Wednesday, September 30, 2020

दिग्गज वार्ताहर* बातम्यादिनांक :- ०१.ऑक्टोबर २०२०वार। :- गुरुवार

*दिग्गज वार्ताहर* बातम्या
दिनांक :- ०१.ऑक्टोबर २०२०
वार।    :- गुरुवार

● केंद्राकडून अनलॉक-५ ची घोषणा : शाळा, चित्रपटगृह सुरू करण्यास परवानगी; चित्रपटगृहात ५० टक्के प्रेक्षकांनाच प्रवेश देता येणार 

● शाळा-महाविद्यालयांना केंद्राची १५ ऑक्टोबरपासून परवानगी; निर्णयाची जबाबदारी राज्य सरकारांकडे सोपविली

● केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; 'यूपीएससी'च्या प्राथमिक फेरीची परीक्षा 4 ऑक्‍टोबर रोजी होणार 


● अंत्यसंस्काराला जाण्यापासून रोखण्यासाठी पीडितेच्या घरातील महिलांना पोलिसांकडून मारहाण; पीडितेच्या वहिनीने प्रसारमाध्यमांशी बोलताना पोलिसांवर केला आरोप 

● राज्यात दिवसभरात १८ हजार ३१७ नवे कोरोनाबाधित आढळले, तर १९ हजार १६३ जणांची कोरोनावर मात, ४८१ रुग्णांचा मृत्यू; राज्याचा रिकव्हरी रेट ७८.६१ वर पोहचला 

● महाबळेश्वरला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाल्याने विकासाला चालना; महाबळेश्वरला ब’ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून मान्यता

● भारताच्या ‘फेलुदा’ कोविड चाचणीत नेदरलँडला स्वारस्य; वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन मंडळ (सीएसआयआर) शी पत्रव्यवहार; चाचणी संचाबाबत चौकशी

● न्यायाधीश निवडीचा अधिकार विद्यमान अध्यक्षांनाच; वादविवाद चर्चेत विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

● RR vs KKR: कोलकाताने रोखला राजस्थानचा विजय रथ; ३७ धावांनी विजय; कोलकाताचा हा या मोसमातील दुसरा विजय तर राजस्थानचा पहिला पराभव 

● अभिनेता अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब' चित्रपट ९ नोव्हेंबरला ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युएई मधील चित्रपटगृहात या देशांमध्ये मोठ्या पडद्यावर रिलीज होणार

Tuesday, September 29, 2020

दिग्गज वार्ताहर * बातम्यादिनांक:- ३०.सप्टेंबर २०२०वार :- बुधवार

*दिग्गज वार्ताहर * बातम्या
दिनांक:- ३०.सप्टेंबर २०२०
वार     :- बुधवार

● ‘एकतर्फी ठरवलेली १९५९ सालची LAC अजिबात मान्य नाही’, भारताने चीनला स्पष्टपणे सांगितलं; कठोर शब्दात चीनचा दावा फेटाळला...

● उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची बाधा; व्यंकय्या नायडू यांच्या पत्नी उषा यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह


● काळा पैसा जमा करण्याचा आणखी एक मार्ग बंद झाला, म्हणून 'ते' शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत; शेती कायद्यांच्या विरोधकांवर पंतप्रधान मोदींची टीका

● दहा वर्षांपुढील १५ पैकी १ व्यक्ती कोरोनाबाधित; दुसऱ्या देशव्यापी सीरो सर्वेक्षणात निष्कर्ष; १८ वर्षांहून जास्त वयोगटातील ७.१ टक्के व्यक्तींना कोरोनाची बाधा

● सिरम इन्स्टिट्युट लशीचे १० कोटी अतिरिक्त डोस तयार करणार; सीरम इन्स्टिट्युटने मंगळवारी केली घोषणा


● पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील ४०४ सेवेकऱ्यांना कोरोनाची लागण; जगन्नाथ मंदिरातील पूजाअर्चा चालू असून सध्या कुणीही सेवेकरी उपस्थित नाहीत

● महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये १९ हजार २१२ रुग्णांची कोरोनावर मात, तर १४ हजार ९७६ नवे कोरोनाबाधित मागील २४ तासांमध्ये आढळले

● अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा (NASA)च्या शास्त्रज्ञांचा मंगळ ग्रहावर पाण्याचा स्त्रोत असल्याचा दावा; वैज्ञानिकांनी मंगळच्या जमीनीखाली तीन सरोवर असल्याचा केला दावा  

● IPL 2020: राशिदच्या फिरकीपुढे दिल्लीकर हतबल, हैदराबादचा पहिला विजय; १५ धावांनी हार पत्करावी लागली, बेअरस्टोची अर्धशतकी खेळी, राशिद खानचे ३ बळी

● लॉकडाऊनमध्ये गरजूंची मदत केलेल्या अभिनेता सोनू सूदला संयुक्त राष्ट्राकडून प्रतिष्ठित SDG Special Humanitarian Action Award पुरस्काराने सन्मानित

राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व आगारांमधून

राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व आगारांमधून

पास, स्मार्ट कार्ड कार्यप्रणाली, नोंदणीकरण, नूतनीकरण प्रक्रिया सुरु

 

अलिबाग,जि.रायगड दि.28(जगधिश घरत) :-  राज्य परिवहन महामंडळाची जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व आगारांमधून विद्यार्थी पास, ज्येष्ठ नागरिक, मासिक, त्रैमासिक पास, आवडेल तेथे प्रवास पास, स्मार्ट कार्ड कार्यप्रणाली, नोंदणीकरण, नूतनीकरण व टॉपअप अशा सर्व  प्रक्रिया सुरु करण्यात आल्या असून स्मार्ट कार्ड नोंदणीकरण पूर्ववत सुरु करण्यात आले आहे.

या प्रक्रिया आगारातील बसस्थानकावरील स्मार्ट कार्ड वितरण केंद्रावर कोविड-19 बाबतच्या शासन निर्णयाचे पालन करुन करण्यात येणार आहे. इच्छुक प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, रायगड विभागाच्या विभाग नियंत्रक श्रीमती अनघा बारटक्के यांनी केले आहे.

वाहतूक नियंत्रण अधिसूचना यांना करण्यात येत आहे.

वाहतूक नियंत्रण अधिसूचना यांना करण्यात येत आहे.

पालघर :-ज्याअर्थी उपोद्घातातील अ.क्र.१ वर अंतर्भुत असलेल्या पत्रान्वये पालघर पोलीस ठाण्याचे हद्दीत दिनांक ३०/०९/२०२० ते दि.०१/१०/२०२० रोजी पावेतो मा.जिल्हादंडाधिकारी पालघर यांनी दांडेकर कॉलेज, खारेकुरण रोड, पालघर या ठिकाणी पालघर जिल्ह्याच्या प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यांवरील (CZMP) अनुषंगाने जनसुनावणी घेण्यात येणार आहे. सदर पालघर जिल्ह्याच्या प्रारुप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यांवरील (CZMPs) ला स्थानिक मच्छिमार तसेच इतरांचा विरोध असल्याने सदर जनसुनावणीस मोठ्या प्रमाणात जन समुदाय उपस्थित राहुन गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. करीता पालघर खारेकुरण रोड वरील वाहतुक बंद करणेकामी वाहतुक अधिसूचना निर्गमित होणेस विनंती केलेली आहे.

त्याअर्थी मी डॉ.किरण महाजन, अपर जिल्हादंडाधिकारी पालघर मला उपोदघातातील अ.क्र.३ व ४ अन्वये

प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन खालील प्रमाणे वाहतुक नियंत्रण अधिसूचना जारी करीत आहे.

पर्यायी मार्ग

१. पालघर-बोईसर कडून खारेकुरणकडे जाणारी वाहतुक गोठणपूर नाका- चार रस्ता-डॉ.आंबेडकर चौक टेंभोडे चाफेकर कॉलेज मार्गे खारेकुरण. २. खारेकुरण गांवाकडून येणारी वाहतुक खारेकुरण-चाफेकर कॉलेज रोड, टेंभोडे-डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मार्ग

पालघर शहर.

उपरोक्त मार्गावर बुधवार दिनांक ३०/०९/२०२० रोजी सकाळी ०८.०० वा ते जनसुनावणीची प्रक्रिया संपे पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांस प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदरची वाहतुक नियंत्रण अधिसूचना ही पोलीस वाहने, महसूल विभागाची वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहने, पोलिसांनी परवानगी दिलेली वाहने, उपविभागीय दंडाधिकारी व तालुका दंडाधिकारी यांनी परवानगी दिलेली वाहने तसेच जनसुनावणी आयोजकांच्या वाहनांना लागू राहणार नाही,

सदरची बाहतुक नियंत्रण अधिसूचना बुधवार दिनांक ३०/०९/२०२० रोजी सकाळी ०८.०० वा ते

जनसुनावणीची प्रक्रिया संपे पर्यत अंमलात राहील,

वृत्त क्रमांक :-1241 दिनांक :- 29 सप्टेंबर, 2020*स्वदेस फॉउंडेशन मार्फत जागतिक हृदयरोग दिवस साजरा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा विशेष सहभाग*

वृत्त क्रमांक :-1241                                                                              दिनांक :- 29 सप्टेंबर, 2020
*स्वदेस फॉउंडेशन मार्फत जागतिक हृदयरोग दिवस साजरा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा विशेष सहभाग*
अलिबाग,जि.रायगड दि.29 (जागधिश घरत) :-  आज दि.29 सप्टेंबर या जागतिक हृदयरोग  दिवसाचे औचित्य साधून स्वदेस फाऊंडेशन तर्फे हृदयरोग शस्रक्रिया झालेल्या मुलांसोबत तसेच पालकांसोबत  डिजिटल झूम अँप  च्या माध्यमातून संवाद साधण्यात आला. 
        या कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे, स्वदेस फौंडेशनचे संस्थापक रॉनी स्क्रूवाला, झरीना स्क्रूवाला, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, वोक्हार्ट हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मनीष चोखान्द्रे, स्वदेस फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मंगेश वांगे, महाव्यवस्थापक तुषार इनामदार, महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्र यादव उपस्थित होते.
     पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी स्वदेस फॉउंडेशन तर्फे लहानमुलांच्या जन्मजात हृदयरोग तपासणी व शस्रक्रिया कार्यक्रमाचे  कौतुक केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले व हृदयाचे ऑपरेशन झालेल्या मुलांना शुभेच्छा दिल्या.
        स्वदेस फौंडेशनने गेल्या पाच वर्षात फोर्टिस हॉस्पिटल, व्होकार्ट हॉस्पिटल, रहेजा हॉस्पिटल  आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम- महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त सहकार्याने रायगड जिल्ह्यातील पोलादपूर, महाड, माणगाव, तळा , म्हसळा, श्रीवर्धन आणि सुधागड  या सात तालुक्यांमधील जन्मजात हृदयरोग असलेल्या मुलांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून जीवनदान दिले आहे. स्वदेस फाऊंडेशन मार्फत जन्मजात हृदयरोग असलेल्या मुलांच्या शस्त्रक्रियासाठी आर्थिक मदत त्याचबरोबर हॉस्पिटलला जाण्या-येण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात येते. तपासणीचा खर्च सुद्धा स्वदेसमार्फत केला जातो.  याचबरोबर पालकांना समुपदेशन करून, योग्य सल्ला देऊन पालकांना आधार देण्याचे काम स्वदेस करीत आहे. गेल्या पाच वर्षात 704 मुलांची तपासणी करण्यात आली असून 144 मुलांवर हृदयरोगाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
        या कार्यक्रमाचे व्यवस्थापन स्वदेस फॉउंडेशनचे आरोग्य व्यवस्थापक डॉ.सचिन अहिरे, सुधीर वाणी, भावना पांडे ,समीर मोरे,अर्जुन बनकर तसेच स्वदेस आरोग्य विभागाचे समन्वयक यांच्यामार्फत करण्यात आले.
००००००

माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेचा दादडे येथे शुभारंभ

*'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेचा दादडे येथे शुभारंभ*

पालघर (निलेश भोईर) 
महाराष्ट्र शासनामार्फत दि .१५ / ० ९ / २०२० ते २५/१०/२०२० पर्यंत राबविण्यात येणाऱ्या " माझे कुटुंब माझी जबाबदारी " या मोहीमेचा शुभारंभ दि .२८/०९/ २०२० रोजी मौजे दादडे येथे पार पडला . 
  सदर मोहीमेचे उदघाटन पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा  भारतीताई कामडी यांच्या हस्ते करण्यात आले . कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा सभापती आरोग्य व शिक्षण समिती निलेश सांबरे आणि पालघर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी  सिध्दाराम सालीमठ ( भा.प्र.से. ) उपस्थित होते .
Track, test & treat या त्रिसूत्री चा वापर करून प्रशासन या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी झटत आहे तरी जनतेने 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहन  जि.प अध्यक्ष यांनी केले.
सर्व कर्मचाऱ्यांची स्तुती करताना उपाध्यक्ष निलेश सांबरे  यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने अशा कठीण प्रसंगी कौतुकास्पद कार्य केले आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी न डगमगता कोरोनाच्या काळात आपले कार्य पार पडले. 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम संपूर्ण पालघरमध्ये यशस्वीरीत्या राबवून जिल्ह्याचा आदर्श महाराष्ट्र राज्यासमोर ठेवण्यात येईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
सॅनिटायजर ,मास्क आणि सामाजिक अंतराचे  पालन करणे ही काळाची गरज आहे असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यावेळी नमूद केले व कार्यक्रमास जन सहभागातून यश असल्याने स्वयंसेवकांचा सहभाग वाढविण्यासाठी सन्माननीय  उपस्थित लोकप्रतिनिधीना विनंती केली. कार्यक्रमास जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
सदर कार्यक्रमास विक्रमगड तालुक्याचे तहसिलदार श्रीधर गालीपेल्ली , पंचायत समिती उप सभापती  नम्रता गोवारी , जि.प.सदस्य  संदेश ढोणे,  गणेश कासट उपस्थित होते . 
सदर कार्यक्रम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . दयानंद सुर्यवंशी यांनी आयोजीत केला होता .तर कार्यक्रमाचे सुत्र संचालन डॉ . श्रीकांत दत्तात्रय कुलकर्णी, डॉ . गणेश आहेर , डॉ . विजय ठक्कर  यांनी केले . 

यावेळी दादडे येथील ग्रामस्थ , आशा कार्यकर्ती , अंगणवाडी कार्यकर्ती , आरोग्य कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते . 

कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन डॉ . सागर पाटील अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा पालघर यांनी केले .

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना अंमलबजावणीकरीता* *जिल्हास्तरीय मंजुरी व सनियंत्रण समिती स्थापन

*प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना अंमलबजावणीकरीता* 
*जिल्हास्तरीय   मंजुरी व सनियंत्रण   समिती स्थापन*


पालघर (रवि राठोड)दि. 29 :  प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृषी व पदुम विभाग शासन निर्णय क्र.मत्स्यवि 1020/प्र.क्र.80/पदुम 14, दि. 29 जून, 2020 अन्वये केंद्र पुरस्कृत योजना प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना अंमलबजावणीकरीता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार राज्य शासनाने राज्यस्तरीय मंजुरी व सनियंत्रण समिती आणि जिल्हास्तरीय समिती स्थापन करून संबंधित समितीची  स्थापना केली. 
समितीची  रचना व कार्यकक्षा खालील प्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी, पालघर यांनी दि. 09/09/2020 रोजीच्या जिल्हास्तरीय सभेत सदरहू योजनेचा जिल्ह्यामध्ये अधिकाधिक प्रसार व प्रचार करण्यात यावा असे  निर्देश दिले आहेत.
जिल्ह्याचा वार्षिक कृती आराखडा तयार करून मान्यतेसह राज्यस्तरीय  मंजुरी व सनियंत्रण समितीस सादर करणे, जिल्हा स्तरावर योजनेची अंमलबजावणी व संनियंत्रण करणे, लाभार्थ्यांना वित्तीय पुरवठ्यासाठी बँका आणि वित्तीय संस्थांत समन्वय निर्माण करण्यास मदत करणे, योजने अंतर्गत प्राप्त प्रस्तावांना मान्यतेसह राज्यस्तरीय मंजुरी व सनियंत्रण समितीस सादर करणे.
“ प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY) या योजनेव्दारे मत्स्यव्यवसाय क्षेत्रात क्रांती घडुन येणार आहे. कारण या योजनेमार्फत आधुनिक तंत्रज्ञानासह पायाभूत सुविधा व आर्थिक सहाय्य सुनिश्चित होईल आणि याचा लाभ कष्टकरी मच्छीमार व मत्स्यकास्तकारांना होईल.” केंद्र शासनामार्फत मत्स्यव्यवसाय हा पुरक व अग्रक्रमीत व्यवसाय करण्याचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे. व याव्दारे सामाजीक व आर्थिकदृष्ट्या कमकूवत पारंपरीक मच्छिमारांचे/मत्स्यव्यवसायीकांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
शाश्वत आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत व रोजगार निर्मीतीच्या संधी निर्माण करणे. केंद्र पुरस्कृत योजना प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना अंमलबजावणीकरीता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार योजनांचे प्रमुख 3 भाग (Annexture) आहेत.
Annexture I –  प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजने अंतर्गत 100% केंद्रिय निधिसह केंद्रिय क्षेत्राच्या  योजना व  उपघटक 
समुद्री शेवाळ, तिलापिया, जिताडा, कोळंबी इ. सारख्या प्रजातींच्या अनुवांशिक सुधार कार्यक्रम राबविणाऱ्या संस्थांना अर्थसहाय्य करणे, नाविन्यपूर्ण प्रकल्प / उपक्रम, स्टार्टअप्स, इनक्यूबेटर आणि पथदर्शी प्रकल्पासह  आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देणे, माशाच्या साठ्यांचा योग्य वापर, मत्स्यपालन क्षेत्रात नवीन प्रगती, कुपोषण रोखण्यासाठी नाविन्यपूर्ण पध्दती, शोभिवंत मत्स्यपालनास प्रोत्साहन देण्यासारखे अभिनव पध्दती सार्वजनिक ठिकाणी / शाळा / सरकारी कार्यालयांमध्ये Aquarium बसविणे किंवा केंद्रीय   शिख्रर  समितीने (CAC) मंजूर केलेल्या कोणत्याही अन्य उपक्रमास या उपघटकांतर्गत सहाय्य करणे, मत्स्यव्यवसायामध्ये मासळी विलगीकरण कक्ष (Quarantine unit) उभारण्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट  आणि व्याप्ती म्हणजे मासळीची आयात करताना सूक्ष्म जीवाणू जलचर आणि जलचर  उत्पादनांच्या माध्यमातून देशात येणा-या धोकादायक विदेशी रोगांचा प्रवेश रोखणे, प्रशिक्षण, जागरूकता, प्रदर्शन व क्षमता वाढवणे, मत्स्योत्पादक संघटना / कंपन्या  निर्माण करण्यास चालना देणे. 
Annexture II –केंद्र पुरस्कृत योजना प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजने अंतर्गत लाभार्थीभिमुख असलेले उपघटक व उपक्रम 
नविन मत्स्यबीज उत्पादन केंद्राची स्थापना, नविन कोळंबी बीज उत्पादन केंद्राची स्थापना, नविन मत्स्यसंवर्धन/संगोपन तलाव खोदकाम, गोडया पाण्यातील मत्स्यसंवर्धन निविष्टा अनुदान, निमखा-यापाण्यातील कोळंबी व मत्स्यसंवर्धन, निमखा-यापाण्यातील कोळंबी व मत्स्यसंवर्धन निविष्टा अनुदान, बायोफ्लॉक पद्धतीने संवर्धन निमखारे पाणी व भुजल, जलाशयामध्ये बोटुकली संवर्धन, खुल्या समुद्रातील केज (पिंजरा) संवर्धन, समुद्र शैवाल संवर्धन्‍, शिंपले संवर्धन, शोभिवंत माशांचे संगोपन व प्रजनन, पुनर्चक्रिय पद्धतीने मत्स्यसंवर्धन्‍  RAS, जैव पुंज (बायोफ्लॉक) पद्धतीने मत्स्यसंवर्धन, शितगृह बर्फकारखाना उभारणी, रेफ्रिजरेटर व इन्सुलीटेड वाहन खरेदी, मोटर सायकल सह शितपेटी, सायकल सही शितपेटी, ऑटो रीक्शा सह शितपेटी, जिवंत मासळी विक्रि केंद्र, मत्स्यखाद्या कारखाना उभारणे.
यामध्ये प्रकल्प खर्चाच्या 40 टक्के ते 60 टक्के पर्यत सर्वसाधारण,ते अ.जा व अ.ज तसेच महीलांसाठी  शासनाकडून (केंद्र व राज्य) अनुदान अनुज्ञेय आहे.
Annexture III–लाभार्थीभिमुख नसलेल्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत  केंद्र पुरस्कृत योजना 
यामध्ये जिल्ह्यातील जेटी व बंदर सुविधा निर्माण करणे.
तरी सदरहू महत्वकांक्षी प्रधानपंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत सागरी, भुजल व निमखारेपाणी मत्स्यव्यवसाय क्षेत्रामध्ये अधिकाधिक शाश्वत व शास्त्रोक्त मत्स्योत्पादनास वाव असून कृपया सदरच्या योजनांचा प्रसार व प्रचार होणेकरीता कृपया स्थानिक वृत्तपत्रात वरील लाभार्थीभिमुक योजनांची माहीती व मार्गदर्शन घेण्याकरीता सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय्‍, रॉयल पॉईंट-2, कचेरी रोड, ता.व जि. पालघर  कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधण्याबाबत तसेच दुरध्वनी वरून श्री अजिंक्य देवकाते 9405056810, अमोल सोनोने 8899999770 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय अंजिक्य पाटील यांनी केले आहे.
********************

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने  

*बेरोजगार युवक-युवतींसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन*

पालघर (निलेश भोईर)दि. 29 : पालघर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात परप्रांतीय व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील कामगार आपल्या राज्यात परत स्थलांतरीत झाले आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील सुरु झालेल्या औद्योगिक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता भासत आहे.
या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष कौशल्य विकास कार्यकारी समिती पालघर जिल्हा यांच्या सुचनेनुसार जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पालघर व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने  नोकरीइच्छुक बेरोजगार युवक-युवतींसाठी ‘ऑनलाईन रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला असून, पालघर जिल्ह्यातील नामांकित आस्थापना/ कंपन्यांमधील विविध प्रकारच्या रिक्तपदांव्दारे मोठी सुवर्णसंधी निर्माण झालेली आहे. 
नोकरीसाठी इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी या विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर आपली आधार लिंक नाव नोंदणी करावी, त्यामध्ये अद्यावत मोबाईल नं., ई-मेल व शैक्षणिक पात्रता तसेच अनुभवाची नोंद करावी व ज्यांनी यापूर्वी नोंदणी केली असेल त्यांनी वरील गोष्टी अद्यावत कराव्यात, जेणेकरून जिल्ह्यातील विविध खाजगी आस्थापनांवरील रिक्त असलेल्या जागांवर नोकरीची संधी प्राप्त होऊ शकते.
या ऑनलाईन मेळाव्यांतर्गत पालघर जिल्ह्यातील विविध उद्योजकाकडील सर्वसाधारणपणे ITI Turner, Fitter, Welder come Fitter, Helper, Electrical, Refrigeration, Mechanical, Item Machinist, microbiology, B.Sc Chemistry, QC Microbiologist Officer, CNC Operator,Chemist, Pharmacist या पदांसाठी आवश्यक ती पात्रताधारक तसेच इ. B. Com B.Pharm, M.Pharm, B.Sc Chemistry, M.Sc, Diploma/Degree in Mechanical उमेदवारांसाठी एकूण 500  पेक्षा अधिक  रिक्तपदे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
सदरच्या ऑनलाईन मेळाव्यामध्ये सहभाग घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबासाईटवर नोंदवीलेल्या रेजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड ने लॉगीन करावे व पंडित दिनदयाल उपादध्याय रोजगार मेळावा यावर क्लिक करुन पालघर जिल्हा निवडून उपलब्ध कंपनीला अप्लाई करावे (Employment ->Job seeker -> job seeker login with  Registration no. & Password -> Pandit Dindayal Upadhyay Job Fair -> District Palghar-> (View Job Fair Details) Vacancy Listing  (View Company Vacancies) -> Click on I Agree ->Apply for Suitable Vacancies) या पदधतीने सहभाग घ्यावा.  
सदर मेळाव्यामध्ये उमेदवार एकापेक्षा जास्त कंपनींचा पर्याय निवडू शकतो. ऑनलाईन सहभागी असलेल्या कंपनीला वरील पध्दतीने पसंतीक्रमानुसार Apply केलेल्या उमेदवारांना उद्योजकांच्या सोईनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण दिनांक व वेळ एसएमएस अलर्ट व्दारे किंवा ई-मेल व्दारे कळविण्यात येईल व शक्य असेल तिथे ऑफलाईन किंवा ऑनलाईन मुलाखतींचे आयोजन करण्यात येईल.
तरी इच्छुक युवक व युवतींनी दिनांक : 30 सप्टेंबर 2020 ते 03 ऑक्टोबर 2020 पर्यंत अप्लाय (Apply) करावे. तसेच स्वत:बद्दलची माहिती संबंधित वेब पोर्टलवर अद्ययावत करताना काही अडचण उद्भल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, या कार्यालयाच्या दूरध्वनी क्र. 7058435714 किंवा या कार्यालयाचे ई-मेल- palgharrojgar@gmail.com वर संपर्क साधावा आणि या संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त, पालघर यांनी केले आहे.

**********

वॉर्ड क्र. १२ च्या नगरसेविका सौ. राधा अ. मानकामे (पामाळे) यांची महिला बालकल्याण सभापती पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस दिग्गज वार्ताहर परिवार तर्फे हार्दिक शुभेच्छा


*वॉर्ड क्र. १२ च्या नगरसेविका सौ. राधा अ. मानकामे (पामाळे) यांची महिला बालकल्याण सभापती पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस  दिग्गज वार्ताहर परिवार तर्फे हार्दिक शुभेच्छा* 



💐👏🏻💐👏🏻💐
: नगरसेवक श्री अमोल पाटील यांची पालघर नगरपरिषद आरोग्य सभापती पदी निवड झाली त्याबद्दल दिग्गज वार्ताहर परिवार तर्फे अभिनंदन💐💐💐💐💐💐💐💐💐

Monday, September 28, 2020

दिग्गज वार्ताहर*बातम्यादिनांक :- २९.सप्टेंबर २०२०वार। :- मंगळवार

*दिग्गज वार्ताहर*बातम्या
दिनांक :- २९.सप्टेंबर २०२०
वार।     :- मंगळवार

● केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात काँग्रेस आक्रमक; काँग्रेसशासित राज्यांना नवीन कायदा करण्याचा सल्ला; काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी याबद्दल केले आवाहन  

● संरक्षणविषयक सामग्री खरेदी करताना दुसऱ्या देशांच्या सरकारशी होणाऱ्या करारांमध्ये भारतात गुंतवणूक करण्याची अट (ऑफसेट धोरण) रद्द करण्याचा संरक्षण मंत्रालयाचा निर्णय

● पावसाच्या परतीच्या प्रवासाला सोमवार (दि.२८) पासून सुरुवात; नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास राजस्थानच्या पश्चिमेस सर्वसाधारण तारखेपेक्षा ११ दिवस उशिराने सुरू

● कृषी कायद्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार : पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचे सूतोवाच

● राज्यात दिवसभरात १९ हजार ९३२ जणांची कोरोनावर मात; तर, ११ हजार ९२१ नवे कोरोनाबाधित आढळले, राज्याचा रिकव्हरी रेट ७७.७१ टक्क्यांवर

● राज्यात २४ तासांत चार पोलिसांचा मृत्यू; आणखी १८९ कोरोनाबाधित; कोरोनाबाधित पोलिसांची एकूण संख्या २२ हजार ८१८ वर

● अमेरिकेत टिकटॉकबंदी लांबणीवर; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश; नागरी अधिकारांचा भंग होत असल्याचा दावा

● ट्रॅम्प यांच्याकडून दोन वर्षांत केवळ ७५० डॉलर प्राप्तिकर भरणा; दी न्यूयॉर्क टाइम्सचा गौप्यस्फोट; ट्रम्प म्हणाले ‘फेक न्यूज’

● RCB vs MI : सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची मुंबई इंडियन्सवर 2 विकेटने मात; मुंबईने बंगळुरुला सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी 8 धावांचे दिले होते आव्हान 

● राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिला जाणारा 'गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार' जेष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना जाहीर

क्रायमिन या साथीच्या रोगा पासून सीमा भागातील पशुपालकांनी सतर्क राहावे

*क्रायमिन या साथीच्या रोगा पासून  सीमा भागातील पशुपालकांनी  सतर्क राहावे*

पालघर(रवि राठोड) दि  28  :  महाराष्ट्रा मध्ये गोचिडांमुळे क्रायमिन काँगो हेमोरेजिक फिव्हर (CCHF) या साथीच्या रोगाची लागण होण्याची शक्यता असल्याने राज्याच्या सीमा भागातील 
पशुपालक  व मांस विक्रेत्यांनी  सतर्क राहावे 

     देशात सध्या करोना रोगाचे सावट असतांनाच आता क्रायमिन काँगो हेमोरेजिक फिव्हर (CCHF)  या नव्या विषाणूजन्य रोगाचे आगमन महाराष्ट्रात होण्याची शक्यता असल्याने सध्या पशुपालकांमध्ये ,मांस विक्रेत्यांमध्ये व पशुसंवर्धन अधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हा रोग गुजरात मधून महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या जिल्ह्यात पसरण्याची शक्यता असल्याने पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयामार्फत या रोग संबंधी परिपत्रक जारी करण्यात आले आहे . 
या रोगामुळे बाधित जनावरांचे संक्रमण मनुष्यामध्ये होत असल्याने गुजरात महाराष्ट्र सीमा भागातील पशुपालकांना या रोगाबाबत जास्त सतर्क व जागरूक राहण्याचा  इशारा देण्यात आला आहे.या रोगाचा प्रसार गुजरातमधील काही जिल्ह्यात आढळून आला असून काँगो,इराण ,द आफ्रिका ,चीन ,हंगेरी या देशात सुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आल्याने पालघर जिल्हा पशुसंवर्धन विभागाने सर्व आवश्यक ती खबरदारी घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत निर्देश दिले आहेत.
सदर विषाणूजन्य रोग एका विशिष्ट प्रकारच्या गोचीडा द्वारे एका जनावरांमधून दुसऱ्या जनावरांना होतो. ऑस्ट्रीच ,शहामृग या पक्षाद्वारे देखील या रोगाचा प्रसार होण्यास मदत होते . बाधित जनावरांच्या रक्ताच्या संपर्कात आल्याने व बाधित जनावरांचे मांस खाल्याने या रोगाचा प्रादुर्भाव मानवामध्ये दिसून येतो. या रोगाची लागण झाल्यास वेळीच निदान व उपचार न झाल्यास 30% मनुष्यामध्ये मृत्यू होतो . या रोगावर हमखास व उपयुक्त असे उपचार नसल्याने वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे अशी माहिती  जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त पालघर डॉ प्रशांत ध कांबळे यांनी दिली.  
रोगाची लक्षणे --- 
• या रोगाने बाधित झालेल्या माणसांमध्ये , सुरुवातीला डोके दुखणे ,जास्त ताप येणे ,सांधे दुखी , पोटदुखी उलटी होणे. 
• डोळे लाल होणे, घश्यात तसेच तोंडाच्या वरच्या भागात फोडी येणे 
• आजार बळावल्यास त्वचेखाली रक्तस्त्राव होणे, नाकातून रक्त येणे 
• मृत्यूचे प्रमाण 9 ते ३०% असते.
प्रतिबंधक उपाय योजना
• पालघर जिल्हा हा गुजरात राज्याच्या सीमेलगत असल्याने या रोगाचा प्रसार सदर जिल्हयात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने वेळीच च सर्व खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे व या रोगाबाबत तसेच गोचीड निर्मूलनाबाबत योग्य ती काळजी घेऊन सदर आजाराबाबत पशुपालकांनी जागरूक व सतर्क राहणे आवश्यक असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी सांगितले. 
• शेतकरी , पशुपालक ,पशुवैद्यक यांनी गोठ्याची स्वच्छता राखणे , मुख पट्टी ,हॅन्ड ग्लोव्हस ,गमबूट चा वापर करणे.
• सदर रोगाचा प्रसार व प्रादुर्भाव टाळण्यासाठी जण माणसात या बाबत माहिती प्रसिद्ध करणे,गोचीड निर्मूलन कार्यक्रम राबविणे ,जनावरांच्या अंगावरील व गोठ्यातील कीटकांचे व गोचिडांचे संपूर्णतः उच्चाटन करणे ,बाह्य कीटकांचा व गोचिडांचा नाश करणारी कीटकनाशके यांची  फवारणी करणे आवश्यक. 
• गुजरात राज्यातून पालघर जिल्ह्यात रोज विविध जनावरांची वाहतूक होत असल्याने दोन राज्याच्या सीमेवर असणाऱ्या पशुधन तपासणी नाक्यावर सर्व जनावरांची तपासणी करून आवश्यक त्या उपाय योजना राबविणे . बाधित जनावरे वेगळी काढून त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपचार करणे .
• गोचिडे हाताने काढणे , मारणे कटाक्षाने टाळावे 
• सदर रोग पशूंचे कच्चे मांस खाल्याने देखील होऊ शकतो त्यामुळे मांस चांगल्या प्रकारे शिजवून खावे .
या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व रोगाचा प्रसार रोखण्यासाठी गोचीड निर्मूलनाचा कार्यक्रम प्राधान्याने घेण्याबाबत व  सर्व ती आवश्यक  खबरदारी घेण्याचे व पशुपालकांनी या आजाराबाबत जास्तीत जास्त जागरूक राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांनी जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले .असे 
जिल्हाा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी सांगितले.

अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना सन 2020-21 वर्षासाठी खावटी अनुदान योजना लागू

*अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना सन 2020-21 वर्षासाठी खावटी अनुदान योजना लागू*

पालघर (निलेश भोईर)दि  28 : कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावामुळे राज्यात उद्भवलेल्या अर्थिक संकटाच्या काळात अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजनेचे सन 2020-21 या  वर्षासाठी पुर्नज्जीवन राज्य शासनाने आदिवासी विकास विभागाच्या दिनांक 09 सप्टेंबर 2020 च्या शासन निर्णयान्वये केले आहे . उक्त योजने अंतर्गत अनुसूचित जमातीच्या गरजू कुटुंबांना रू . 4000 / - ( अक्षरी रक्कम रुपये चार हजार ) प्रती कुटुंब लाभ ज्यामध्ये रू . 2000 / - ( अक्षरी दोन हजार मात्र ) अन्नधान्य वस्तु स्वरूपात वाटप आणि रु . 2000 / - ( अक्षरी दोन हजार मात्र ) रक्कम त्यांच्या बॅक / डाक खात्यात वितरीत करण्यात येणार आहे . खात्यात वितरित करावयाच्या रकमेसाठी त्या अनुसूचित जमातीच्या कुटुंबातील महिलेचे बॅक खाते असणे क्रमप्राप्त आहे . योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामस्तरावर खालील पात्रता धारक अनुसूचित जमाती कुटुंबाच्या याद्या तयार करण्यात येणार आहेत , 

 दि . 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीत मनरेगावर एक दिवस कार्यरत असलेले आदिवासी मजूर , आदिम जमातीची सर्व कुटुंबे 
, पारधी समाजाची सर्व कुटुंबे 
, . जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार  प्रकल्प अधिकारी यांनी निश्चित केलेली गरजू आदिवासी कुटुंबे ज्या मध्ये परितक्ता , घटस्फोटीत महिला , विधवा , भूमिहिन शेतमजूर , अपंग व्यक्ती असलेले कुटुंब , अनाथ मुलांचे संगोपन करणारे कुटुंब 
,  वैयक्तिक वनहक्क प्राप्त झालेली वनहक्कधारक कुटुंबे वरील प्रमाणे याद्या तयार करण्यासाठी सबंधित ग्रामपंचायत स्तरावर प्रकल्प कार्यालयाकडुन खालीलप्रमाणे 5 सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे . सदर समिती मध्ये 
 तलाठी, ग्रामसेवक,  डाकसेवक 
,  कृषि सेवक 
,  मुख्याध्यापक / शिक्षक ( आश्रमशाळा / जि.प. ( उपक्रमशिल शिक्षक )  यांचा समावेश आहे. 

शासन स्तरावरून अर्जाचा नमुना प्राप्त झाल्यानंतर सदर अर्ज वरील प्रमाणे समितीकडुन शासकिय निकषात बसणाऱ्या लाभार्थ्यांची छाननी करून लाभार्थी याद्या अंतिम करण्यात येतील . खावटी अनुदान योजना गरजू अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना सहाय्य करण्यासाठी शासनाचा महत्त्वकांक्षी उपक्रम असुन सद्धस्थितीत काही संघटना / व्यक्तिकडुन पैसे घेवून अर्जाचे वितरण लाभार्थ्यांना करण्यात येत असल्याची बेकायदेशिर बाब निदर्शनास आली आहे . गरजू अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना खावटी अनुदान योजनेचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने डहाणू प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी तसेच प्रकल्प कार्यालयाच्या अधीनस्त तालुक्याचे तहसिलदार तसेच गट विकास अधिकारी यांचे प्रयत्न सुरू आहेत तरी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी अधिक माहितीसाठी वरील ग्रामस्तरावरील समितीशी संपर्क साधावा इतर कोणत्याही बाबीवर विश्वास ठेवू नये .

प्रारुप सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखडयावरील प्राप्त लेखी सूचना, हरकती बाबत 30 सप्टेंबर रोजी जनसुनावणी

*प्रारुप सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखडयावरील प्राप्त लेखी सूचना,  हरकती बाबत  30 सप्टेंबर रोजी जनसुनावणी*

पालघर (विशेष प्रतिनिधी)दि  28  : केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरणीय बदल मंत्रालय, नवी दिल्ली यांनी दिनांक १८ जानेवारी २०१९ रोजी नवीन सिआरझेड (CRZ) अधिसुचना, २०१९ जाहीर केली आहे. त्याअनुषंगाने पालघर जिल्ह्याचे प्रारुप सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखडयावरील प्राप्त लेखी सूचना /हरकतीच्या नोंदविण्यासाठी दिनांक ३०/०९/२०२० रोजी सकाळी ११.०० वाजता ऑनलाईन (online) व तिवारी रंगमंच, सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघर येथे प्रत्यक्ष जनसुनावणी घेण्यात येणार आहे. कोव्हीड-१९ ची पार्श्वभूमी विचारात घेता, दिनांक ३०/०९/२०२० रोजीच्या जनसुनावणी करिता ज्यांना लेखी हरकती/ सूचना द्यावयाच्या असतील त्यांचेकरिता वर नमूद केलेल्या ठिकाणा व्यतिरिक्त

संबंधित तालुक्यांचे तहसिल कार्यालयात दिनांक ३०/०९/२०२० रोजी सादर करता येतील. त्यानुसार

तहसिलदार पालघर, वसई, डहाणू व तलासरी यांना दिनांक ३०/०९/२०२० रोजी लेखी हरकती/सूचना

स्विकारणेबाबत कळविणेत आले आहे. तसेच सूचना व हरकती 1) collectorpalghar@gmail.com ,

Prothane@mpcb.gov.in. 3) srotarapur2ompcb.gov.in हया Email id वर पाठविता येतील.

दिग्गज वार्ताहर* बातम्यादिनांक :- २८.सप्टेंबर २०२०वार। :- सोमवार

*दिग्गज वार्ताहर* बातम्या
दिनांक :- २८.सप्टेंबर २०२०
वार।    :- सोमवार

● वादग्रस्त तिन्ही कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी; कायद्यात झाले रुपांतर; शेतकऱ्यांसाठी हा ‘काळा दिवस’ : शिरोमणी अकाली दल

● भारत सामूहिक प्रतिकारशक्तीपासून दूर; भारतीय वैद्यक संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) दुसरे सिरो सर्वेक्षण

● यंदा नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीपेक्षा अधिक झाला असून दोन दिवसात तो उत्तर प्रदेशातून माघारी जाईल; भारतीय हवामान विभाग; देशात सरासरीच्या ९ टक्के अधिक पाऊस


● बिहारच्या निवडणुकीसाठी तगडा बंदोबस्त; केंद्रीय पोलिसांच्या ३०० कंपन्या राहणार तैनात; याशिवाय ITBP, CISF, CRPF, SSB, RPF and BSF च्या तुकड्याही लवकरच होणार रवाना

● राज्यातील रुग्णसंख्या १३ लाखांच्या पुढे, ३५ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू; मुंबईत आढळले दोन हजार रुग्ण

● राज्यात २४ तासांत आणखी १६९ पोलीस कोरोनाबाधित, दोघांचा मृत्यू; आतापर्यंत राज्यात २४१ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू

● कोरोनामुळे गुजरातमध्ये यंदाचा नवरात्रौत्सव गरब्याविनाच; आयोजनास संमती न देण्याचा मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या सरकारचा निर्णय

● ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण किनारपट्टीवर तब्बल ३८० पायलट व्हेल माशांचा मृत्यू झाल्याने खळबळ 

● IPL 2020: राजस्थानचा किंग्स इलेव्हन पंजाबला धोबीपछाड! ४ विकेटने मिळवला रोमहर्षक विजय, मयंक अग्रवाल-केएल राहुलची खेळी व्यर्थ

● पूनम पांडेचा युटर्न; मारहाणीच्या आरोपानंतर पुन्हा पती सॅमकडे परतली, पतीसोबतच राहण्याचा घेतला निर्णय; इंस्टाग्रावर तिच्या लग्नाचा एक फोटो केला शेअर

Saturday, September 26, 2020

दिग्गज वार्ताहर *बातम्यादिनांक :-२७. सप्टेंबर २०२०वार। :- रविवार

*दिग्गज वार्ताहर *बातम्या
दिनांक :-२७. सप्टेंबर २०२०
वार।    :- रविवार

● भारताला संयुक्त राष्ट्रांच्या निर्णय घेणाऱ्या संरचनेतून आणखी किती काळ बाहेर ठेवले जाणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत सवाल
 
● जीएसटी नुकसानभरपाई उपकरापोटी जमा केलेल्या रकमेपैकी ४७,२७२ कोटींची रक्कम इतरत्र वळवल्याचा आरोप केंद्रीय अर्थ मंत्रालयाने फेटाळला 

● कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, कठोर नियमांना तयार राहा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला स्पष्ट इशारा 


● मोदी सरकारला धक्का, शिरोमणी अकाली दल एनडीएतून पडणार बाहेर; सरकारने पास केलेल्या कृषी विधेयकावरुन मतभेद

● येत्या पाच दिवसांत नवं संरक्षण उत्पादन आणि खरेदी धोरण आणणार : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह; भारतानं संरक्षण क्षेत्रात ७४ टक्के प्रत्यक्ष परदेशी गुंतवणुकीला परवानगी दिली आहे

● प्रत्येक भारतीयापर्यंत लस पोहोचवण्याचा खर्च ८० हजार कोटी, सरकारकडे तेवढे पैसे आहेत का : अदर पूनावाला यांचा केंद्र सरकारला प्रश्न; लस तयार झाली तरी वितरण सोपं नसेल 

● ‘अलर्ट राहा, भारत अचानक हल्ला करु शकतो’, निवृत्त चिनी जनरलने बोलून दाखवली भीती; 'काही तासात ते चीनमध्ये प्रवेश करु शकतात'

● महाराष्ट्रात २३ हजार ६४४ रुग्ण कोरोनामुक्त; आत्तापर्यंत १० लाखांपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन दिली माहिती

● कोलकाताने हैदराबादचा पराभव करत मिळवला आयपीलएलच्या १३ व्या मोसमातील पहिला विजय; हैदराबादवर 7 गडी राखून केली मात

● 'धर्मा प्रोडक्‍शन'चे निर्माता क्षितीज प्रसादची 27 तास चौकशी; समाधानकारक उत्तर न दिल्याने अटक

महाराष्ट्रात बरे झालेल्या रुग्ण संख्येने ओलांडला १० लाखांचा टप्पा*

*महाराष्ट्रात बरे झालेल्या रुग्ण संख्येने ओलांडला १० लाखांचा टप्पा*
- *आरोग्यमंत्री राजेश टोपे*
मुंबई,(जगधिश घरत) दि. २६: राज्यामध्ये कोरोनातून बरे झालेल्या रुग्णसंख्येने आज १० लाखांचा टप्पा ओलांडला. दिवसभरात २३ हजार ६४४ रुग्ण रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. त्यामुळे राज्यभरात आतापर्यंत १० लाख १६ हजार ४५० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात नविन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ७६ टक्क्यांच्या जवळपास पोहोचले आहे. 
राज्यात पहिला रुग्ण ९ मार्चला आढळून आला होता. त्यानंतर २५ मार्चला पहिले दोन रुग्ण बरे झाले. त्यानंतरच्या सात महिन्यांमध्ये दररोज कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत गेली. मात्र जुलै महिन्यापासून बरे होणाऱ्या रुग्ण संख्येत वाढ होतानाच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५० टक्क्यांवर पोहोचले आणि याच महिन्याच्या पहिल्या राज्याने कोरोनामुक्त झालेल्यांचा १ लाखाचा टप्पाही गाठला.जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही संख्या २ लाखांवर पोहोचली. ऑगस्टमध्ये तर तीन आठवड्यांमध्ये ३, ४ आणि ५ लाखांचा टप्पा गाठत सप्टेंबरमध्येही ७,८,९ आणि आज १० लाखांचा टप्पा ओलांडण्यात आला. 
*असा पार झाला बऱ्या झालेल्या १० लाख रुग्णसंख्येचा टप्पा*
• दि. २ जुलै- १ लाखाचा टप्पा - (१ लाख १ हजार १७२ रुग्ण बरे झाले)
• दि. २५ जुलै- २ लाखांचा टप्पा -  (२ लाख ७ हजार १९४ रुग्ण बरे झाले)
• दि. ५ ऑगस्ट- ३ लाखांचा टप्पा (३ लाख ५ हजार ५२१ रुग्ण बरे झाले)
• दि. १४ ऑगस्ट- ४ लाखांचा टप्पा (४ लाख १ हजार ४४२ रुग्ण बरे झाले)
• दि. २४ ऑगस्ट- ५ लाखांचा टप्पा (५ लाख ०२ हजार ४९० रुग्ण बरे झाले)
• दि. ३ सप्टेंबर- ६ लाखांचा टप्पा ( ६ लाख १२  हजार ४८४  रुग्ण बरे झाले)
• दि. १० सप्टेंबर- ७ लाखांचा टप्पा ( ७ लाख ७१५  रुग्ण बरे झाले)
• दि. १७ सप्टेंबर- ८ लाखांचा टप्पा ( ८ लाख १२ हजार ३५४  रुग्ण बरे झाले)
• दि. २१ सप्टेंबर- ९ लाखांचा टप्पा (९ लाख १६ हजार ३४८ रुग्ण बरे झाले )
• दि. २६ सप्टेंबर- १० लाखांचा टप्पा (१० लाख १६ हजार ४५० रुग्ण बरे झाले)
--------

Friday, September 25, 2020

25 Sept 2020 पत्रिका

दिग्गज वार्ताहर *बातम्यादिनांक :- २६.सप्टेंबर २०२०वार :- शनिवार

*दिग्गज वार्ताहर *बातम्या
दिनांक :- २६.सप्टेंबर २०२०
वार     :- शनिवार

● मोदी सरकारविरोधात नव्या कृषी विधेयकावरून शेतकरी रस्त्यावर; ठिकठिकाणी रस्ते, रेल्वे वाहतूक बंद; देशभरात पडसाद

● नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांना गुलाम बनवणार : राहुल गांधी यांचे मोदी सरकारवर टीकास्त्र 

● मास्कच्या निर्यातीवरील बंदी उठवावी; अखिल भारतीय मास्क निर्मात्या संघटनेची केंद्र सरकारकडे मागणी

● मनी लॉण्डरिंग प्रकरणी अटकेत असलेले येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या लंडन येथील घरावर अखेर सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) जप्तीची कारवाई

● ऑक्टोबरपासून सुरु होणार मेड इन इंडिया ‘कोव्हॅक्सीन’ची तिसऱ्या फेजची चाचणी


● राज्यात शुक्रवारी १७ हजार ७९४ नवीन कोरोना रूग्णांची नोंद, एकूण रूग्णसंख्या १३ लाख ७५७ झाली तर, सध्या २ लाख ७२ हजार ७७५ सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू 

● 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेअंतर्गत कोकणात 10 लाख 63 हजार कुटुंबाची आरोग्य तपासणी, तर पुण्यामध्ये पहिल्या टप्प्यात 182 गावांचे आणि १३ नगरपालिकांचे सर्वेक्षण पूर्ण; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती 

● युक्रेनच्या लष्कराचे विमान कोसळल्याने मोठी दुर्घटना; 22 शिकाऊ सैनिक ठार, अन्य दोन जण जखमी असून चार जण बेपत्ता

● IPL 2020 : महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपरकिंगचा सलग दुसरा पराभव; दिल्ली कॅपिटल्सची चेन्नईवर 44 धावांनी मात

● अक्षरधाम मंदिर दहशतवादी हल्ल्याचा थरार मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार; 'स्टेट ऑफ सीज: अक्षरधाम' चित्रपटाची घोषणा; लवकर सिनेमा भेटीला

माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत**कोकण विभागात 10 लाख 63 हजार 163 कुटुंबांची पाहणी

*‘माझे कुटुंब माझी  जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत*
*कोकण विभागात 10 लाख 63 हजार 163 कुटुंबांची पाहणी*
                                                             *कोकण विभागाचे काम अव्वल -मुख्यमंत्री उध्दव ठाकरे*

पालघर , (निलेश भोईर)दि.25 :- कोकण विभागात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम गाव पातळीपर्यंत राबविण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी या योजनेचा निश्चित उपयोग होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की,वैद्यकीय अधिकाऱ्यांना ट्रीटमेंट करताना काही अडचण असल्यास टास्क फोर्सशी सल्लामसलत करावी.ग्रामपंचायत पातळीवर अधिक लोक सहभागी होतील याकडे लक्ष द्यावे. प्रचार           प्रसिद्धीसाठी विशेष प्रयत्न करावेत.
        आज कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ आणि कोकणातील जिल्हाधिकारी यांच्याशी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे घेतलेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.
        कोकण विभागात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये सरासरी 25 टक्के आरोग्य सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या बाबात मुख्यमंत्री यांनी समाधान व्यक्त केले.  स्थानिक पालिकेच्या माध्यमातून घरोघरी तपासणी, सर्वेक्षण आणि मार्गदर्शन करण्यात येत आहे.  यासाठी संपूर्ण राज्यात 55 हजार 268 आरोग्य पथके तैनात करण्यात आली असून, काल अखेर 70.75 लाख कुटुंबांची तपासणी करण्यात आली आहे.  यात 2.83 कोटी व्यक्तींची तपासणी झाली आहे.  37 हजार 733 संशयितांपैकी 4 हजार 517 कोविड रुग्ण आढल्याची माहिती देण्यात आली.
            कोकण विभागात 1 कोटी 92 लाख 72 हजार 065 लोकसंख्या असून, 48 लाख 66 हजार 372 कुटुंब संख्या आहे. यासाठी  7 हजार 425 पथकांची आवश्यता आहे.  त्यापैकी 6 हजार 721 पथके नेमण्यात आलेली आहेत.  दररोज 2 लाख 17 हजार 594 कुटुंबांना भेटी दिल्या आहेत. आज अखेर ही संख्या 10 लाख 64 हजार 143 एवढी होते.  भेटी दरम्यान 1 हजार 403 तापाचे रुग्ण आढळले तर 38 हजार 658 कोरोना सदृष्य  आढळून आले आहेत. कोकण विभागात 6 हजार 780 ऑक्सिमिटर आवश्यक आहे.  त्यापैकी 6 हजार 420 ऑक्सिमिटर उपलब्ध आहेत. 6 हजार 666 थर्मल स्कॅनरची आवश्यकता आहे.  त्यापैकी 6 हजार 602 थर्मल स्कॅनर उपलब्ध आहेत.  
राज्यमंत्री,  माहिती  व जनसंपर्क  आदिती तटकरे  म्हणाल्या की,  कोविड म्हणून बरे झालेले रुग्ण  आणि त्यांची  माहिती  प्रसार माध्यमांद्वारे सर्वत्र प्रसिद्ध करावी. जनजागृती  प्रचार प्रसिद्धीवर अधिक भर द्यावा. सर्हेम4 सर्वांसाठी आहे. ही भावना सर्वत्र असावी, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. 
        कोकण विभागात या मोहिमेसाठी स्वयंसेवक म्हणून राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, नेहरु युवा केंद्राचे युवक, स्पर्धापरिक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्था यांची मदत घेतली जात आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत फ्लेक्स, बॅनर, वृत्तपत्र प्रसिध्दी आणि सोशल मिडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर व्यापक प्रसिध्दी करण्यात येत आहे. कोकण विभागात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन तपासणी, क्लोज कॉन्टॅक्टचा शोध आणि प्रभावी उपाययोजना यामुळे रुग्ण दूप्पटीचा वेग 55 दिवसांवर आला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. कोकण विभागात ‘माझे कुटुंब माझी जाबाबदारी’ मोहिमेअंतर्गत विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले गेले आहेत.  त्यात पालघर जिल्हयात वारली पेंटिंग आणि वारली भाषेमध्ये प्रसिध्दी, सिंधुदूर्ग मध्ये दशावताराच्या माध्यमातून प्रसिध्दी, रत्नागिरी जिल्हयात गुडी महोत्सव आणि महापालिकेअंतर्गत 40 जाहिरात फलके, 5 कमाने, 100 बसस्टॉप आणि 75 बसेसवर प्रसिध्दी करण्यात आली आहे.   रायगड जिल्हयात पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त पत्रकार परिषदा, कल्याण डोंबिवली महापालिकाअंतर्गत ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
         या बैठकीसाठी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे,  जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ वसई-विरार महानगरपालिका आयुक्त  गंगाथरन. डि, , जिल्हा पोलीस अधिक्षक,  दत्तात्रय शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,सी. सालीमठ  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कांचन वानेरे तसेच जिल्हा कोरोना टास्क फोर्सचे प्रतिनिधी उपस्थित होते.

*‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत रायगड जिल्ह्यात 1 लाख 64 हजार 329 कुटुंबांची पाहणी*

*‘माझे कुटुंब माझी  जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत रायगड जिल्ह्यात 1 लाख 64 हजार 329 कुटुंबांची पाहणी*
    *-पालकमंत्री कु.आदिती तटकरे*
अलिबाग,जि.रायगड दि.25 (जगधिश घरत) :-  रायगड जिल्ह्यात  ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम गाव पातळीपर्यंत राबविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा समन्वयाने काम करीत असून आतापर्यंत या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात 1 लाख 64 हजार 329 कुटुंबांची पाहणी पूर्ण झाली असून लवकरच या मोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण होईल, असा विश्वास पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.
      आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी “माझे कुटुंब-माझी जबाबदारी” या मोहिमेबाबत कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे आढावा घेतला.  त्यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे  उपस्थित होते.
         या बैठकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचार करताना काही अडचण असल्यास करोना टास्क फोर्सशी सल्लामसलत करावी. ग्रामपंचायत पातळीवर अधिक लोक सहभागी होतील याकडे लक्ष द्यावे. प्रचार प्रसिद्धीसाठी विशेष प्रयत्न करावेत, करोना दक्षता समित्या कार्यरत राहतील याकडे लक्ष द्यावे, माझे कुटुंब-माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत  एकाच समान बोधचिन्हाचा  वापर सर्वत्र करावा, करोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी मास्क वापरणे, हात वारंवार धुणे, सॅनिटायझरचा नियमित वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे या बाबींचे नियमित पालन करावे आणि नागरिकांच्या सहभागाने महाराष्ट्र निरोगी सदृढ बनविण्याच्या दृष्टीने सतत प्रयत्नशील राहावे, अशा सूचना दिल्या.
         पालकमंत्री कु.आदिती तटकरे यावेळी म्हणाल्या की, ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही मोहीम यशस्वी करण्यासाठी  रायगड जिल्ह्यात एकूण 1 हजार 500 पथके नेमण्यात आली असून त्यांना स्वत:ची ओळखपत्र दाखवूनच नागरिकांशी संपर्क करण्याच्या, या मोहिमेंतर्गत क्षेत्रीय पातळीवर काम करण्यासाठी कर्मचारी वा स्वयंसेवक हे वय वर्षे 25 ते 40 या वयोगटातीलच असावेत, त्यांनी इतरांबरोबरच स्वत:ची काळजी घेत काम करणे अपेक्षित आहे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 
       रायगड जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये किमान 2 बेड राखीव ठेवून कोविड कॉर्नर निर्माण करण्याबाबतचा निर्णय घेतला असून जिल्ह्यातील ऑक्सिजन बेड वाढविण्यासाठी तसेच जवळपास 120 व्हेटिंलेटर्स उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कोविड-19 मधून बरे झालेल्या रुग्णांच्या इतरांना प्रोत्साहन व बळ मिळेल अशा मुलाखती प्रसारमाध्यमांद्वारे सर्वत्र प्रसिद्ध केल्या जाणार असून जनजागृती,  प्रचार प्रसिद्धीवर अधिक भर देण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांना अधिक सक्षम करणे गरजेचे असून तसे झाल्यास मृत्यूदराचे प्रमाण कमी होण्यास निश्चितच मदत होईल असे सांगून हे सर्वेक्षण सर्वांसाठी आहे. या एका भावनेने स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सक्रीय सहभागाने ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही मोहीम जिल्ह्यात सर्वस्तरावर यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.  
        मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना रायगड जिल्ह्यात ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’  ही मोहीम कशा प्रकारे राबविण्यात येत आहे याविषयी सांगताना जिल्हाधिकारी निधी चौधरी म्हणाल्या की, पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सर्व यंत्रणा जोमाने काम करीत आहे. पालकमंत्री महोदयांनी स्वत: स्थानिक लोकप्रतिनिधींसमवेत गृहभेटी देऊन ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ या मोहिमेविषयी  मोठ्या प्रमाणावर जनजागृती होईल, यासाठी प्रयत्न केले आहेत. समाजातील सर्व स्तरावर शासकीय यंत्रणा, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, नेहरु युवा केंद्राचे युवक, स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक यांची मदत घेतली जात आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत फ्लेक्स, बॅनर, वृत्तपत्र प्रसिध्दी आणि सोशल मिडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर व्यापक प्रसिध्दी करण्यात येत आहे. ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत रायगड जिल्ह्यात एकूण 7 लाख 75 हजार 225 घरांचे सर्वेक्षण करण्याचे उद्दिष्ट असून आजपर्यंत 1 लाख 64 हजार 329 घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सर्वेक्षण पथकाला आरोग्य सुरक्षाविषयक सर्व प्रकारची आवश्यक साधन सामुग्री पुरविण्यात आली आहे. 
       व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे आयोजित या बैठकीस पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे, सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.अनिल परब, पालक सचिव, जिल्हाधिकारी, पोलीस महानिरीक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा करोना टास्क फोर्सचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Thursday, September 24, 2020

*करा प्लाझ्मा दान, वाचवा कोविड रुग्णांचे प्राण जिल्हाधिकारी , म.न.पा.आयुक्त, मु. का. अ. यांचे आवाहन*

*करा प्लाझ्मा दान, वाचवा कोविड रुग्णांचे प्राण जिल्हाधिकारी , म.न.पा.आयुक्त, मु. का. अ. यांचे आवाहन*

    पालघर (रवि राठोड)पालघर दि. 23 :- प्लाझ्मा  दान करणे ही एक सुरक्षित प्रक्रिया
आहे, जी १०० वर्षाहुन अधिक वर्ष रुग्णांचे जीव वाचविण्यात मदत करण्यासाठी वापरली जात आहे.प्लाझ्मा थेरेपीच्या माध्यमातून कोविड १९ चा रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो. त्यासाठी कोविड १९ बाधित रुग्ण जे पूर्णतः बरे झाले आहेत त्या जास्तित जास्त प्लाझ्मा दात्यांनी पुढे येवून कोविड १९ च्या रुग्णांना जिवनदान देऊन कोरोना रुग्णाला वाचवण्याचे मोठे
काम करावे असे आवाहन  पालघर जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ, वसई विरार महानगरपालिका आयुक्त डी.गंगाधरण,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.के.सालीमठ यांनी जिल्ह्यातील सर्व जनतेला केले आहे.


कोरोना रोगापासून पुर्णपणे बरा झालेल्या कोरोना योध्दयांनी कोरोना झालेल्यांना प्लाझ्मा दान करण्याची
तातडीची गरज आहे कारण आपली रोगप्रतिकारक प्रणाली कोरोना विरुध्द लढली, त्यामुळे आपल्यामध्ये
अँटीबॉडीज आहेत जे इतरांनाही लढायला मदत करतील असे मत जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांनी व्यक्त केले आहे.

   *कॉन्व्हलेसेंन्ट प्लाझ्मा हा रक्तांचा एक द्रव भाग आहे, जो कोविड १९ रोगापासून पूर्णपणे मुक्त झालेल्यारुग्णांकडून गोळा केला जातो. कोविड १९ रुग्णांमध्ये विषाणूविरुध्द रक्तामध्ये रोगप्रतिकारक (अॅन्टीबॉडीज) तयार होतात. अॅन्टीबॉडी असे प्रोटीन आहेत जे संक्रमणास विरोध करण्यासाठी मदत करतात*

    *कोरोनाची लागण होऊन २८ दिवस पूर्ण झालेल्या १८ ते ६० वयोगटातील ५५ कीलोग्रॅमच्या वर वजन असलेल्या आणि इतर रक्तदान निकषांची पूर्तता केली असावी असा पुरुष प्लाझ्मा दान करण्यासाठी पात्र ठरतो. प्लाझ्मा डोनेशन दरम्यान एक हातातुन रक्त काढले जाते आणि एक हायटेक मशिनकडे जाते ते मशिन आपला प्लाझ्मा संकलित करते आणि नंतर सुरक्षित लालपेशी आणि काही प्रमाणात सलाईन आपल्या शरीराकडे परत येते.या प्रक्रियेमुळे नियमित रक्तदानापेक्षा जास्त वेळ प्लाझ्मा दान घेते (६० ते ९० मिनिटे) पात्र प्लाझ्मा दाता प्रत्येक १४ दिवसांनी कॉन्व्हलेसेंन्ट प्लाझ्मा देवू शकतो.*
  अशी माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभामार्फत देण्यात आली आहे.

प्लाझ्मा दान करण्यासाठी इच्छुक व्यक्तींनी विजय महाजन चेअरमन साथीया ट्रस्ट ब्लड बँक दूसरा मजला, तानीया
प्लाझा बिल्डींग, स्नेहांजली शोरुमच्या मागे, रेल्वे स्टेशन जवळ, नालासोपारा (पश्चिम) फोन नंबर ९०२८६४१८८६ यांचेशी सम्पर्क साधावा,  असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Wednesday, September 23, 2020

दिग्गज वार्ताहर न्यूज.जि.प.पालघर*आर.टी.इ. २५% अंतर्गत लॉटरी लागलेल्या प्रवेशासाठी जि.प.उपाध्यक्ष यांचे पालकांना आवाहन*

दिग्गज वार्ताहर न्यूज.
जि.प.पालघर

*आर.टी.इ. २५% अंतर्गत लॉटरी लागलेल्या प्रवेशासाठी जि.प.उपाध्यक्ष यांचे पालकांना आवाहन*


   आरटीई २५ % प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे त्यानुसार सोडत दि .१७ .३.२०२० रोजी काढण्यात आली असून ज्या विध्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत लॉटरी लागली आहे त्यांनी दि .३१.८.२०२० रोजी पर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निशित करावयाचा आहे .त्यानंतर लॉटरी लागलेल्या कोणत्याही बालकास प्रवेश दिला जाणार नाही याची दक्षता घ्यायी दि . ३१.८.२०२० नंतर वेटिंग लिस्ट मधील विध्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे .तसेच नोव्हेल कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव लक्षात घेता पडताळणी समितीकडे पालकांनी गर्दी करुन नये . ज्या बालकांना लॉटरी लागली आहे . त्यांच्या पालकांनी मुळ कागदपत्रे व छायांकित प्रती घेऊन ज्या शाळेत लॉटरी लागली आहे . त्या शाळेत दि .३१.०८.२०२० रोजीच्या आत जाऊन आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करावा . शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करणे शक्य नसल्यास ई - मेल द्वारे , कागदपत्रे शाळेस पाठऊन दुरध्वनी द्वारे शाळेतील मुख्याध्यापकांशी संपर्क करुन पालकांनी प्रवेश निश्चित करावा . असे आवाहन उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण समिती निलेश सांबरे यांनी केले आहे. 

    तसेच शाळांनी त्यांना आरटीई पोर्टलवर जी यादी प्राप्त झाली आहे . त्या यादीतील अद्याप शाळेत प्रवेशासाठी न आलेल्या बालकांच्या पालकांना दुरध्वनीद्वारे , ई - मेलद्वारे संपर्क करुन त्यांच्या प्रवेशाची कार्यवाही दि .३१.०८.२०२० पूर्वी पूर्ण करण्यात येईल अशी माहिती उपाध्यक्ष निलेश सांबरे,  मुख्य कार्यकारी अधिकारी , जि.प.पालघर व शिक्षण विभाग ( प्राथ . ) यांनी दिली आहे.

दि.२५/८/२०२०जि.प.पालघर*आर.टी.इ. २५% अंतर्गत लॉटरी लागलेल्या प्रवेशासाठी जि.प.उपाध्यक्ष यांचे पालकांना आवाहन*

दि.२५/८/२०२०
जि.प.पालघर

*आर.टी.इ. २५% अंतर्गत लॉटरी लागलेल्या प्रवेशासाठी जि.प.उपाध्यक्ष यांचे पालकांना आवाहन*


   पालघर (निलेश भोईर)आरटीई २५ % प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे त्यानुसार सोडत दि .१७ .३.२०२० रोजी काढण्यात आली असून ज्या विध्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत लॉटरी लागली आहे त्यांनी दि .३१.८.२०२० रोजी पर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निशित करावयाचा आहे .त्यानंतर लॉटरी लागलेल्या कोणत्याही बालकास प्रवेश दिला जाणार नाही याची दक्षता घ्यायी दि . ३१.८.२०२० नंतर वेटिंग लिस्ट मधील विध्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे .तसेच नोव्हेल कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव लक्षात घेता पडताळणी समितीकडे पालकांनी गर्दी करुन नये . ज्या बालकांना लॉटरी लागली आहे . त्यांच्या पालकांनी मुळ कागदपत्रे व छायांकित प्रती घेऊन ज्या शाळेत लॉटरी लागली आहे . त्या शाळेत दि .३१.०८.२०२० रोजीच्या आत जाऊन आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करावा . शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करणे शक्य नसल्यास ई - मेल द्वारे , कागदपत्रे शाळेस पाठऊन दुरध्वनी द्वारे शाळेतील मुख्याध्यापकांशी संपर्क करुन पालकांनी प्रवेश निश्चित करावा . असे आवाहन उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण समिती निलेश सांबरे यांनी केले आहे. 

    तसेच शाळांनी त्यांना आरटीई पोर्टलवर जी यादी प्राप्त झाली आहे . त्या यादीतील अद्याप शाळेत प्रवेशासाठी न आलेल्या बालकांच्या पालकांना दुरध्वनीद्वारे , ई - मेलद्वारे संपर्क करुन त्यांच्या प्रवेशाची कार्यवाही दि .३१.०८.२०२० पूर्वी पूर्ण करण्यात येईल अशी माहिती उपाध्यक्ष निलेश सांबरे,  मुख्य कार्यकारी अधिकारी , जि.प.पालघर व शिक्षण विभाग ( प्राथ . ) यांनी दिली आहे.

*दिग्गज वार्ताहर* बातम्यादिनांक:- २४.सप्टेंबर २०२०वार :- गुरुवार

*दिग्गज वार्ताहर* बातम्या
दिनांक:- २४.सप्टेंबर २०२०
वार :-    गुरुवार

● कामगार कायद्यांतील बदलांना मंजुरी; विरोधकांचा बहिष्कार; तीन संहिता स्वाक्षरीसाठी राष्ट्रपतींकडे

● आर्थिक आघाडीवर पूर्ण ताकदीने वाटचाल महत्त्वाची : पंतप्रधान मोदी; पंतप्रधानांची सात मुख्यमंत्र्यांशी चर्चा; करोनाच्या परिस्थितीचा आढावा

● संसदेच्या आवारात विरोधकांचा मोर्चा; बुधवारीही राज्यसभेतील विरोध पक्षांचे सदस्य संसदेच्या आवारात केंद्र सरकारचा निषेध


● कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेळेआधीच झाली संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सांगता; १८ दिवसांऐवजी १० दिवस चाललं कामकाज; १४ सप्टेंबरला सुरु झालं होतं अधिवेशन

● केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन; दिल्लीच्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

● कृषि विधेयकाविरोधात शिरोमणी अकाली दल येत्या २५ सप्टेंबरला संपूर्ण पंजाबमध्ये ‘चक्काजाम’ आंदोलन करणार; अकाली दल केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील एक घटक पक्ष आहे

● महाराष्ट्रात ९ लाख ५६ हजार रुग्ण कोरोनामुक्त, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५.६५ टक्क्यांवर; राज्यभरात सध्या २ लाख ७३ हजार ४७७ रुग्णांवर उपचार सुरू 

● वुहानमधील प्रयोगशाळेतूनच कोरोनाचा प्रसार; चीनच्या विषाणुशास्त्रज्ञ डॉ. ली मेंग यान यांचा आरोप

● मुंबई इंडियन्सचा पहिला विजय; कोलकाता नाईट राईडर्सवर 49 धावांनी मात

● ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रित सिंह आणि श्रद्धा कपूरची पुढच्या तीन दिवसात NCB कडून होणार चौकशी

भिवंडी तालुक्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी शिक्षण शुल्का व्यतिरिक्त पालकांकडून कोणतेही शुल्क घेऊ नये.

कृपाय प्रसिद्धीसाठी

भिवंडी तालुक्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी शिक्षण शुल्का व्यतिरिक्त पालकांकडून कोणतेही शुल्क घेऊ नये.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची गटशिक्षण अधिकारी यांच्या कडे मागणी.
भिवंडी (गिरीश देव)कोविड19 च्या परिस्थिती मुळे संपुर्ण देशात लॉक डाऊन झाला होता व गेल्या 7 महिन्या पासून बऱ्याच पालकांचे काम धंदे बंद पडले आहेत. बऱ्याच पालकांच्या नोकऱ्या पण गेल्या आहेत. त्या मुळे पालक खुपच अडचणीत आले आहेत. अश्यातच आता शाळा पण विद्यार्थ्यांच्या फि वसुली साठी वेगवेगळ्या प्रकारे पालकांना तगादा लावून त्रास देत आहेत.अश्याच पालकांनी शाळांच्या मनमानी विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने कडे तक्रारी केल्या होत्या.त्याची दखल घेऊन आज आम्ही या वीरोधात पालकांना होणारा त्रास व आर्थिक अडचणी संदर्भात भिवंडी पंचायत समितीच्या गटशिक्षण आधीकारी मा नीलम पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली व तालुक्यातील सर्व इंग्लिश माध्यमाच्या शाळांनी शिक्षण शुल्का व्यतिरिक्त कोणतेही शुल्क घेऊन नये अशी मागणी केली.व तसे पत्र गटशिक्षण अधिकारी यांनी तात्काळ  काढून सर्व इंग्लिश माध्यमाच्या शाळांना देऊन समज द्यावी व पालकांना दिलासा द्यावा अशीही मागणी केली.महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळात संतोष साळवी जिल्हा अध्यक्ष ठाणे (ग्रा),कौस्तुभ लिमये राज्य कार्यकरणी सदस्य,परेश चौधरी भिवंडी तालुका अध्यक्ष,सचिन पाटील शहर अध्यक्ष भिवंडी पश्चिम,हर्षल भोईर तालुका अध्यक्ष कल्याण ग्रा, गिरीश देव विभाग अध्यक्ष, सुनील देवरे, विभाग अध्यक्ष प्रणय पाटील,मिलिंद खंडागळे, वमशी वडलकोंडा इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

*करा प्लाझ्मा दान, वाचवा कोविड रुग्णांचे प्राण जिल्हाधिकारी , म.न.पा.आयुक्त, मु. का. अ. यांचे आवाहन*

*करा प्लाझ्मा दान, वाचवा कोविड रुग्णांचे प्राण जिल्हाधिकारी , म.न.पा.आयुक्त, मु. का. अ. यांचे आवाहन*

    पालघर (प्रतिनिधी)  दान करणे ही एक सुरक्षित प्रक्रिया
आहे, जी १०० वर्षाहुन अधिक वर्ष रुग्णांचे जीव वाचविण्यात मदत करण्यासाठी वापरली जात आहे.प्लाझ्मा थेरेपीच्या
माध्यमातून कोविड १९ चा रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो. त्यासाठी कोविड १९ बाधित रुग्ण जे पूर्णतः बरे झाले आहेत त्या
जास्तित जास्त प्लाझ्मा दात्यांनी पुढे येवून कोविड १९ च्या रुग्णांना जिवनदान देऊन कोरोना रुग्णाला वाचवण्याचे मोठे
काम करावे असे आवाहन  पालघर जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ, वसई विरार महानगरपालिका आयुक्त डी.गंगाधरण,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.के.सालीमठ यांनी जिल्ह्यातील सर्व जनतेला केले आहे.


कोरोना रोगापासून पुर्णपणे बरा झालेल्या कोरोना योध्दयांनी कोरोना झालेल्यांना प्लाझ्मा दान करण्याची
तातडीची गरज आहे कारण आपली रोगप्रतिकारक प्रणाली कोरोना विरुध्द लढली, त्यामुळे आपल्यामध्ये
अँटीबॉडीज आहेत जे इतरांनाही लढायला मदत करतील असे मत जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांनी व्यक्त केले आहे.

   *कॉन्व्हलेसेंन्ट प्लाझ्मा हा रक्तांचा एक द्रव भाग आहे, जो कोविड १९ रोगापासून पूर्णपणे मुक्त झालेल्यारुग्णांकडून गोळा केला जातो. कोविड १९ रुग्णांमध्ये विषाणूविरुध्द रक्तामध्ये रोगप्रतिकारक (अॅन्टीबॉडीज) तयार होतात. अॅन्टीबॉडी असे प्रोटीन आहेत जे संक्रमणास विरोध करण्यासाठी मदत करतात*

    *कोरोनाची लागण होऊन २८ दिवस पूर्ण झालेल्या १८ ते ६० वयोगटातील ५५ कीलोग्रॅमच्या वर वजन असलेल्या आणि इतर रक्तदान निकषांची पूर्तता केली असावी असा पुरुष प्लाझ्मा दान करण्यासाठी पात्र ठरतो. प्लाझ्मा डोनेशन दरम्यान एक हातातुन रक्त काढले जाते आणि एक हायटेक मशिनकडे जाते ते मशिन आपला प्लाझ्मा संकलित करते आणि नंतर सुरक्षित लालपेशी आणि काही प्रमाणात सलाईन आपल्या शरीराकडे परत येते.या प्रक्रियेमुळे नियमित रक्तदानापेक्षा जास्त वेळ प्लाझ्मा दान घेते (६० ते ९० मिनिटे) पात्र प्लाझ्मा दाता प्रत्येक १४ दिवसांनी कॉन्व्हलेसेंन्ट प्लाझ्मा देवू शकतो.*
  अशी माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभामार्फत देण्यात आली आहे.

प्लाझ्मा दान करण्यासाठी इच्छुक व्यक्तींनी विजय महाजन चेअरमन साथीया ट्रस्ट ब्लड बँक दूसरा मजला, तानीया
प्लाझा बिल्डींग, स्नेहांजली शोरुमच्या मागे, रेल्वे स्टेशन जवळ, नालासोपारा (पश्चिम) फोन नंबर ९०२८६४१८८६ यांचेशी सम्पर्क साधावा,  असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Tuesday, September 22, 2020

मुख्य सचिव यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिम जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहचविनार जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ

*मुख्य सचिव यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिम जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहचविनार  जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ*

      'पालघर(प्रतिनिधी) दि  22 :माझे कुटुंब माझी जबाबदारी' या योजनेचा शुभारंभ महाराष्ट्रात झाला असून ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी जनजागृती करण्यात यावी असे असे आवाहन मुख्य सचिव यांनी आज व्हि सी द्वारे केले आहे. या आवाहना ला जनतेनी मोठया प्रमाणात प्रतिसाद देऊन  योजना जास्तीत जास्त जनतेपर्यन्त पोहचविन्या येणार. असे जिल्हाधिकारी एस. गुरसळ यांनी सांगितले. 
      पालघर जिल्ह्यात देखील या मोहिमेचा शुभारंभ झाला आहे. दोन टप्प्यात हा उपक्रम राबविला जाणार असून जिल्ह्यातील चार लाख ९५,०००कुटुंबीयांची तपासणी करण्यात येणार आहे ७४० पथकांकडून कुटुंब सदस्यांची माहिती संकलित केली जाणार आहे.
    'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या योजनेची यशस्वीरित्या अंमलबजावणी व्हावी याकरिता मुख्य सचिव संजय कुमार यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही योजना पोहोचण्यासाठी आज व्हीसी द्वारे मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार दिलेल्या सूचनांप्रमाणे ही मोहीम पालघर जिल्ह्यात राबविण्याकरिता जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसाळ यांनी योजना जिल्ह्यातील तळागाळातील लोकांपर्यंत पोचवण्याचे आव्हान प्रशासनामार्फत केले आहे.

 पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. के. सालीमठ यांनी जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत योजना पोहोचावी व या योजनेची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी सध्या सुरू असलेल्या ऑनलाईन शाळांमधून सर्व शाळांनी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या विषयावर तासिका घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मार्गदर्शन करावे अशी सुचना केली आहे.


जिल्हा परिषद अध्यक्षा भरती कामडी याचे माझे कुटुंब माझी जबाबदारी या विषयावर जनतेला आवाहन




*मुख्य सचिव यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिम जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहचविनार जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ*

*मुख्य सचिव यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिम जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहचविनार  जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ*

      'पालघर (प्रतिनिधी)दि  22 :माझे कुटुंब माझी जबाबदारी' या योजनेचा शुभारंभ महाराष्ट्रात झाला असून ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी जनजागृती करण्यात यावी असे असे आवाहन मुख्य सचिव यांनी आज व्हि सी द्वारे केले आहे. या आवाहना ला जनतेनी मोठया प्रमाणात प्रतिसाद देऊन  योजना जास्तीत जास्त जनतेपर्यन्त पोहचविन्या येणार. असे जिल्हाधिकारी एस. गुरसळ यांनी सांगितले. 
      पालघर जिल्ह्यात देखील या मोहिमेचा शुभारंभ झाला आहे. दोन टप्प्यात हा उपक्रम राबविला जाणार असून जिल्ह्यातील चार लाख ९५,०००कुटुंबीयांची तपासणी करण्यात येणार आहे ७४० पथकांकडून कुटुंब सदस्यांची माहिती संकलित केली जाणार आहे.
    'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या योजनेची यशस्वीरित्या अंमलबजावणी व्हावी याकरिता मुख्य सचिव संजय कुमार यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही योजना पोहोचण्यासाठी आज व्हीसी द्वारे मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार दिलेल्या सूचनांप्रमाणे ही मोहीम पालघर जिल्ह्यात राबविण्याकरिता जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसाळ यांनी योजना जिल्ह्यातील तळागाळातील लोकांपर्यंत पोचवण्याचे आव्हान प्रशासनामार्फत केले आहे.

 पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. के. सालीमठ यांनी जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत योजना पोहोचावी व या योजनेची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी सध्या सुरू असलेल्या ऑनलाईन शाळांमधून सर्व शाळांनी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या विषयावर तासिका घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मार्गदर्शन करावे अशी सुचना केली आहे.

Monday, September 21, 2020

दिग्गज वार्ताहर* बातम्यादिनांक:- २२,सप्टेंबर २०२०वार। :- मंगळवार

*दिग्गज वार्ताहर* बातम्या
दिनांक:- २२,सप्टेंबर २०२०
वार।   :- मंगळवार

● भारतीय युद्धनौकावर प्रथमच महिला अधिकारी तैनात; गस्त घालणाऱ्या हेलिकॉप्टर्सचे करणार सारथ्य; युद्धनौकेवरील हेलिकॉप्टरच्या पायलट म्हणून ऑन बोर्ड काम करणार

● केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात १ लाख पदे रिक्त; सेवा भरती नियमाला अनुसरूनच या जागा भरण्यात येतील; गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांची माहिती 

● गव्हासह पाच पिकांच्या आधारभूत किंमतीत वाढ; पंजाब, हरयाणासह उत्तर भारतातील संतप्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न

● उत्तर प्रदेश सरकारने शोधली फिल्मसिटीसाठी १००० एकर जागा; दिल्लीजवळ उभारणार प्रकल्प; देशातील सर्वात मोठी आणि सुंदर फिल्ससिटी उभारणार

● राज्यात दिवसभरात ३२ हजार ०७ रुग्ण बरे होऊन घरी परतले, कोरोनामुक्तांचा नवा उच्चांक; राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७४.८४ टक्क्यांवर  

● राज्यात २४ तासांत पाच पोलिसांचा मृत्यू, आणखी १५९ कोरोनाबाधित; कोरोनाबाधित पोलिसांची एकूण संख्या आता २१ हजार ३११ वर

● मनाई आदेश असतानाही मनसेच्या नेत्यांनी केलेला लोकल प्रवास भोवणार; मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे व इतर तीन पदाधिकाऱ्यांवर कर्जत लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा केला दाखल  

● अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विष भरलेले पाकीट पाठवणाऱ्या महिलेस न्यूयॉर्क-कॅनडा सीमेवर अटक 

● विराट सेनेच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची सनरायझर्स हैदराबादवर 10 धावांनी मात करत आयपीएलच्या तेराव्या हंगामाची विजयी सुरवात

● अभिनेता अक्षय कुमार चा 'बेल बॉटम' चित्रपटातील फर्स्ट लूक आला समोर; सोशल मिडियावर शेअर केला फोटो

शासकीय व खाजगी रुग्णालयांमधील उपलब्ध बेडच्या माहितीसाठी नियंत्रण कक्ष क्रमांक जाहीर

शासकीय व खाजगी रुग्णालयांमधील उपलब्ध बेडच्या
 माहितीसाठी नियंत्रण कक्ष क्रमांक जाहीर

अलिबाग,जि.रायगड दि.21 (जगधीश) :-  जिल्ह्यामध्ये सर्व खाजगी व शासकीय कोविड-19 रुग्णालयांमध्ये उपलब्ध ऑक्सिजन बेड व आय.सी.यू. बेडबाबत सनियंत्रण करण्यासाठी तहसिलदार कार्यालयामध्ये व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

त्यानुसार रायगड जिल्ह्यात कोविड-19 रुग्णांसाठी सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या ऑक्सिजन बेड O2 व आय.सी.यू. बेडची माहिती नागरिकांना मिळण्यासाठी प्रत्येक तहसिलदार कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आलेला आहे. या क्रमांकावर संपर्क केल्यास जिल्ह्यातील शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या बेडची माहिती उपलब्ध होवू शकेल.

तहसिल कार्यालय, अलिबाग-02141-222054, तहसिल कार्यालय, पेण-02143-252036, तहसिल कार्यालय, मुरुड-02144-274026, तहसिल कार्यालय, पनवेल-022-27452329, तहसिल कार्यालय, उरण-022-27222352, तहसिल कार्यालय, कर्जत-02148-222037, तहसिल कार्यालय, खालापूर-02192-275048, तहसिल कार्यालय, माणगाव-02140-262632, तहसिल कार्यालय, तळा-7066069317, तहसिल कार्यालय, रोहा-02194-232232, तहसिल कार्यालय, पाली-02142-242665, तहसिल कार्यालय, श्रीवर्धन-7249579158, तहसिल कार्यालय, म्हसळा-02149-232224, तहसिल कार्यालय, महाड-02145-222142, तहसिल कार्यालय, पोलादपूर-02191-240026, जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग-02141-222118.

तरी गरजू नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.

अतिवृष्टीची पूर्व सूचना दिग्गज वार्ताहर (जगधिष घरत)

**अतिवृष्टीची पूर्व सूचना**

दिग्गज वार्ताहर (जगधिष घरत)अलिबाग
प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या पूर्व सूचनांनुसार दिनांक 21 व 22 सप्टेंबर, 2020 या कालावधीत  रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. नदीच्या आसपासच्या परिसरातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून  सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. तसेच दरडग्रस्त, सखल भागातील नागरिकांनी योग्य वेळी सुरक्षित ठिकाणी जाऊन स्थलांतर करावे. आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे. पुराच्या पाण्यातून वाहने चालवू नयेत, इलेक्ट्रिक पोल्स, स्विच बोर्ड,  इलेक्ट्रिक वायर्स  यांना हात लावू नये, यापासून दूर राहावे. स्थानिक प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांना सहकार्य करावे, त्यांच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. नागरिकांनी घाबरून न जाता स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे. फी असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे. 

आपत्ती व्यवस्थापन कक्ष, 
जिल्हाधिकारी कार्यालय-अलिबाग

'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ला सहकार्य करण्याचे आवाहन

'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ला सहकार्य करण्याचे आवाहन

माणगाव : (जगधिश घरत) दिग्गज वार्ताहर

गेल्या सात महिन्यांपासून आपण सारेजण कोरोना विषाणूशी लढाई लढत आहोत. नागरिकांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी शासन तसेच प्रशासनही शक्य ते सर्व प्रयत्न करीत आहेत. मात्र दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने आता शासनाबरोबर प्रत्येक नागरिकांचीही ही महामारी रोखण्यासाठी जबाबदारी वाढली आहे. प्रत्येकांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी 


घेतली तरच कोरोनाला रोखण्यास शासन,प्रशासन व आपणा सर्वांना यश येईल.या सर्व परिस्थितीचा विचार करुनच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी माझे कुटुंब,माझी जबाबदारी ही मोहीम राज्यात सुरू केली असून या मोहिमेला माणगाव नगरपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांनी सहकार्य करून आपण सारेजण मिळून सामुदायिक प्रयत्नांच्या जोरावर माणगाव नगरीतून कोरोनाला हद्दपार करूया असे आवाहन माणगाव नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक आनंद यादव यांनी केले आहे.

शासनाने कोविड १९ नियंत्रणासाठी तसेच मृत्युदर कमी करण्यासाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी कोविडमुक्त महाराष्ट्र ही मोहिम हाती घेतली आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत राज्यातिल शहरे,गाव,वाडी,वस्त्या यांतील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी आणि प्रत्येक नागरिकास व्यक्तिशः भेटून आरोग्य शिक्षण 
दिले जाणार आहे. ही मोहिम सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर कालावधीत घेण्याचे निश्चित करण्ट आले आहे. या मोहीम कालाव गृहभेटी देण्यासाठी आरोग्य पथक तर करण्यात आली आहेत.दरम्यान या कोणी घावरण्याचे काही कारण नसू आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेच्या दृष्ट उपयुक्त असल्याने माणगाव नगरी सर्व नागरिकांनी या मोहिमेला सहक करा असे आवाहन आनंद यादव य केले आहे.

माणगावमध्ये पालकमंत्र्यांनी केले आरोग्य प्रबोधन .

माणगावमध्ये पालकमंत्र्यांनी केले आरोग्य प्रबोधन .

माणगाव :(जगधिश घरत) दिग्गज वार्ताहर
ग्रामस्थांच्या सहकार्यातून कोरोना विषाणूचा समर्थपणे सामना करीत त्याचे उच्चाटन निश्चित होईल, असा विश्वास पालकमंत्री आदिती तटकरे यांनी शनिवार १९ सप्टेंबर रोजी माणगाव येथे व्यक्त केला. पालकमंत्र्यांनी काही घरांना भेटी देऊन कोरोनाविषयी जनजागृती केली. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ऑक्सिजन व तापमान तपासणी करून मोहिमेला सुरुवात करण्यात आली.

यावेळी प्रांताधिकारी प्रशाली जाधव दिघावकर, तहसीलदार प्रियंका आयरे कांबळे, नायब तहसीलदार बी. वाय. भावड, माजी सभापती संगिता बक्कम, नगराध्यक्षा योगिता  चव्हाण, माजी नगराध्यक्ष आनंदशेठ यादव, उपनगराध्यक्ष दिलीप जाधव, स्वच्छता व आरोग्य सभापती रत्नाकर उभारे, जिल्हा राष्ट्रवादी उपाध्यक्ष रवींद्र मोरे, शहर राष्ट्रवादी अध्यक्ष महामूद धुंदवारे, सुमित काळे, मुख्याधिकारी राहुल इंगले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रदिप वैद्यकीय अधिकारी, आरोम अधिकारी, कर्मचारी उपस्थि

*एस. के. सालीमठ यांनी पदभार स्वीकारला*

*एस. के. सालीमठ यांनी पदभार स्वीकारला*

पालघर(प्रतिनिधी) दि.21 :  पालघर  जिल्हा परिषदेचे नवनियुक्त  मुख्य कार्यकारी अधिकारी  एस. के. सालीमठ यांनी पदभार स्वीकारला. या  श्री. सालीमठ हे यापूर्वी कोकण भवन येथे  उपायुक्त या पदावर कार्यरत होते. 
माजी. मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन यांनी श्री सालीमठ यांचे स्वागत करुन पुढील  कार्यास शुभेच्छा दिल्या.

भिवंडीत तीन मजली इमारत कोसळून आठ जणांचा मृत्यु: एका लहान मुलासह पाच जणांची सुखरूप सुटका

भिवंडीत तीन मजली इमारत कोसळून आठ जणांचा मृत्यु: एका लहान मुलासह पाच जणांची सुखरूप सुटका
एनडीआरएफच्या जवानांकडून बचाव कार्य सुरू

ठाणे(गिरीश देव): भिवंडी नारपोली  भागातील धामणकर नाका येथील पटेल कॉम्प्लेक्स मधील तीन मजली  जिल्हानि इमारतीचा अर्धा भाग कोसळून आठ जणांचा मृत्यु झाला आहे. याठिकाणी ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जवानांनी एका लहान बाळासह पाच जणांना  सुखरुप बाहेर काढल्याची माहिती सूत्रांनी दिली .  या इमारतीचा अर्धा भाग पडला असून अर्धा तसाच उभा आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अंदाजे 35 व्यक्ती अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. आज पहाटे ३.४० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 
याठिकाणी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून घटनास्थळी भिवंडी अग्निशमन केंद्राचे जवान,  ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे  पथक आणि मुबईतील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची एक तुकडी बचाव कार्यासाठी कार्यरत आहेत.





Saturday, September 19, 2020

*मनसे वाहतूक सेना भिवंडी शहरकडून सफाई कर्मचाऱ्यांचा जाहीर सत्कार*

*मनसे वाहतूक सेना  भिवंडी शहरकडून सफाई कर्मचाऱ्यांचा जाहीर सत्कार*
      
      भिवंडी (गिरीश देव) आज दिनांक १९/०९/२० रोजी सन्मा. राज साहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन, सन्मा. संजय नाईक साहेब (अध्यक्ष, वाहतूक सेना, महाराष्ट्र राज्य ), रोहिदास पाटील साहेब (जिल्हा संघटक, वाहतूक सेना ), संतोष म्हात्रे साहेब (तालुका संघटक, वाहतूक सेना, भिवंडी ) यांच्या अनमोल मार्गदर्शनाने आज भिवंडी शहरातील गुलजार नगर, इंदिरा गांधी हॉस्पिटल परिसरातील आरोग्य  निरीक्षक, मुकादम,सर्व सफाई कर्मचाऱ्यांचा कोरोनाच्या कालावधीत जीवावर उदार होऊन सफाईचे काम प्रामाणिकपणे केल्याबद्दल भिवंडी शहर वाहतूक सेना संघटक श्री फिरोज शेख(भिवंडी पूर्व ) व शकील शेख (भिवंडी पश्चिम )यांनी त्यांचा जाहीर सत्कार केला. 
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भिवंडी मनसे शहराध्यक्ष श्री मनोज वामन गुळवी उपस्थित होते. त्याचप्रमाणे सरवर खान (उपशहर संघटक, वाहतूक सेना ), दत्ता ताळे (उपशहर संघटक, वाहतूक सेना पच्छिम ), वासिम अन्सारी (सहसचिव, मनसे ), सुनील नाईक (सहसचिव, मनसे ), सईद शेख, महेश धुमाळ, सुशील आवटे, आदिकरून शेकडो मनसेसैनिक उपस्थित आले. मनोज गुळवी साहेबांनी सफाई कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धे म्हणून त्यांचा शब्द सुमनांनी गौरविले. 
सर्व सफाई कर्मचारी या सत्काराने भारावून गेले.

घराला लाईट मीटर साठी तीन वर्षाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला भिवंडी (गिरीश देव)


घराला लाईट मीटर साठी तीन वर्षाचा प्रलंबित प्रश्न  मार्गी लागला 
भिवंडी (गिरीश देव) गेले तीन वर्षां पासून 
टेंभिवली गावातील भगिनी आशा नवनाथ पाटील
यांच्या घरला मीटर नसल्यामुळे त्यांना विजे पासून त्यांच्या कुटुंबाला अंधारात तीन वर्षे राहावे लागले होते . मीटर नव्हतं त्यांनी सतत टोरेंट पावर कंपनी कडे मीटर लावावे या साठी प्रयत्न केला पण कंपनी ने त्यांना मिटर लावून दिल नाही.शेवटी जु नांदुरखी गावातील श्री तरुण अजय पाटील यांनी श्री गिरीश देव यांच्याशी  संपर्क साधून संपूर्ण हकीकत सांगितली व माझ्या कडून  लेखी पत्राव्दारे मदत मागितली.मी पण क्षणाचाही विलंब न करता थेट टोरेंट च्या अधिकाऱ्यांना संपर्क करून तात्काळ मीटर मिटर लावुन देण्यास सुचवलं व आठ दिवसा च्या आत टोरेंट कंपनी ने आशा ताईंच्या घराला मिटर लावले व प्रश्न मार्गी लावला .हा प्रश्न  छोटा होता पण अत्यंत गरजेचा होता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून हा  प्रश्न  मांडला व मार्गी लावला आहे .त्यामुळे आशाताई यांच्या कुटुंबा कडून यांना धन्यवाद दिले .
संतोष साळवी
अध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रा
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना

*राज्य पाणी व स्वच्छता मिशनसाठी बोधचिन्ह व बोधवाक्य स्पर्धेचे आयोजन*

दि.१९/९/२०२०
जि.प.पालघर

*राज्य पाणी व स्वच्छता मिशनसाठी बोधचिन्ह व बोधवाक्य स्पर्धेचे आयोजन*
 
      पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने राज्य पाणी व स्वच्छता मिशन च्या अंमलबजावणी  करीता मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. या मिशनसाठी ग्रामीण पाणी पुरवठा आणि ग्रामीण स्वच्छता या विषयाच्या अनुषंगाने बोधचिन्ह तयार करण्यासाठी राज्यात बोधचिन्ह स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून निवड झालेल्या स्पर्धकास पन्नास हजार रूपयाचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तरी या स्पर्धेसाठी पालघर जिल्ह्यातून जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन पालघर जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.  
                  बोधचिन्ह ग्रामीण पाणी पुरवठा आणि ग्रामीण स्वच्छता या विषयांचा सहज बोध होईल असा असावा. ब्रिदवाक्य मराठीतूनच व मोजक्या शब्द मर्यादेत असावे. या  स्पर्धेत चित्रकार व्यक्ती, संस्था, जाहिरात संस्था सहभागी होऊ शकतील.बोधचिन्ह (Logo) एकरंगी , बहुरंगी प्रकारात असला तरी चालेल. सहभागींनी लोगोची सोफ्ट कॉपी पाठविणे आवश्यक असेल. त्यासोबत स्पर्धकाची संपूर्ण माहिती उदा. पत्ता, संपर्क क्रमांक, ई - मेल आयडी इ. असणे आवश्यक असेल. लोगो अंतिम करण्याचे संपुर्ण अधिकार राज्य पाणी व स्वच्छता मिशनला आहेत. स्पर्धेतील सहभागींनी लोगोची सोफ्ट कॉपी directorwsso@gmail.com , iecwsso@gmail.com व sbmzppalghar@gmail.com या मेल आयडीवर पाठविण्यात यावी. ज्या सहभागीचे बोधचिन्ह आणि बोधवाक्य  यांची  अंतिम निवड होईल त्यांना रूपये ५० हजार एवढी रक्कम बक्षीस स्वरूपात राज्यस्तरावरून देण्यात येईल.दिनांक ३० सप्टेंबर २०२० रोजी दुपारी १२.००वाजेपर्यंत जिल्हातून प्रवेशिका राज्यस्तरावर पाठविण्यात यावे. आपल्या जिल्ह्यातून या स्पर्धेला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळावा यासाठी आपल्या तालुक्यातील कलाकार, विद्यार्थी, विविध प्रकारच्या संस्था, चित्रकार यांनी  स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदर पालघर यानी केले  आहे.

Friday, September 18, 2020

दिग्गज वार्ताहर* बातम्यादिनांक:- १९.सप्टेंबर २०२०वार :- शनिवार

*दिग्गज वार्ताहर* बातम्या
दिनांक:- १९.सप्टेंबर २०२०
वार     :- शनिवार

● जागतिक मनुष्यबळ विकास निर्देशांकांत भारत 174 देशाच्या यादीत 116 व्या क्रमांकावर; सरकारला या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम करावे लागणार

● पीमसी बँक घोटाळ्यात दिल्लीमध्ये १०० कोटींची संपत्ती जप्त; सक्तवसुली संचालनालयाची (ED) धडक कारवाई


● गरीब विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी सरकारी आणि खासगी शाळांनी मोफत साधने द्या; दिल्ली उच्च न्यायालयाचा शाळांना आदेश

● Paytm पुन्हा एकदा गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध; पेटीएमनेच दिली माहिती


●  राज्याला मोठा दिलासा; विक्रमी २२ हजारावर रुग्ण एकाच दिवशी कोरोनामुक्त; राज्यात आजवर एकूण ८ लाख ३४ हजार ४३२ रुग्णांनी कोरोनाची लढाई जिंकली
 
● उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनने बनवले नवे घातक Hwasong-15 क्षेपणास्त्र; अमेरिकेला उद्ध्वस्त करण्याची क्षमता

● एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाने जयपूरमधून दुबईला जाणाऱ्या प्रवाशाला कोरोनाची लागण; एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानांना दुबईमध्ये 15 दिवसांसाठी बंदी 

● सेंट लुइस बुद्धिबळ स्पर्धा : भारताचा हरिकृष्ण पाचव्या स्थानी कायम; अमेरिकेच्या जेफ्री झियाँगला ६६ चालींमध्ये नमवले

● अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरण : अभिनेता सलमान खान, करण जोहरसह ८ सेलिब्रिटींना कोर्टात हजर राहण्याचे आदेश

*मृत्यू दर घटवण्यासाठी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीम महत्वाची*

*मृत्यू दर घटवण्यासाठी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी'  मोहीम महत्वाची*
 जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ* 

        पालघर (प्रतिनिधी)दि  18 :  मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेची राज्यात सुरवात  झाली असून  प्रशासना कडून ही मोहीम यशस्वीपणे राबवण्या साठी आपले पूर्ण योगदान देणार आहे. जिल्हयातील वाढता मृत्युदर घटवण्यासाठी ही योजना नक्कीच महत्वाची ठरेलं . असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ  यांनी व्यक्त केला.
   प्रसिद्धी माध्यमांनी हा उपक्रम तळागाळातील जनतेपर्यंत पोचवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे विनंती वजा आवाहन जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना केले. माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेच्या प्रसिद्धी साठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा परिषद आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हास्तरीय पत्रकार परिषद आयोजित केली होती.त्यावेळी ते बोलत होते.

 कोविड -१ ९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहे . असे असले तरी कोरोनावर हमखास असा तोडगा सापडून संपूर्ण नियंत्रण येईपर्यंत जीवनशैलीमध्ये काही बदल करणे आवश्यक झाले आहे . अशा बदलांचा स्विकार करून , त्या माध्यमातून कोरोनावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हयात ' माझे कुटुंब - माझी जबाबदारी ' मोहीमेचा मोठा वाटा असेल असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.
  

 जिल्हयातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचून आरोग्य तपासणी करणे त्याचबरोबर प्राणवायू पातळी तपासणे , आरोग्य शिक्षणासह महत्वाचे आरोग्य संदेश देणे , कोविड १ ९ चे संशयित रुग्ण शोधणे , उपचारासाठी संदर्भ सेवा देणे व आरोग्याविषयी जागृती करणे आदी बाबी या मोहिमेत राबविल्या जाणार आहेत . 

' माझे कुटुंब - माझी जबाबदारी ' ही मोहीम वैयक्तिक , कौटुंबिक तसेच सार्वजनिक जीवनात प्रतिबंधात्मक खबरदारी घेण्याबाबत अशी अत्यंत आवश्यक त्रिसुत्रीवर आधारित असणार आहे . नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवणे , मास्कचा नियमित व योग्य वापर करणे व वारंवार हात स्वच्छ धूणे तसेच निर्जंतुकीकरणाचा योग्य वापर करणे याबाबतचे महत्व नागरिकांना मोहिमेत पटवून दिले जाणार आहे . 

 ' माझे कुटुंब - माझी जबाबदारी' मोहीम जिल्हयातील सर्व नगरपालिका , नगरपंचायत व ग्रामपंचायत इत्यादी ठिकाणी राबविली जाईल . या मोहिमेंतर्गत सर्व शहरे , गावे , वाडी पाडे  इत्यादीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांची तपासणी केली जाईल. जेणेकरून रुग्ण समोर येण्यास व मृत्यूदर घटण्यास निश्चित मदत होईल असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.पालघर महेंद्र वारभुवन यांनी व्यक्त केले.
  या पत्रकार परिषदेस  जिल्हा शल्य चिकित्सक कांचन वानेंरे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दयानंद सूर्यवंशी,तहसीलदार चंद्रसेन पवार,  सहा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सागर पाटील व जिल्हयातील वृत्तपत्र व वृत्त वाहिन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...