सफाळे पोलीस व्दारा, रेती चोराविरोधात कारवाई.
दोन आरोपींना अटक.
सफाळे ( हिरालाल लोखंडे ) दिनांक २० एप्रिल २०२१ रोजी रात्री दहाच्या सुमारास, पारगांव दारशेत रोडवरील खोरीचापाडा येथील पुलावर एक निळ्या रंगाचा आयवा ट्रक ( क्रमांक एम. एच. ०३ / सी व्ही ९०२४ ) उभा असताना, तपासणी केली असताना, शासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी स्वतः जवळ नसताना, अनाधिकृत पणे विनापरवानगी गौण खनिज ( रेती ) ट्रक मधे, स्वतःच्या फायद्यासाठी भरून वाहतूक करताना, १) ट्रक चालक -- राजकुमार नरेश गौतम वय वर्ष २९ , राहणार घोडबंदर गाव, ता.जि.ठाणे. २) ट्रक मालक -- हणमंत कचरू गायकवाड वय वर्ष ४१, राहणार पंतनगर घाटकोपर पुर्व मुंबई मिळून आले .तसेच ट्रक चालक व ट्रक मालक यांनी पारगांव ते दारशेत कडे जाणार्या सार्वजनिक रस्त्यावर स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी, ट्रक मधील वाळूचे पाणी पडल्याने रस्त्यावर चिखल होऊन ,रस्त्याची सुरक्षिततेला बाधा निर्माण होईल, याची जाणीव असून सुध्दा रस्त्याची खराबी केला, म्हणून भारतीय दंड विधान संहिता कलम ३७९,४३१,३४ प्रमाणे व महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सन १९६६ चे कलम ४८ ( ७ ),४८ ( ८ ) प्रमाणे सफाळे पोलीस ठाणे ता,जि पालघर येथे गुन्हा रजि, क्रमांक । २३ / २०२१ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपींना ( चालक व मालक ) अटक करण्यात आलेली आहे.
सदर गुन्ह्यात १) एक निळ्या रंगाचा आयवा ट्रक ( क्रमांक एम एच. ०३ / सी व्ही /९०२४ अंदाजे किंमत १५,००,०००/-रूपये, २) ट्रक मध्ये असलेली ६ ब्रास रेती,( गौण खनिज ) अंदाजे किंमत ६०,०००/- रूपये असा एकूण १५,६०,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. श्री संदीप कहाळे सहा,पो निरीक्षक, प्रभारी अधिकारी सफाळे पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सफाळे पोलीस ठाणेचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी कारवाई केली आहे.
No comments:
Post a Comment