणार*

 *महसूल मंत्री बाळासाहेब थोरात*

 पालघर (प्रतिनिधी)दि:23 : विरार मधील विजय वल्लभ रुग्णालया मध्ये झालेल्या दुर्दैवी घटने संदर्भातील चौकशी समिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेमकी असून त्या चौकशी समिती ने केलेल्या शिफारशी अमलात आणल्या जाणार असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले
     विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयाच्या आयसीयू कक्षाला लागलेल्या आगीची पाहणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं त्यावेळी पत्रकारांशी झालेल्या चर्चेवेळी श्री थोरात बोलत होते
     जिल्हा प्रशासन सतर्क असून  पूर्ण क्षमतेने काम करत आहे. जिल्ह्यातील  प्रशासकीय यंत्रणा कोरना युद्धमध्ये दिवस-रात्र लढत आहे. प्रशासनावर या काळात प्रचंड ताण असला तरी  भविष्यात अश्या दुर्घटना घडणार नाहीत याची काळजी जिल्हा प्रशासन घेईल  असे  महसूलमंत्री श्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
 झालेली दुर्घटना अत्यंत दुर्देवी असून अशा घटना भविष्यात घडू नये यासाठी प्रशासन नियोजनबद्ध काम करेल असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

विजय वल्लभ रुग्णालय दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना महापालिकेच्या वतीने ५ लाख रुपयांची मदत*

* *विजय वल्लभ रुग्णालय  दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना  महापालिकेच्या वतीने ५ लाख रुपयांची मदत*
 
* *नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे*
    पालघर. दि.23 : विरार रुग्णालय दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने घोषित केलेल्या मदतीच्या व्यतिरिक्त महापालिकेच्या वतीने ५ लाख रुपयांची मदत देण्यात येणार 
  तसेच, अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी महापालिकेचे व्हिजिलन्स पथक स्थापन करून त्यात औद्योगिक सुरक्षेशी संबंधित तज्ज्ञांची मदत घेण्याचे निर्देशही श्री. शिंदे यांनी दिले.
विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागास मध्यरात्री ३ च्या सुमारास आग लागून १३ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच नगरविकास मंत्री श्री. शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षित स्थलांतराला प्राधान्य देत त्यांनी काही रुग्णांना दहिसर येथील
 मुंबई महापालिकेच्या कोव्हीड सेंटर येथे हलवले, तर अन्य रुग्णांना विरार मधीलच विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. श्री. शिंदे यांनी मृतांच्या नातलगांची भेट देऊन त्यांचे सांत्वन केले.  
रुग्णालयाला दिलेल्या भेटीनंतर श्री. शिंदे यांनी पालिका आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन तातडीने सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट, इलेक्ट्रिक ऑडिट करण्याचे निर्देश दिले. त्यासाठी व्हिजिलन्स पथक स्थापन करून खासगी तज्ज्ञांचीही मदत घेण्याचे निर्देश श्री. शिंदे यांनी दिले. याप्रसंगी पालघरचे पालकमंत्री दादा भुसे, आमदार रवींद्र फाटक, बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितीज ठाकूर, पालघरचे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आदी उपस्थित होते.
श्री. शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच, राज्य सरकारच्या वतीने मृतांच्या नातलगांना ५ लाख रुपये आणि जखमींना १ लाख रुपयांची मदतही जाहीर केली आहे. याखेरीज महापालिकेच्या वतीनेही मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत श्री. शिंदे यांनी जाहीर केली.

Thursday, April 22, 2021

विजय वल्लभ रुग्णालयातील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये व जखमींना एक लाख रुपयांची मदत

*विजय वल्लभ रुग्णालयातील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी*

*मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये*

*जखमींना एक लाख रुपयांची मदत*

*घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल*
          
            *पालकमंत्री दादाजी भुसे*

पालघर(प्रतिनिधी). दि. 23 : विरार येथील  विजय वल्लभ रुग्णालयात लागलेल्या आगीत 13 जणांचा मृत्यू झालेला  आहे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांना प्रत्येकी पाच लाख रुपये तर गंभीर जखमी असलेल्या रुग्णांना एक लाखाची तातडीची मदत देण्यात येणार आहे. तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत असे कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले           
  विरार येथील विजय  वल्लभ आयसीयू कक्षाला रात्री 3:30  च्या सुमारास आग लागली पालकमंत्री श्री भुसे यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली व मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.
  ही घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहे. या घटनेमध्ये दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. असे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

आमदार श्रीनिवास वनगा कडून दोन रुग्णवाहिकाचे लोकार्पण

*आमदार श्रीनिवास वनगा कडून दोन रुग्णवाहिकाचे लोकार्पण*
पालघर(प्रतिनिधी)
पालघर विधानसभेचे आमदार श्री.श्रीनिवास वनगा यांच्या स्थानिक विकास निधीतून आज दोन रुग्णवाहिका पालघर विधानसभा क्षेत्रांतील कासा व वाणगाव या दोन ग्रामीण रुग्णालयाकरीता मंजूर करून त्यांचे हस्तांतरण अतिरिक्त जिल्हा सिव्हिल सर्जन डॉ.केळकर यांच्या कडे करण्यात आले,यावेळी खासकरून जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ व शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.राजेश शहा उपस्थित होते,
यावेळी शिवसेना महिला जिल्हासंघटक श्रीमती ज्योती मेहेर,शिवसेना शहरप्रमुख भूषण संखे,शहर समन्वयक सुनील महेंद्रकर,नगरसेवक बंड्याभाऊ वडे व शासकीय वैद्यकीय कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते,
यावेळी  वाणगाव व कासा- चारोटी ग्रामीण भागातील कोविड रुग्णांना तात्काळ  मदद होण्यासाठी या रुग्णवाहिका उपयोगी पडतील असे आमदार श्रीनिवास वनगा यांनी सांगितले तर कोविड काळात लोकप्रतिनिधी नी जनतेच्या आरोग्यासाठी असे उपक्रम राबविले याबाबत जिल्हाधिकारी डॉ.गुरसळ यांनी कौतुक केले.
साधारण २९ लक्ष ३८ रुपये इतक्या किंमतीचे दोन रुग्णवाहिका असून येत्या काही दिवसांत आणखी रुग्णवाहिका आमदार निधीतून उपलब्ध करण्याचा मानस असल्याचे आमदार वनगा यांनी सांगितले.

सफाळे पोलीस व्दारा, रेती चोराविरोधात कारवाई. दोन आरोपींना अटक.

सफाळे पोलीस व्दारा, रेती चोराविरोधात कारवाई. 
दोन आरोपींना अटक.
सफाळे  ( हिरालाल लोखंडे ) दिनांक २० एप्रिल २०२१ रोजी रात्री दहाच्या सुमारास, पारगांव दारशेत रोडवरील खोरीचापाडा येथील पुलावर एक निळ्या रंगाचा आयवा ट्रक ( क्रमांक एम. एच. ०३ / सी व्ही ९०२४ ) उभा असताना, तपासणी केली असताना, शासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी स्वतः जवळ नसताना, अनाधिकृत पणे विनापरवानगी गौण खनिज ( रेती ) ट्रक मधे, स्वतःच्या फायद्यासाठी भरून वाहतूक करताना, १) ट्रक चालक --  राजकुमार नरेश गौतम वय वर्ष २९ , राहणार घोडबंदर गाव, ता.जि.ठाणे. २) ट्रक मालक -- हणमंत कचरू गायकवाड वय वर्ष ४१, राहणार पंतनगर घाटकोपर पुर्व मुंबई मिळून आले .तसेच ट्रक चालक व ट्रक मालक यांनी पारगांव ते दारशेत कडे जाणार्‍या सार्वजनिक रस्त्यावर   स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी, ट्रक मधील वाळूचे पाणी पडल्याने रस्त्यावर चिखल होऊन ,रस्त्याची सुरक्षिततेला बाधा निर्माण होईल, याची जाणीव असून सुध्दा रस्त्याची खराबी केला, म्हणून  भारतीय दंड विधान संहिता कलम ३७९,४३१,३४ प्रमाणे व  महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सन १९६६  चे कलम ४८ ( ७ ),४८ ( ८ ) प्रमाणे सफाळे पोलीस ठाणे ता,जि पालघर येथे गुन्हा रजि, क्रमांक । २३ /  २०२१ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपींना (  चालक व मालक ) अटक करण्यात आलेली आहे. 
     सदर गुन्ह्यात १) एक निळ्या रंगाचा आयवा ट्रक ( क्रमांक एम एच. ०३ / सी व्ही /९०२४ अंदाजे किंमत १५,००,०००/-रूपये, २) ट्रक मध्ये असलेली ६ ब्रास रेती,( गौण  खनिज ) अंदाजे किंमत ६०,०००/- रूपये असा एकूण १५,६०,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. श्री संदीप कहाळे सहा,पो निरीक्षक, प्रभारी अधिकारी सफाळे पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सफाळे पोलीस ठाणेचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी कारवाई केली आहे.

Wednesday, April 21, 2021

आमदार श्रीनिवास वनगा यांनी केली जिल्हा क्रीडा संकुल इमारतीमध्ये आयसोलेशन केंद्र उभारण्यांची केली मागणी* *रुग्णांना मदतीसाठी हेल्पलाईन नंबर सुरू करण्याबाबत केली सूचना*

*आमदार श्रीनिवास वनगा यांनी केली जिल्हा क्रीडा संकुल इमारतीमध्ये आयसोलेशन केंद्र उभारण्यांची केली मागणी*
 *रुग्णांना मदतीसाठी हेल्पलाईन नंबर सुरू करण्याबाबत केली सूचना*

      पालघर *(प्रतिनिधी)*
पालघर  सह जिल्ह्यातील वाढती करोना रुग्णानची वाढती संख्या लक्षात घेऊन पालघर शहरातील तालुका व जिल्हा क्रीडा संकुल ताब्यात घेऊन तिथे ऑक्सिजन बेड सह अति दक्षता विभाग सुरू करावा तसेच नंडोरे आश्रमशाळा व अन्न धान्य वखार महामंडळ च्या इमारती सह इतर खाजगी इमारती व शाळा ताब्यात घेऊन तिथे करोना केयर सेंटर व ऑक्सिजन बेड सह व्यवस्था जलद गतीने करावी यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन यांची भेट घेऊन लेखी मागणी पत्र दिले तसेच रेमडिसिव्हीर इंजेक्शन व ऑक्सिजन बेड च्या तुटवड्या बाबत चर्चा केली व या गोष्टीचा साठा पालघर जिल्ह्यात जास्तीत जास्त मागणी
शासनाकडे  करण्यात यावी अशी सूचना केली.यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही प्रशासनाच्या सोबत आहोत असे सांगितले.
कोविड चा वाढता प्रदुर्भाव लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात अशी ही मागणी केली.
 जिल्ह्यातील करोना बाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना उपलब्ध बेड,ऑक्सिजन बेड, व रेमडिसिव्हीर इंजेक्शन यांची माहिती मिळावी यासाठी टोल फ्री रुग्ण हेल्पलाईन नंबर जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करावा जेणेकरून रुग्णाच्या नातेवाईकांना मदद होईलच त्याच बरोबर प्रशासकीय कामकाजात ही मदद होईल,व प्रशासनावरील भार कमी होईल अशी सूचना ही आमदार श्रीनिवास वनगा यांनी केली,
दरम्यान आपल्या आमदार निधीतून विविध कोविड साहित्य साठी आवश्यक मदद करू असे ही आमदार वनगा यांनी सांगितले.
यावेळी तहसीलदार श्री.चंद्रसेन पवार व शिवसेना पालघर शहर संघटक सुनील महेंद्रकर आदी उपस्थित होते.

सफाळे येथे विलीनीकरण केंद्र तर एडवण येथे कोरोना केंद्र सुरू करण्यासाठी प्रशासनाने केले मान्य!

सफाळे येथे विलीनीकरण केंद्र तर एडवण येथे कोरोना केंद्र सुरू करण्यासाठी प्रशासनाने केले मान्य! 
सफाळे ( हिरालाल लोखंडे )सफाळे विभागातील कोरोना रुग्णांचे प्रमाणात प्रचंड वाढ होत असल्याने, सफाळे विभागात कोवीड सेंटर सुरू करणे, काळची गरज ओळखून मा. आमदार श्री राजेश पाटील यांनी शासनास ( जिल्हाधिकारी साहेब) लिहलेले पत्र व सामाजिक  कार्यकर्ते यांनी केलेली मागणी या मुळे दिनांक २१ एप्रिल २०२१ रोजी मा.श्री,राजेश पाटील आमदार साहेब श्री प्रविण राऊत सामाजिक कार्यकर्ते सफाळे यांच्या सह 
श्री, तोरसकर साहेब उपविभागीय अधिकारी पालघर, श्री, सुनिल शिंदे साहेब तहसीलदार पालघर, डाॅ.खंदारे पालघर तालुका अधिकारी, श्री जगताप साहेब गटविकास अधिकारी पालघर, श्री संदीप कहाळे सहा. पोलीस  निरक्षर सफाळे, श्री अमोद जाधव सरपंच  ग्रा, पं, सफाळे श्री राजेश म्हात्रे उपसरपंच ग्रा,पं.सफाळे,श्री अजय ठाकुर अध्यक्ष सो.क्ष.संघ यांचे सह ग्रामीण शिक्षण संस्थेचे चंद्रप्रभा चित्तरंजन श्रॉफ इंग्रजी माध्यम शाळेची इमारत पहाणी करून विलगिकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असताना अॅड.दिपक भाते ग्रामीण शिक्षण संस्थेचे सरचिटणीस, ग्रा.पं. सफाळे, व सफाळे व्यापारी मंडळ यांनी सर्वतोपरी मदतीचे आस्वासन दिले. 
   एडवण येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतींची पाहणी करून कोरोना उपचार केंद्र सुरू करण्यासाठी प्रशासनाने मान्य केले असून, त्यावेळी मा. आमदार श्री राजेश पाटील, श्रीमती रेखा तरे पंचायत समिती पालघर सदस्य, सचिन वर्तक सरपंच एडवण, बंटी पाटील सरपंच उसरणी, भुषण सावे संचालक वसई विकास सहकारी बँक, अॅड. नितिन भोईर, परीसरातील सरपंच  उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
( सफाळे येथे ५० खाटांचे कोवीड केअर सेंन्टर तर 
एडवण येथे २० खाटांचे कोवीड हॉस्पीटल )

Tuesday, April 20, 2021

गरजू कोव्हीड रुग्णांना रेमडेसिवीर इंजेकशन तातडीने उपलब्ध होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे*

*गरजू कोव्हीड रुग्णांना रेमडेसिवीर इंजेकशन तातडीने उपलब्ध होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे*              पालकमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश
पालघर(प्रतिनिधी) दि 20.गरजू कोव्हीड रुग्णांना रेमडेसिवीर इंजेकशन तातडीने उपलब्ध होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे कोरोनारुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन चा पुरवठा तातडीने उपलब्ध करावा   असे निर्देश कृषी तथा  माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.                                     जिल्हा प्रशासनाने ऑक्सिजन मिळवण्याचा प्रयत्न करावा. असे निर्देश कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. वसई विरार महापालिका येथे  जिल्ह्यातील कोव्हीड बाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री श्री भुसे बोलत होते यावेळी खासदार. राजेंद्र गावित,जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ. वसई  विरार महानगरपालिकेचे आयुक्त डी. गंगाथरण  तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा वाढवणे, ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवणे, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडचणी दूर करणे आदी विषयांचा आढावा      बैठकीत दिल्या.

जिल्ह्यात रेमिडिसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.  या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे लवकरच रेमिडिसिव्हिर साठा उपलब्ध होईल, असा विश्वासही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त . जिल्ह्यातील कोविड रुग्णांसाठी बेड वाढवण्यात येतील. यासंदर्भात निवासी डॉक्टरांच्या संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन सकारात्मक तोडगा काढण्याचा  प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री भुसे यांनी सांगितले.
 जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा वाढवणे, ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवणे, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडचणी दूर करणे आदी विषयांचा आढावा श्री भुसे यांनी घेतला.

Monday, April 19, 2021

फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’ बाबत आरोग्य विभागाची जनजागृती*

*फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’ बाबत आरोग्य विभागाची जनजागृती*

मुंबई,(प्रतिनिधी) दि. १९: कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी आरोग्य विभागाने भर दिला असून त्याबाबत नागरिकांचे प्रबोधन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी केले आहे.
राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत डॉ. व्यास यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेला सहा मिनिटे चालण्याच्या चाचणी बाबत अधिक जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. यामुळे नागरिकांना रक्तातील ऑक्सिजनची लपलेली कमतरता लक्षात येईल जेणे करून गरजू रुग्णाला वेळेवर रुग्णालयात दाखल करणे शक्य होईल, असे डॉ. व्यास यांनी सांगितले.
*चाचणी कोणी करावी*
ताप, सर्दी, खोकला अथवा कोरोनोची लक्षणे जाणवणारे व्यक्ती तसेच होम आयसोलेशनमध्ये असणारे रुग्ण ही चाचणी करू शकतात. 
*अशी करावी चाचणी*
ही चाचणी करण्यापूर्वी बोटात पल्स ऑक्सिमीटर लावून त्यावरील ऑक्सिजनची नोंद करावी. त्यांनतर ऑक्सिमीटर तसेच बोटात ठेवून घरातल्या घरात सहा मिनिटे चालावे (पायऱ्यांवर चालू नये). यादरम्यान अतिवेगात किंवा हळूहळू चालू नये तर मध्यम चालावे. सहा मिनिटे चालून झाल्यानंतर पुन्हा ऑक्सिजनच्या पातळीची नोंद घ्यावी.
सहा मिनिटे चालूनही ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले नाही तर तर तब्येत उत्तम असे समजावे. समजा ऑक्सिजन एक ते दोन टक्क्यांनी कमी होत असेल तर काळजी न करता दिवसातून पुन्हा दोन वेळा अशीच चाचणी करावी जेणेकरून काही बदल होतो का ते लक्षात येईल.
*चाचणीचा निष्कर्ष*
जर सहा मिनिटे चालल्यानंतर ऑक्सिजनची पातळी ९३ पेक्षा कमी होत असेल, चालणे सुरू करण्यापूर्वी जी पातळी होती त्यापेक्षा ३ टक्क्यांपेक्षा जास्त घट होत असेल किंवा सहा मिनिटे चालल्यानंतर दम, धाप लागल्या सारखे वाटत असेल तर त्या व्यक्तीला ऑक्सिजन अपुरा पडतो आहे, असे समजून त्याला रुग्णालयात दाखल करावे. 
ज्यांना बसल्याजागीच धाप, दम लागतो त्यांनी ही चाचणी करु नये, ६० वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती ६ मिनिटांऐवजी ३ मिनिटे चालुन ही चाचणी करू शकतात. 
🔴

Sunday, April 18, 2021

मनोर मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन संप्पन

मनोर मध्ये  शिबिराचे आयोजन संप्पन
मनोर मध्ये्ये्ध्य्य्य््य्य्य््ये्ये
(प्रतिनिधी)  दिनांक-१८/०४/२०२१ रोजी   मनोर पोलीस ठाणे, ग्रामपंचायत मनोर, ग्रामीण रुग्णालय मनोर व कच्छ युवक संघ पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने covid-19 च्या अनुषंगाने रक्ताचा पुरवठा सुरळीत सुरू राहावा. या अनुषंगाने covid-19 च्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करून जिल्हा परिषद शाळा मनोर येथे  सकाळी 09:00 ते 16:00 वा.  पावेतो     रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. 
सदर वेळी दिव्यांग नामे देवेन मनोज सोनार यांनी रक्तदान केले त्या वेळी मनोर ग्रामपंचायत सरपंच मॅडम सौ  पोर्णिमा दातेला व उप सरपंच मा श्री  नितिन भोई  माजी उप  सरपंच  मा श्री कैफ र ईस माजी उप सरपंच मा श्री  साजीद खत्तीब साहेब व  ग्रामपंचायत सदस्य मा श्री चेतन पाटील साहेब  व मा श्री दीपक जाधव व  सौ  बारी  मॅडम दशता कमिटी आध्यश मा श्री मोमेस र  ईस  दशता कमिटी उप आध्यश गणेश चं घोलप  मनोर पोलिस सहायक निरीक्षक साहेब मा श्री  प्रताप दराडे  उप निरीक्षक मॅडम रिजवाना ककेरी उप निरीक्षक मा श्री कोळी  साहेब  व मनोर गावातील सर्व पक्षांचे पदाधिकारी मा  राधेश्याम चौधरी  मा श्री सुमती जैन  मा श्री संतोष एढवनकर मा श्री  संतोष लोखंडे   मा श्री सुरेश जाधव मा श्री  रूभी बुरे  मा श्री रविस नाचन  मा श्री पुनित बारी मा श्री  प्रकाश जैन व नागरीक उपस्थित  रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असुन आपण सगळ्यांनी आसीच एकी असली तर आपण कोरोना या भयानक रोगाला हारवु शकतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत

Friday, April 16, 2021

जिल्ह्यात खत व बियाणे पुरवठ्याचे जिल्हास्तरीय गुण नियंत्रण कक्ष १५ मे पासून सुरू

जिल्ह्यात खत व बियाणे पुरवठ्याचे जिल्हास्तरीय गुण नियंत्रण कक्ष १५ मे पासून सुरू

 पालघर (प्रतिनिधी)दि.१६ : पालघर जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र 469699 हे. असून लागवडीयोग्य 147425 हे. आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 2537.20 मिमी. आहे. जिल्ह्यामध्ये भात व नागली हे प्रमुख पिक आहे. भात या पिकाखालील 79856 हे. क्षेत्र असून उत्पादकता 1864 कि./हे. आहे. नागली या पिकाखालील 11328 है. क्षेत्र असून उत्पादकता 841 कि./हे. आहे.

शेतकरी शेती उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा वापर करतो. मातीचे विश्लेषण करून पिकास आवश्यक असलेले खताचे व्यवस्थापन केल्यास उत्पादकतेमध्ये वाढ होते. बऱ्याच वेळा आवश्यकतेपेक्षा जास्त रासायनिक खताच्या वापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडते. आपल्या गावातील कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करून किंवा गावाच्या ग्राम पंचायतमध्ये गावाचा सुपीकता निर्देशांक लावला आहे जाणून घ्यावा त्यानुसार संतुलित खताचा वापर करावा. शेतकऱ्यांना पुरेश्या आणि योग्य दरात खते उपलब्ध व्हावित यासाठी कृषी विभागामार्फत मागणीनुसार खत विक्री करण्यासाठी परवाने दिली जातात. या खत विक्री केंद्रावरून POS मशीनद्वारे खताची विक्री करण्यात येते. खत विक्री केंद्रबार जाताना शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक सोबत ठेवावे व आपले आधारावरच खत खरेदी करावे असे आव्हान करणेत येत आहे. पालघर जिल्ह्यासाठी खरीप हंगाम 2021-22 मध्ये बताची 18221 मे.टन मागणी असून बाजारात मुबलक प्रमाणात खताची उपलब्धता करण्यात येईल. शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीनुसार आवश्यक खत विकत घ्यावे, अनावश्यक खत खरेदी करू नये असे आव्हान करणेत येत आहे. जिल्ह्यामध्ये भात बियाणे बाबतीत 20928 क्विंटल चे नियोजन केले असून महाबीज यांच्याकडे 3300 क्विंटल, उर्वरि 17628 क्विंटल हे खाजगी बियाणे कंपनीकडून पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. शेतकल्यांनी पावती घेऊनच बियाणे खरेदी करावे. तसेच बॅगवरील सील आणि टॅग लेबलची खात्री करावी. बियाणे, खताच्या दर्जा विषयी, उगवणी विषयी कोणत्याही तक्रारी असल्यास तालुकास्तरीय तसेच जिल्हास्तरीय गुणनियंत्रण कक्षास संपर्क साधावा. सदरचा कक्ष सकाळी 10.00 ते रात्री 7.00 वाजेपर्यंत खुला राहील. शेतकऱ्यांनी कृषी विभागातील गुणनियंत्रण निरीक्षक तथा कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. तरी अडी अडचणी असल्यास शेतकल्यांनी गुणनियंत्रण अधिकान्यांच्या संपर्कात राहावे असे आवाहन करण्यात येत आहे. सदरचा कक्ष 15 मे 2021 ते 15 जुलै 2021 पर्यंत कार्यरत राहील.

कृषी निविष्ठाविषयी असलेल्या अडचणी/तक्रारी सोडविण्यासाठी/मार्गदर्शनासाठी कृषी विभागाच्या तोल फ्री क्रमांक 18002334000 वर संपर्क साधावा.

Thursday, April 15, 2021

मच्छिमार भगिनींना कोविड कालावधीत आर्थिक सहाय्य देण्याची आमदार श्रीनिवास वनगा यांची मागणी**राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांचे कडे केली मागणी

*मच्छिमार भगिनींना कोविड कालावधीत आर्थिक सहाय्य देण्याची आमदार श्रीनिवास वनगा यांची मागणी*
*राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांचे कडे केली मागणी*
(पालघर) प्रतिनिधी

  राज्याचे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या यशस्वी नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्र राज्यात आहे. राज्यात कोविड-१९ या भयानक जागतीक महामारीच्या विरोधात यशस्वीपणे निर्धाराने लढा देत आहेत. आम्ही या लढ्यात एक शिवसैनिक म्हणून आपल्या सोबत सदैव आहोत. असे आमदार वनगा यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.  दि. १३ एप्रिल २०२१ रोजी रात्री ८:३० वाजता महाराष्ट्राच्या तमाम जनतेस करोना विरुध्दच्या लढाई साठी मुख्यमंत्री महोदयांनी मार्गदर्शन केले. व समाजातील अनेक गरिब गरजू घटकांना आर्थिक मदत अन्न धान्य देण्याचे जाहिर केले. त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये मोठा दिलासा मिळाला आहे.
आघाडी शासनाने गोर-गरीबांना नेहमीच मोठा आधार दिला आहे.  गोर-गरीबांसाठी महिनाभर शिवभोजन थाळी मोफत देण्याचे जाहिर केले आहे. तसेच सात कोटी जनतेला मोफत धान्यवाटप ३ किलो गहू व २ किलो तांदूळ प्रत्येकी देण्याचे ठरवले आहे. तीन आसनी रिक्षा चालक, फेरीवाले, गरीब आदिवासी बांधवांसाठी खावटी योजने अतंर्गत आर्थिक मदत जाहिर केली आहे. 
महोदय, ठाणे, पालघर व मुंबई सह किनारपट्टीवरील मच्छिमार बांधवांचे अनेक प्रश्न आहेत. कोविड काळामध्ये मासेमारी व्यवसाय सुद्धा धोक्यात आला आहे. माझ्या पालघर विधानसभा मतदार संघात केळवे ते धाकटी डहाणू परिसरातील मच्छिमार बांधव व भगिनींसाठी सुद्धा कोविड कालावधीत आर्थिक सहाय्य मिळावे अशी मच्छिमार समाजात मागणी जोर धरत आहे. या बाबत अनेक मच्छिमार समाजाच्या संस्था व संघटनांनी विनंती केली आहे.
सर्वसामान्य गरीब मच्छिमार भगिनी मासे विक्री करून आपला व आपल्या कुटूंबाचा चरितार्थ चालवतात. या कोविड-१९ च्या जागतीक महामारीच्या पार्श्वभुमीवर लॉकडॉउन कालावधीमध्ये शासनाकडून गरीब, गरजू, दारिद्र्य रेषे खालील मच्छिमार भगिनींना सुध्दा घरटी आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ देता येईल, याबाबत शासनाने सहानुभूतीपुर्वक विचार करावा. अशी मागणी शिवसेनेचे पालघर चे आमदार श्री.श्रीनिवास वनगा यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या कडे केली आहे.

दातीवरे येथे दिवसाढवळ्या जबरी चोरी.

दातीवरे  येथे दिवसाढवळ्या जबरी चोरी.
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) दिनांक १४ एप्रिल २०२१ हा दिवस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्साह दिवस. या दिवशी केंद्रसरकार, राज्यसरकार यांनी चाकरमान्यांना  ( सैन्य व पोलीस विभाग सोडून ) दिलेला आपला हक्काचा सण दिवस. यामुळे प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने त्याचा उपभोग घेत असतो .अनेक कुटूंबातील मंडळी सहपरिवार आपल्या घरांना कुलूपात बंद करून जातात. अश्या बंद घरांचा फायदा घेत अनेक ठिकाणी चोऱ्यांचे प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे. 
 समुद्र किनारी आणी वनराईने नटलेल्या दातीवरे ( ता,जि पालघर ) गावातील सत्वादेवी मंदिराच्या जवळपास राहणारे रूपेश शिवराम घरत, हे १४ एप्रिल रोजी आपल्या घरातील सर्व मंडळी सह सकाळी सुमारे ११ वाजेनंतर, काही कामानिमित्त बाहेरगावी गेले असताना, या संधिचा फायदा घेत, चोरट्यांनी त्याच्या बंद घराचे कुलुप तोडून, घरातील दागदागिने - रोख रक्कम  आदी सह घेऊन गेल्याचे त्यांना, ते संध्याकाळी सुमारे ६ च्या सुमारास घरी परत आले असताना घरांचे कुलूप तोडल्याचे निर्दशनास आले. घरात प्रवेश केल्यानंतर घरातील दागदागिने, रोख रक्कम आढळून न आल्यानंतर केळवा सागरी पोलीस ठाणे येथे धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. 
सदर घटनेत रूपेश घरत यांच्या घरातील एक मंगळसुत्र, चार अंगठ्या, चेन, कानातले सर्व दागिने सोन्याचे तसेच दहा हजार रूपये रोख असे एकूण २,५०,०००-/ रूपये ( अक्षरी दोन लाख पन्नास हजार रूपये ) यांची चोरी झाल्याची तक्रार सागरी पोलीस ठाणे येथे रूपेश घरत यांनी दिली असून सागरी पो, ठाणे केळवा येथे गुन्हा रजि, नं १७ /२०२१ ने व भा, द, सं, क ४५४,३८० या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून ,तपासणी अंमलदार श्री धनगर साहेब, हे श्री भीमसेन गायकवाड साहेब सहा,पो निरीक्षक यांच्या अधिपत्याखाली व वरिष्ठ अधिकारी पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहे.

वेडी पुण्यभूमीचा पर्यटनच्या माध्यमातून विकास करण्यासाठी पाठपुरावा करणार .सामाजिक कार्यकर्ते निलेश राऊत*

*वेडी पुण्यभूमीचा पर्यटन च्या माध्यमातून विकास करण्यासाठी पाठपुरावा करणार,*
*:-सामाजिक कार्यकर्ते निलेश राऊत*

(प्रतिनिधी) सफाळे
पालघर तालुक्यातील वेडी हे गाव ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले गाव आहे येथे खुद्द विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश समाजाची मोठी परिषद घेतली होती,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्य भूमी पर्यटन विकास योजनेचा माध्यमातून विकसित करून या विभागातील नागरिकाना रोजगार निर्मिती व। विकास दोन्ही गोष्टी सद्य होतील असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व मित्र फाउंडेशन चे अध्यक्ष निलेश राऊत यांनी सांगितले,
  यावेळी महामानवाला अभिवादन करण्यात आले,यावेळी दांडेकर कॉलेज चे माजी प्रा.झोडपे, माजी सरपंच कीर्ती शेलार,उपसरपंच अनंत जाधव,यासह वेडी ग्रामस्थ व मित्र फाउंडेशन चे पदाधिकारी उपस्थित होते,

Wednesday, April 14, 2021

तांदुळवाडी येथील शेतकर्‍यांच्या शेतीत अचानक लागली आग!शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळणार काय?

तांदुळवाडी येथील शेतकर्‍यांच्या शेतीत अचानक लागली आग!

शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळणार काय? 

सफाळे ( हिरालाल लोखंडे ) वातावरणातील हवामानात अचानक पणे होत असलेल्या  बदला मुळे काही ठिकाणी गरमा गरम उष्णतेच्या लाटा तर काही ठिकाणी वादळी वा-यासह पाऊस या मुळे शेतकरी आर्थिक दृष्टीने हतबल झालेला आहे. दिनांक १३ मार्च २०२१ रोजी दुपारी सुमारे दोन वाजता तांदुळवाडी ग्रामपंचायत ता,जि पालघर. हद्दीतील शेतकर्‍यांच्या शेतीत अचानक पणे आगीने उग्रस्वरूप धारण करून, येथील अंदाजे १० ते १५ एकर भागातील शेतकर्‍यांच्या शेतीतील लागवड केलेल्या नारळ, आंबा, पेरू, काजु, जांभूळ, फणस, तसेच शेतीत लागवड केलेली कडधान्य पिके - शेतात लागवड केल्यानंतर  पिकासाठी पाण्याच्या पुरवठा करणार्‍या पाईप लाइन, लाकूडफाटा आदि लागलेल्या अग्नीने आपले लक्ष करून शेतकर्‍यांना रस्त्यावर आणले आहे. 
  दिनांक १३ मार्च गुढीपाडवा, १४ मार्च आंबेडकर जयंतीनिमित्त निमित्ताने सरकारी अधिकारी - कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली नाही त्यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज होत नाही. नुकसान ग्रस्त शेतकर्‍यांनी घटनेची माहिती श्री रमेश चावरे सरपंच ग्रामपंचायत तांदुळवाडी यांना सांगताच सरपंच यांनी घटना स्थळी जाऊन पाहणी केली  व तलाठी सजा तांदुळवाडी यांना घडलेल्या प्रकाराची कल्पना दिली  आहे. शेतीच्या झालेल्या नुकसानीची श्री तलाठी साहेब पाहणी करून पंचनामा करणार आहेत असे सरपंच साहेब यांचे सांगणे आहे 
   सदर आगीत खालील शेतकरी १) आत्माराम पद्माकर पाटील, २) परशुराम विष्णू पालवा, ३) श्रीमती लक्ष्मीबाई आत्माराम पाळवा, ४) परशुराम दत्तात्रेय सोगले, ५) अंकुश केशव मोहनकर, ६) गंगाराम जान्या मोहनकर, ७) येश्या जान्या मोहनकर, ८) दत्तू धुरक्या पागी, ९) रणजीत गजानन कोरे, १०) सुभाष नारायण कोरे, ११) श्रीमती लक्ष्मीबाई लक्ष्मण चौधरी. या वरील सर्व शेतकर्‍यांनी आपापल्या शेतात लागवड केलेली फळझाडे, कडधान्ये आदीचे मोठ्याप्रमाणात नुकसानीची माहिती देत आहे. या बद्दल सफाळे पोलीस ठाणे यांनाही सरपंच साहेब यांनी माहिती दिली आहे

अंबोडे येथे कोविड साहित्य वाटप करून भीम जयंती साजरी

अंबोडे येथे कोविड साहित्य वाटप करून भीम जयंती साजरी
(प्रतिनिधी) पालघर
   आज अंबोडे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या भीम जयंती निमित्त अंबोडे ग्रामस्थांना कोविड महामारीच गांभीर्याबाबत माहिती देऊन ५०० मास्क आणि प्रत्येक घरात एक सॅनिटायजर बॉटल अश्या 90 बॉटल्स च वाटप सामाजिक कार्यकर्ते व मित्र फाउंडेशन या संस्थेच्या वतीने आयु.निलेश राऊत यांनी केले
    यावेळी केळवे पोलीस ठाण्याचे सहाययक पोलीस निरीक्षक मा.भीमसेन गायकवाड, अंबोडे गावचे माजी सरपंच व बौद्ध युवक मंडळाचे अध्यक्ष आयु.विनोद मोरे,जेष्ठ आयु.  वंदेश राऊत, अंबोडे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष आयु. महेश मस्के, मित्र फाऊंडेशन चे पदाधिकारी प्रदीप घरत,उचित पाटील,हरीश वझे,शेखर पाटेकर, युवा कार्यकते प्रणित राऊत,उल्हास राऊत,किरण जाधव,पोलीस पाटील मोहिते ताई,उपसरपंच नेहा कुर्ले,ग्रामस्थ, महिला,बौद्धचार्य, कार्यकर्ते उपस्थित होते,
  यावेळी बुद्धविहारात बुद्ध वंदना घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे मान्यवराच्या हस्ते पूजन करण्यात आले,त्यानंतर मित्र फाऊंडेशन व निलेश राऊत यांच्या वतीने कोविड साहित्य ग्रामस्थांना वाटण्यात आले,
गावातील नूतनीकरण करण्यात आलेल्या यशोदा वाचनालयाचे देखील औपचारिक उद्दगाठन करण्यात आले.
यावेळी गावातील विविध कामाची व कार्यक्रमाची माहिती जेष्ठ नेते आयु. विनोद मोरे यांनी करून दिली
सर्वांनी कोविड काळात मास्क घालावा व काळजी घ्यावी असे आवाहन निलेश राऊत यांनी उपस्थिताना केले,
कोविड महामारीचे गांभीर्य लक्षात घेऊन अत्यंत साध्या  व कोविड साहित्य वाटप करून अनोखी भीम जयंती साजरी करण्यात आली त्याबद्दल केळवे पोलीस ठाण्याचे सहाययक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी आयोजकांचे खास कौतुक केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मित्र फाउंडेशन कडून अनोखा उपक्रम**कोविड साहित्याचे केलं वाटप*

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मित्र फाउंडेशन कडून अनोखा उपक्रम*
*कोविड साहित्याचे केलं वाटप 

        पालघर (प्रतिनिधी)आज पालघर जिल्ह्यातील पालघर ग्रामीण रुग्णालय मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्त साधून पालघर जिल्ह्यातील कोविड महामारी काळात महत्त्वाची भूमिका पार पाडणारी १०८ रुग्णवाहिका कोविड-१९ व त्यातील कर्मचारी यांच्या सुरक्षितता साठी सामाजिक कार्यकर्ते श्री.निलेश राऊत यांच्या मित्र फाउंडेशन, पालघर या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ९ रुग्णवाहिका व बाईक अंमब्युलन्स साठी २५ लिटर सॅनिटायजर व ५०० मास्क  दिवसरात्र काम करणाऱ्या कर्मचारी व दैद्यकिय अधिकारी साठी देण्यात आले,  पालघर जिल्हा अति शल्यचिकित्सक डॉ.केळकर, 108 रुग्णवाहिका जिल्हा पर्यवेक्षक श्री.अमित वडे,मित्र फाउंडेशन चे श्री.उचित पाटील,श्री.हरीश वझे,श्री.शेखर पाटेकर तसेच १०८ रुग्णवाहिका चालक रविंद्र राऊत , शैलेश कातारे ,  विनायक किणी व डॉक्टर डॉ.राजेश राय , डॉ.अल्ताफ मंसुरी , व बाईक अंबुलन्स डॉ.ईश्वर उमतोल  आदी उपस्थित होते,
 यावेळी जिल्हा अति.शल्य चिकित्सक डॉ.केळकर यांनी श्री निलेश राऊत व त्यांच्या मित्र परिवार  यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले तर 108 अम्ब्युलन्स  पर्यवेक्षक श्री अमित वडे यांनी आभार मानले.

Tuesday, April 13, 2021

कोव्हीड नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ गुरसाळ यांनी रुग्णालयाला दिल्या सूचना . नागरिकांनी तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्यात

*कोव्हीड नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ गुरसाळ यांनी रुग्णालयाला दिल्या सूचना .                           *नागरिकांनी तातडीच्या नसलेल्या  शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्यात*

जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांचे आवाहन 

पालघर (प्रतिनिधी)दि.13 : सद्यस्थितीत राज्यात कोबीड १९ संसर्गाने बाधित रुग्ण आढळत असल्याने कोव्हीड रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आरोग्य यंत्रनेवरचा तान कमी करण्यासाठी  नागरिकांनी तातडीच्या नसलेल्या   शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी केले.    .  कोव्हीड रुग्णांवर मुख्यत्वे शासकीय रुग्णालय , संलग्न रुग्णालये व महानगरपालिका रुग्णालयांतून उपचार करण्यात येत आहेत. तथापि, दिवसेंदिवस बाधित रुग्णांची  संख्या लक्षात घेता, भविष्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही , कोव्हीड -19 बाधित रुग्णांच्या उपचारासाठी खाटा कमी पड़ू नये यासाठी रुग्णालयाला सूचना देण्यात आल्या आहेत.

या सूचना मध्ये  रुग्णालय यांनी तातडी नसलेल्या सर्व नॉन कोवीड शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्यात., रुग्णालयात पुरेसा मास्क, ग्लोज , पर्सनल प्रोटेक्शन किट व आवश्यक  औषधसाठा उपलब्ध करून ठेवण्यात यावा, ज्या नॉन कोवीड रुग्णांच्या बाबतीत परिस्थितीत पूर्णता; नियंत्रणाखाली आहे. तसेच गंभीर परिस्थिती नसलेल्या रुग्णांना (ज्यांना बाह्य रुग्ण उपचाराद्वारे रुग्ण सेवा देणे शक्य आहे.)

घरी सोडण्यात यावे व अशा प्रकारचे नवीन रुग्ण दाखल करून घेऊ नये., नॉन कोवीड अंतररुग्ण असलेल्या रुग्णा जवळ केवळ एकाच नातेवाईकास  थांबण्याची परवानगी देण्यात यावी.

, रुग्णालयात येणाऱ्या सर्व रुग्णांना शिंकणे, खोकणे याबाबतचे नियम पाळण्याची व मास्कचा वापर व हाताळणीबाबतची शास्त्रशुद्ध माहिती देणारे व कोवीड-१९ चा प्रादुर्भाव टाळण्याची दक्षता हात धुणे, अन्न सेवन व स्वत:ची व सभोवतालची स्वच्छता पाळणेबाबतची माहिती . याबाबतची भित्तीपत्रके रुग्णालयात लावावीत.

, सर्व रुग्णालयांच्या आवारात अथवा जवळपास औषधी दुकाने  त्यावर होणारी गर्दी नियंत्रणासाठी उपाययोजना करावी.


उपरोक्त सचूना साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या अधिसूचना व नियमावलीमधील तरतूदीनुसार  जिल्हास्तरीय, महापालिका क्षेत्रातील सर्व शासकीय महापालिका, धर्मदाय रुग्णालये व खाजगी रुग्णालये तसेच तालुका स्तरावर नगरपरिषद व नगरपंचायत व ग्रामीण क्षेत्रातील रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत.

आमदार सुनिल भुसारा यांनी आमदार निधीतून आरोग्य विभागास दिल्या १२ रुग्णवाहिका*


*आमदार सुनिल भुसारा यांनी आमदार निधीतून आरोग्य विभागास दिल्या १२ रुग्णवाहिका*

         जव्हार(प्रतिनिधी)   जव्हार मोखाडा विक्रमगड वाडा या तालुक्यात दुर्गम भाग अधिक असून आरोग्य विभागावर असलेला ताण आणि अपुऱ्या सोयीसुविधा यामुळे रुग्णांना लवकर मदत मिळणे थोडे जिकरीचे होते. परिणामी कधी कधी रुग्णास आपला जीव गमवावा लागतो यामुळे ही अडचण दूर व्हावी व प्रशासनावरील थोडा ताण  हलका व्हावा या हेतूने विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनिल भुसारा यांनी  १२ रुग्णवाहिका आपल्या आमदार निधीतून दिल्या असून त्याचा नुकताच छोटेखानी लोकार्पण सोहळा  जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ निवासी जिल्हाधिकारी किरण  महाजन,नगराध्यक्षा डॉ.उज्वला काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दयानंद सुर्यवंशी इ मान्यवरांच्या हस्ते पालघर येथे झाले आहे. 

 १२ पैकी 9 रुग्णवाहिका या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास देण्यात आल्या त्यात मोखाडा तालुक्यातील आसे, खोडाळा, सुर्यमाळ  जव्हार तालुक्यातील साखरशेत, वावर विक्रमगड  तालुक्यातील तलवाडा , मलवाडा तर  वाडा तालुक्यातील गोर्‍हे, खानिवली या प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात आल्या. तर तीन रुग्णवाहिका जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयास देण्यात  आल्या .त्यात जव्हार उपजिल्हा रुग्णालय, विक्रमगड ग्रामीण रुग्णालय, वाडा ग्रामीण रुग्णालय यांचा समावेश आहे
    या भागात  आजारामुळे मरणाचे प्रमाण शुन्यावर यावे यासाठी माझा प्रयत्न असून माझ्याकडील निधीतून जास्तीत जास्त आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करणार असल्याचे भुसारा यांनी यावेळी सांगितले. 
यावेळी प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
              आमदार सुनील भुसारा यांच्या या कार्याबद्दल जिल्हाधिकारी आणि सर्व प्रशासनाने  त्यांचे अभिनंदन केले.

Sunday, April 11, 2021

कोविडचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी कडक निर्बंध आवश्यक; सर्वांच्या सूचनांचाही विचार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

*कोविडचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी कडक निर्बंध आवश्यक; सर्वांच्या सूचनांचाही विचार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*
सर्व पक्षांनी एकमुखाने शासनाच्या निर्णयांना सहकार्य करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई (प्रतिनिधी)दि. 10: कोविडचे अनर्थचक्र थांबवायचे असेल आणि झपाट्याने वाढणारा संसर्ग थोपवायचा असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील, विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या सूचनांचाही निश्चितपणे विचार केला जाईल. मात्र सर्व पक्षांनी एकमुखाने याबाबतीत राज्य सरकार घेत असलेल्या निर्णयांना सहकार्य करावे व लोकांमध्ये जागृती निर्माण करावी. ही लढाई कोरोनाने आपल्यावर लादलेली असून लोकांच्या जीवाला पहिले प्राधान्य द्यावेच लागेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्यातील कोविड परिस्थिती आणि उपाययोजना यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी ऑनलाईन बैठकीत संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे-पाटील, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, अमित देशमुख, तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील आदींनी सहभाग घेऊन आपल्या सूचना मांडल्या.
प्रारंभी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी कोविड परिस्थिती आणि निर्माण झालेल्या आव्हानाला शासन कसे तोंड देत आहे त्याची माहिती दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले, कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील. आपल्याला प्रथम जीव वाचविण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही जर आरोग्याची आणीबाणी असेल तर प्राधान्य हे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला असले पाहिजे.  विरोधी पक्षनेत्यांनी दिलेल्या सूचनांवर निश्चितपणे गांभीर्याने विचार  केला जाईल, त्यांनी चांगल्या सूचना मांडल्या आहेत. विशेषत: रेमडेसिव्हीर उपलब्धता, चाचण्यांचे रिपोर्ट लवकर मिळणे, प्रयोगशाळाना यासाठी सूचना देणे, ऑक्सिजन उपलब्ध व्हावा म्हणून काटेकोर नियोजन अशा त्यांच्या सूचनांवर शासन कार्यवाही करेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आपण सर्वसमावेषक नियोजन करू तसेच सर्व घटकांचा यात विचारही करू पण आता या क्षणी वेगाने वाढणारी रुग्णवाढ थांबवायची कशी हा प्रश्न आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये लोक घरी होते. त्यामुळे रुग्ण व रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे सोपे होते. आता जेव्हा की सर्व खुले झाले आहे तेव्हा यात व्यावहारिक अडचणी येतात ते केंद्राने समजून घ्यावे.
हातावर पोट असणाऱ्या वर्गाची सगळ्यांनाच चिंता,
मुख्यमंत्री म्हणाले, एकीकडे लसीकरण वाढविण्याची खूप गरज आहे. यूकेने दोन महिने आधीच कडक लॉकडाऊन केला पण त्या काळात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवून नागरिकांना संरक्षित केले. आज युवा पिढीला लस देण्याची गरज आहे. फायझर कंपनी तर १२ ते १५ वयोगटातील मुलांना लस देण्याचे नियोजन करतेय. कडक निर्बंध लावताना गरीब, श्रमिक, हातावर पोट असणाऱ्या वर्गाला त्रास होऊ नये ही सर्वांचीच  भूमिका आहे. त्यादृष्टीने जरुर विचार झाला पाहिजे आणि केला जाईल पण दररोज झपाट्याने वाढणारा संसर्ग आणि रुग्णवाढ काहीही करून प्रथम रोखणे अतिशय गरजेचे आहे.
सर्वानुमते एकमुखाने निर्णय घेऊन या संकटावर मात कशी करावी ते ठरविले पाहिजे. यासाठी लोकांमध्ये आपण सर्व पक्षांनी जागृती केली पाहिजे. रुग्णसंख्या इतक्या वेगाने वाढते आहे की, आज आपण लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला नाही तर उद्या आपोआपच लॉकडाऊनसारखी परिस्थिती उद्भवेल. कोरोना सर्वानांच टार्गेट करीत आहे. त्यात सगळे आले. हातावर पोट असलेला वर्ग सगळ्या विभागांत आणि क्षेत्रात आहे त्यामुळे विचार करायचा तर सगळ्यांचाच करावा लागतो. आज परिस्थिती बिकट बनत चालली आहे. टास्क फोर्सच्या तज्ञांचे म्हणणेदेखील आम्ही सातत्याने विचारात घेत आहोत. एका बाजूला जनभावना आहे पण दुसऱ्या बाजूला कोरोनाचा उद्रेक आहे , अशा परिस्थितीत ही लढाई जिंकायची असेल तर थोडी कळ तर काढावीच लागेल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मी गेल्या काही दिवसांपासून विविध क्षेत्रातील लोकांशी बोलतो आहे, काल मी खासगी रुग्णालयांच्या संचालकांशी पण बोललो. राज्य शासनाला सहकार्य करण्याची सगळ्यांची तयारी आहे. सर्व पक्षीय नेत्यांना माझे आवाहन आहे की राज्यातील जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन जो काही निर्णय घेतला जाईल त्याला आपले सहकार्य द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील यांनी आपल्या सूचना मांडल्या. रेमडेसिवीर उपलब्धता, ऑक्सिजन नियोजन, लॉकडाऊन लावण्यापूर्वी संतुलित भूमिका घेणे आदी विषय त्यांनी मांडले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबविण्यासाठी कडक पावले उचलावी लागतील तसेच या औषधाचा अतिरेकही थांबवावा लागेल.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रत्येक नगरपरिषद व पालिकेकडे लिक्विड ऑक्सिजन साठा टँक उभारण्यासाठी आवश्यक तो निधी देऊन तात्काळ कार्यवाही करावी असे सुचविले.
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ऑक्सिजन कमतरता वाढल्याने प्रश्न उद्भवले असून कडक निर्बंध लावून रुग्ण वाढ रोखावी असे सांगितले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, तसेच आमदार नाना पटोले, प्रधान सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास. डॉ तात्याराव लहाने यांनीदेखील विचार मांडले.

जिल्हयातील समर्पित कोव्हीड रुग्णालयात वाढ


*जिल्हयातील समर्पित कोव्हीड  रुग्णालयात वाढ*
    पालघर (प्रतिनिधी) पालघर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून उपलब्ध असलेली सुविधा रुग्णांसाठी अपुरी पडत आहे. त्यामुळे आरोग्य सुविधेवर ताण पडत असून  जिल्हा शल्य चिकित्सक यांनी खाजगी रुग्णालयांनी कोव्हीड रुग्णांवर उपचार करण्यासाठी तयारी दर्शीविली असल्याचे सांगितले आहे.त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांनी पालघर जिल्ह्यातील काही खाजगी रुग्णालयांमध्ये समर्पित कोव्हीड रुग्णालय म्हणून  उपलब्ध करून देण्यासाठी आदेश दिले आहेत.तर  काही ग्रामीण रुग्णालयांमधील कोव्हीड बेड वाढवण्यात आले आहेत.
त्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.चंद्रकांत वाघमारे, पालघर प्रांत अधिकारी धनाजी तोरस्कर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र केळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी,  डहाणू तहसिलदार राहुल सारंग, तालुका आरोग्य अधिकारी पालघर डॉ.अभिजित खंदारे,  तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गाडेकर, गटविकास अधिकारी डहाणू बी.एच.भरक्षे,  यांनी आज सदर ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
   अधिकारी लाईफ लाईन बेटेगाव बोईसर येथे ६० खाटांचे, फिलिया हॉस्पिटल ५० खाटा, वरद हॉस्पिटल बोईसर ५० खाटा, रिलीफ हॉस्पिटल पालघर ४० खाटा तर शारदा हॉस्पिटल विक्रमगड येथे ४०  खाटांचे कोव्हीड केअर सेंटर तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
तर पालघर ग्रामीण रुग्णालय येथे २० खाटा उपलब्ध आहेत त्यात १० वाढवण्यात आल्या आहेत.डहाणू उपजिल्हा रुग्णालय येथे १६ खाटा आहेत त्यात १८ वाढवण्यात आल्या आहेत.तर वाणगाव ग्रामीण रुग्णालय येथे ३० खाटांची सुविधा आहे त्यात १० वाढवण्यात आल्या आहेत.

Saturday, April 10, 2021

सफाळे - अवैध दारू वाहतूक, एकास अटक.

सफाळे -  अवैध दारू वाहतूक, 
एकास अटक. 
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) कोव्हिड १९ विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीचा मा. मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्या कडील ४ मार्च २०२१ च्या आदेशान्वये राज्यात कडक निर्बंध असताना. व मा. जिल्हाधिकारी पालघर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे कार्यालयाकडील जा. क्र. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पालघर / कारोना / विषाणू / ब्रेक दि चेन / आदेश / कावी - ६१ / २०२१ दिनांक ५ एप्रिल २०२१ आदेशांचे उल्लंघन करून, आपल्या ताब्यातील मारुती झेन गाडीतून दिनांक ९ मार्च २०२१ रोजी अनिकेत राजेंद्र पाटील वय वर्ष २९ राहणार अब्दुल बिल्डींग, भारत गॅस एजन्सी जवळ सफाळे पुर्व ता,जि पालघर. हा दुपारी सुमारे एक ते दीडच्या वेळेत नुतन नगर जवळ माकणे - सफाळे रोड  सफाळे पश्चिम येथून जात असताना,सफाळे पोलिस ठाणे येथील कार्यरत कर्मचारी यांनी पाहिले असताना, तो आपल्या ताब्यातील सिल्व्हर रंगांच्या मारूती झेन. गाडी क्रमांक एम,एच, ०४ बी डब्ल्यू ४८३८ भरधाव वेगाने  जाताना आढळून आला असताना, त्यास थांबवून घेतले असताना, त्याच्या गाडीत स्वतःच्या फायद्यासाठी अवैध रित्या गोवा बनावटीची दारू मिळुन आली आहे. 
    १)  Royal Stag - 750 - ml - 29 बाटल्या. 
     २ ) Blender's Pride - 750 - ml -18  बाटल्या 
     ३ ) McDonald's no 1 - 750 -  ml - 05 बाटल्या 
      ४ ) Impiril blue - 180 my - 76 बाटल्या 
     ५ ) Royal Challenge - 750 - my - 24  बाटल्या मिळुन  आल्या आहेत. 
  सफाळे पोलीस ठाणे ता,जि पालघर येथे गुन्हा रजि, नंबर २२ /२०२१ महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ - अ सह भारतीय दंड संविधान कलम १८८ सह, मो. वा. का.कलम १८४ अन्वये सफाळे पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आली असून न वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मारूती झेन गाडी व मिळून आलेला मुद्देमाल ( दारूच्या बाटल्या ) असा एकुण २,३३,०३४ /- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी अनिकेत राजेंद्र पाटील यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास श्री पंकज पाटील साहेब, पोलीस उपनिरीक्षक सफाळे , मा.संदिप कहाळे साहेब - सहाय्यक पोलीस निरीक्षक सफाळे पो स्टेशन यांच्या अधिपत्याखाली व वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शनाने आपल्या कर्मचारी वर्गाच्या सहयोगाने पुढील तपास करीत आहे.

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...