अंबोडे येथे कोविड साहित्य वाटप करून भीम जयंती साजरी
(प्रतिनिधी) पालघर
आज अंबोडे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या भीम जयंती निमित्त अंबोडे ग्रामस्थांना कोविड महामारीच गांभीर्याबाबत माहिती देऊन ५०० मास्क आणि प्रत्येक घरात एक सॅनिटायजर बॉटल अश्या 90 बॉटल्स च वाटप सामाजिक कार्यकर्ते व मित्र फाउंडेशन या संस्थेच्या वतीने आयु.निलेश राऊत यांनी केले
यावेळी केळवे पोलीस ठाण्याचे सहाययक पोलीस निरीक्षक मा.भीमसेन गायकवाड, अंबोडे गावचे माजी सरपंच व बौद्ध युवक मंडळाचे अध्यक्ष आयु.विनोद मोरे,जेष्ठ आयु. वंदेश राऊत, अंबोडे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष आयु. महेश मस्के, मित्र फाऊंडेशन चे पदाधिकारी प्रदीप घरत,उचित पाटील,हरीश वझे,शेखर पाटेकर, युवा कार्यकते प्रणित राऊत,उल्हास राऊत,किरण जाधव,पोलीस पाटील मोहिते ताई,उपसरपंच नेहा कुर्ले,ग्रामस्थ, महिला,बौद्धचार्य, कार्यकर्ते उपस्थित होते,
यावेळी बुद्धविहारात बुद्ध वंदना घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे मान्यवराच्या हस्ते पूजन करण्यात आले,त्यानंतर मित्र फाऊंडेशन व निलेश राऊत यांच्या वतीने कोविड साहित्य ग्रामस्थांना वाटण्यात आले,
गावातील नूतनीकरण करण्यात आलेल्या यशोदा वाचनालयाचे देखील औपचारिक उद्दगाठन करण्यात आले.
यावेळी गावातील विविध कामाची व कार्यक्रमाची माहिती जेष्ठ नेते आयु. विनोद मोरे यांनी करून दिली
सर्वांनी कोविड काळात मास्क घालावा व काळजी घ्यावी असे आवाहन निलेश राऊत यांनी उपस्थिताना केले,
कोविड महामारीचे गांभीर्य लक्षात घेऊन अत्यंत साध्या व कोविड साहित्य वाटप करून अनोखी भीम जयंती साजरी करण्यात आली त्याबद्दल केळवे पोलीस ठाण्याचे सहाययक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी आयोजकांचे खास कौतुक केले.
No comments:
Post a Comment