Wednesday, September 29, 2021

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*


          पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पहिल्या सोमवारी 1.00 वाजता घेण्यात येतो. माहे ऑक्टोबर महिन्यातील लोकशाही दिन हा दि. 04 ऑक्टोबर, 2021 रोजी दुपारी 1.00 वाजता घेण्यात येणार होता. परंतु मा. न्यायालयीन निर्णयानुसार पालघर जिल्हा परिषदेमधील 15 निवडणुक विभाग व पंचायत समित्यांमधील 14 निर्वाचक गणातील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम दि.13 सप्टेंबर, 2021 रोजीच्या प्रसिध्दी पत्रकान्वये घोषित केला असून दि. 13 सप्टेंबर, 2021 पासून ते दि. 08 ऑक्टोंबर, 2021 पर्यंत जिल्ह्यात आचार संहिता लागू झाल्याने, जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार नाही.
तसेच पुढील लोकशाही दिन नेहमी प्रमाणे महिन्याच्या पहिल्या सोमवारी घेण्यात येईल. कृपया यांची नोंद घ्यावी. असे निवासी उपजिल्हाधिकारी, पालघर डॉ. किरण महाजन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
*

Tuesday, September 28, 2021

आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन. अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांनी जपली सामाजिक बाधिलकी!

आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन. अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांनी जपली सामाजिक बाधिलकी! 
कल्याण-दी.२८(किशोर पाटील) 
आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन यांच्या  विद्यमाने  फाउंडेशनचे अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यानी गेल्या अनेक वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपरयात आरोग्य शिबीराचे मोफत आयोजन करुन गरीब गरजु सह सर्व सामान्य लोकांना मदतीचा हात पुढेे  करून  आपन सामाज्याचे काही तरी देने लागतो हा विचार मनी धरून सामाज्या प्रति आपली भावना सामाजिक बाधिलकी च्या रुपाने करत आहेत,सदर शिबिराचे आयोजन आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन.अनंता सुधा भवन. शॉप नंबर 3. न्यू स्टार सिटी हॉस्पिटल खाली. चक्की नाका. कल्याण ( पूर्व ) येथून केले जाते. त्यामुले प्रत्येक शिबिरातून २०/२५ नागरिकांना (रुग्णांना) मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी तेरणा हॉस्पिटल  याठिकाणी  पाठवण्यात येते. आजही झालेल्या शिबिरात २५ रुग्णांना तेरणा हॉस्पिटल नवी मुंबई येथे पाठवण्यात आले. त्यामधे खलील आजारांवर मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात. 
1) हृदयाची शस्त्रक्रिया.2) अन्ननलिका शस्त्रक्रिया 3) हाडांचे फॅक्चर शस्त्रक्रिया 4) कॅन्सर शस्त्रक्रिया  5) कान.नाक व घसा शस्त्रक्रिया  6) हर्निया  7) स्वशननलिकेच्या संबंधित शस्त्रक्रिया  8) पुरुष ग्रंथी  वाढणे मूत्राशयाच्या मार्ग संकुचित होणे 9) मणक्याची शस्त्रक्रिया  10) यकृत्याचे आजार / शस्त्रक्रिया 11) सांध्याच्या शस्त्रक्रिया  12) अपेन्डिस  13) डोळ्यातील सफेद पडद्याची शस्त्रक्रिया  14) मुतखडा शस्त्रक्रिया  15) जीभेच्या शस्त्रक्रिया  16) किडनीचे आजार  17) गर्भपिशवी दुरुस्ती  18) पित्ताशय किंवा पित्ताशयातील खडे शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे. या सर्व रुग्णांना घेऊन जाण्यासाठी गाडीची व्यवस्था आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांच्याच कडून मोफत केली जाते.

गुलाब चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अतिमुसळधार पावसाची शक्यता

*गुलाब चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अतिमुसळधार पावसाची शक्यता* 

 
*नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ  यांचे आवाहन*

पालघर (प्रतिनिधी)दि. २८  : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या सुचनेनुसार बंगालच्या समुद्रात वादळ (गुलाब चक्रीवादळ)  निर्माण झाल्याने दिनांक १ ऑक्टोबर २०२१ पर्यत  कोकण किनापट्टीलगतच्या जिल्हयातील समुद्र किनाऱ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने  जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ  यांनी केले आहे.

याकाळात झाडे पडणे, पत्रे उडून जाणे, पाणी साचणे, विजेचे खांब कोसळणे, पुरात वाहून जाणे, विज पडून मृत्यु, जनावरे वीज पडून, पाण्यात बुडन मयत होणे,  अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. तसेच संबंधित गावातील तलाठी यांना घडलेल्या घटनेचा वृतांत तात्काळ कळविणे, व तालूका नियंत्रण कक्षात फोन करणे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात 8237978873 या क्रमांकावर संपर्क साधण्याच्या सुचना जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी केल्या.

नवीन महाविद्यालय, अभ्यासक्रम सुरु करण्यासाठीचे वेळापत्रक एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय



*नवीन महाविद्यालय, अभ्यासक्रम सुरु करण्यासाठीचे वेळापत्रक एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय* 


मुबई(प्रतिनिधी)नवीन महाविद्यालय तसेच अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी निश्चित केलेले वेळापत्रक कोविडमुळे एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. 
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 109 मध्ये नवीन महाविद्यालय, परिसंस्था सुरु करणे तसेच नवीन अभ्यासक्रम, विषय, विद्याशाखा, अतिरिक्त तुकड्या किंवा सॅटेलाईट केंद्र सुरु करण्यासाठी परवानगी देण्याची पद्धत निश्चित केली आहे.  कोविडमुळे वर्ष 2021-22 मध्ये विहित वेळेत कार्यवाही होऊ न शकल्याने हे वेळापत्रक एक महिन्याने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.  या संदर्भात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील कलम 109 मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्यात येईल.
-----०-----

Monday, September 27, 2021

अंबरनाथमध्ये हॉटेल चालकाकडून दुसऱ्यांदा वीजचोरी; गुन्हा दाखल

अंबरनाथमध्ये हॉटेल चालकाकडून दुसऱ्यांदा वीजचोरी; गुन्हा दाखल

कल्याण(प्रतिनिधी): दि. 27 सप्टेंबर 2021

महावितरणच्या पथकाने अंबरनाथ पश्चिमेतील नेताजी मार्केट परिसरातील नवाब हॉटेलमध्ये रिमोटच्या साह्याने सुरु असलेली वीजचोरी उघडकीस आणली आहे. विशेष म्हणजे वीजचोरी प्रकरणी या हॉटेलविरुद्ध 2017 मध्ये कारवाई करून चोरीच्या विजेचे 2 लाख 95 हजार 720 रुपयांचे वीजबिल व 55 हजार रुपयांचा दंड वसूल केला होता. आता नुकत्याच केलेल्या कारवाईत 25 हजार 350 रुपयांची 1202 युनिट वीज चोरून वापरल्या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.  

नवाब हॉटेलचा सध्याचा वीज वापरकर्ता अब्दुल शब्बीर बद्रुद्दीन व हॉटेलचा मालक सलीम शेख अशी याप्रकरणी वीज कायदा-2003 च्या कलम 135 व 138 नुसार गुन्हा दाखल झालेल्या आरोपीची नावे आहेत. हॉटेलच्या मीटरची तपासणी केली असता मीटरला तडा गेल्याचे निदर्शनास आले. संशयित मीटर जप्त करून तपासणी केली असता मीटरमध्ये रिमोट कंट्रोल सर्किट बसवल्याने आढळून आले. आरोपींकडून वीज चोरीसाठी वापरण्यात आलेला रिमोट कंट्रोलही जप्त करण्यात आला आहे. नोव्हेंबर 2017 मध्ये नवाब हॉटेलविरुद्ध वीजचोरीची कारवाई करून त्याच महिन्यात साडेतीन लाख रुपये वसूल करण्यात आले होते. महावितरणकडून ग्राहकांच्या वीज वापरावर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून उपलब्ध माहितीच्या आधारे वीज चोरांवर कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार असून कोणतीही युक्ती वापरून विजेचा अनधिकृत वापर करू नये, असे आवाहन मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी कल्याण परिमंडलातील ग्राहकांना केले आहे. सहायक अभियंता मनीषा मुऱ्हे, प्रकाश हरद, तंत्रज्ञ अजित पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

सफाळे पोलीस ठाणे,जि. प. / पंचायत समिती पोट निवडणुकी साठी सज्ज.

सफाळे पोलीस ठाणे,
जि. प. / पंचायत समिती  पोट निवडणुकी साठी सज्ज. 

  सफाळे ( हिरालाल लोखंडे) पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी पोट निवडणूकीच्या अनुषंगाने सफाळे पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी श्री संदिप कहाळे सहा. पोलिस निरीक्षक यांनी दिनांक २५ सप्टेंबर २०२१ रोजी तांदुळवाडी, लालठाणे, खडकोली आदी भागातील राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, मतदार, सामाज सेवक, यांची संयुक्त रित्या ग्रामपंचायत कार्यालय तांदुळवाडी ता,जि पालघर .येथे पोट निवडणूक संदर्भात मिटींग घेतलेली. 
     सदर मिटींगमध्ये उपस्थित ग्रामस्थ, सर्वपक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी, स्थानिक ग्रामपंचायत मधील पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना, सदर निवडणुक दरम्यान " करोना " विषाणूंचा प्रादुर्भाव, संसर्ग, व संक्रमण होणार नाही. या करीता उपाययोजना करून स्वतःची काळजी घेण्यासंदर्भात, मार्गदर्शन व सुचना केल्या. मतदान व मतदाता  या संदर्भातील प्रश्न, अडीअडचणी ऐकून घेऊन, समस्यांचे निराकरण, समाधान करीत. निवडणूक आयोगाने लागू केलेल्या " आचार संहितेचे " पालन करण्यासाठी सर्वाना सुचना देत, निवडणूकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करीत, कायदा आणी सुव्यवस्था राखत आगामी निवडणूक शांततेत, निर्भिडपणे पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले. या वेळी  श्री सुजित पाटील - पोलीस पाटील तांदुळवाडी, श्री संदेश पाटील - पोलीस पाटील लालठाणे, श्री शदर सातवी - पोलीस पाटील खडकोली, श्री कैलास शेळके पो, नाईक, श्री राजेंद्र घुगे काॅन्सटेबल सफाळे पोलीस ठाणे आदि उपस्थित होते

दयानंद चोरघे यांच्या आदेशानुसार भिवंडी युवक कांग्रेस च्या वतीने रांजनोली रिलायन्स पेट्रोल पंम्प जवळआंदोलन!

दयानंद चोरघे यांच्या आदेशानुसार भिवंडी युवक कांग्रेस च्या वतीने रांजनोली रिलायन्स पेट्रोल पंम्प जवळ
आंदोलन! 
भिवंडी - किशोर पाटील
भारतीय किसान संघटनेने पुकारलेल्या भारत बंदच्या आंदोलनास *भिवंडी ग्रामीण काँग्रेस ने जिल्हा अध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष श्री. दयानंद मोतीराम चोरघे यांच्या आदेशानुसार* भिवंडी येथील रांजनोली रिलायन्स पेट्रोल पंम्प समोर *युवक काँग्रेसचे पदाधिकारी व भिवंडी ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष निलेश भोईर  यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले गेले* यांच्या समवेत प्रमुख उपस्थिती म्हणुन सरचिटणीस ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस पंकज अशोक गायकवाड हे सुद्धा उपस्थित होते. भारतातील शेतकर्यांना न्याय मिळण्यासाठी धरणे आंदोलन केले.तसेच *भिवंडी ग्रामीण मध्ये संयुक्त किसान संघटना यांच्या सर्व पक्षीय आंदोलनाला पाठिंबा सुध्दा दिला.* या आंदोलनामध्ये मुफ्फसिल पटेल, ज्ञानेश्वर(बाला)हुकमाळी, सुधाकर इताडकर, संजय गायकवाड,प्रभाकर शेळके, राजेश जाधव,रोहन जाधव, प्रशांत जाधव,अतिश भोईर,रोशन  थोरात आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...