Monday, August 31, 2020

"दिग्गज वार्ताहर" सकाळच्या बातम्या


दिनांक:-०१.सप्टेंबर २०२०
वार :-  मंगळवार

● भारतरत्न आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे दीर्घ आजाराने सोमवारी निधन; प्रणव मुखर्जींवर आज (दि १) दुपारी २.३० वाजता दिल्लीत अंत्यसंस्कार होणार; ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा

● देशभरातील गेल्या तीन महिन्यातील एकूण पावसाची स्थिती समाधानकारक; देशभरात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा सुमारे १० टक्के अधिक पाऊस  

● संसदेचे अधिवेशन १४ सप्टेंबरपासून; सर्व खासदारांची चाचणी केली जाणार; अंतराचा नियम पाळण्यासाठी लोकसभा आणि राज्यसभा सभागृहातील गॅलऱ्यांमध्ये आसनव्यवस्था 
 
● अर्थव्यवस्थेची अधोगती, विकासदर उणे २३.९ टक्के; अर्थव्यवस्थेच्या प्रमुख घटकांपैकी, उत्पादन आणि बांधकाम क्षेत्राची सरलेल्या तिमाहीत अत्यंत दारुण स्थिती दिसली

● राज्यात तब्बल ११ हजार १५८ रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात; एकाच वेळी ११ हजार ८५२ नवीन रुग्णांची वाढ; राज्यातील कोरोनास्थिती अद्यापही चिंता वाढवणारी 

● आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक ३० सप्टेंबरपर्यंत बंद; अनलॉक ४ जाहीर झाल्यानंतर नागरी उड्डाण संचालनालयाचा निर्णय

● पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशात राज्य सरकारला आरक्षण अधिकार; एमसीआय ही वैधानिक संस्था असून तिला आरक्षणाबाबत तरतूद करण्याचा अधिकार नाही

● इस्त्रायल - संयुक्त अरब अमिराती दरम्यान विमान सेवा सुरू; इस्त्रायलहून अबुधाबीकडे पहिल्या व्यापारी विमानाचे काल उड्डाण झाले ही एक ऐतिहासिक घटना मानली जात आहे

● आता तरी बुद्धिबळाची दखल घ्यावी; ऑलिम्पियाडच्या यशानंतर राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसंदर्भात महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदची अपेक्षा

●  देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या जाण्याने देशाचं फार मोठं नुकसान झालंय : अभिनेता रितेश देशमुख

पालघर जिल्ह्यात 251 नवीन कोरोना रुग्णांची भर

 


पालघरग्रामीण भागात कोरोना स्फोट होण्याच्या वाटेवर पालघर जिल्ह्यात 31 ऑगस्ट रोजी एकूण 251 करुणा बाधित नवे रुग्ण. डहाणू 15 पालघर76 विक्रमगड 13 जव्हार चार मोखाडा एक वसई ग्रामीण शुन्य नवे रुग्ण. पालघर शहरात 36 सफाळे 16 सातपाटी सात बोईसर सहा माहीम दोन डहाणू नगरपरिषद 15 असे आढळले नवीन करूना बाधित रुग्ण

आर्यन शाळेचे मुख्याध्यापक श्री पुलकेश मोहिते 34 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज झाले सेवानिवृत्त

 

आर्यन शाळेचे मुख्याध्यापक श्री पुलकेश मोहिते 34 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज झाले सेवानिवृत्त करुणा संकटामुळे मोजक्याच सदस्यांनी दिला निरोप

राष्ट्रपती मा. श्री. प्रणव मुखर्जी यांचे निधन

💐दुःखद निधन💐
भारताचे माजी राष्ट्रपती मा. श्री. प्रणव मुखर्जी यांचे निधन, ते 84 वर्षाचे होते, त्यांनी 25 जुलै 2012 ते 25 जुलै 2017 पर्यत राष्ट्रपती पद सांभाळले होते.
ईश्वर आत्म्यास चिरशांती देवो ही प्रार्थना💐
भावपुर्ण श्रद्धांजली🙏🙏🙏

पथविक्रेत्यांनी पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी(PM SVANidhi)

दिनांक :-31 ऑगस्ट 2020
पथविक्रेत्यांनी पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी(PM SVANidhi)
योजनेचा लाभ घ्यावा-जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे

पालघर दि. 31 :- कोविड-19 चा प्रादुर्भाव सर्वत्र झाल्यामुळे आणि परिणामी टाळेबंदीमध्ये(Lockdown) पथविक्रेत्यांच्या उपजिविकेवर विपरित परिणाम झालेला असल्यामुळे पथविक्रेत्यांना खेळते भांडवल पतपुरवटा तातडीने प्रदान करण्याची आवश्यकता असून केंद्र शासन पुरस्कृत ' पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PM SVANidhi)' पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील महानगरपालिका/नगरपरिषदा/नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील पथविक्रेत्यांना सहाय्य म्हणून खेळते भांडवल रूपये 10,000/- कर्ज स्वरूपात बँकेकडून विनातारण कर्ज उपलब्ध केले जाणार आहे .तरी या योजनेचा  पालघर जिल्ह्यातील महानगरपालिका निगरपरिषदा/नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील सर्व पात्र पथविक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा , असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी केले आहे.
सदर योजना दि. 24 मार्च 2020 रोजी व त्यापुर्वी शहरांमध्ये पथविक्री करीत असलेल्या सर्व पथविक्रेत्यांना लागू असून, विहित कालावधीमध्ये किंवा तत्पुर्वी कर्जाची परतफेड करणारे पथविक्रेते वाढीव मर्यादेसह पुढील खेळते भांडवलाच्या कर्जासाठी पात्र असतील. सदर कर्जावर RBI च्या प्रचलित दराप्रमाणे व्याजदर लागू राहतील. पथविक्रेत्यांनी विहित कालावधीमध्ये किंवा तत्पुर्वी कर्जाची परतफेड केल्यास 7% व्याज अनुदान मिळण्यास पात्र होतील. तसेच सदर योजनेमध्ये डिजीटल व्यवहार करणाऱ्या विक्रेत्यांना 1200/- रूपयेपर्यंत कॅशबॅकची सुविधाही देण्यात येत आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पथविक्रेत्यांनी Online अर्ज www.pmsvanidhi.mohua.gov.in  या संकेतस्थळावर भरणे आवश्यक आहे. त्यासाठी जवळच्या CSC केंद्र, नागरी सुविधा केंद्र, सेतु सुविधा केंद्र यांच्याद्वारे अर्ज करू शकतात. सदर योजनेसाठी मोबाईल क्रमांक लिंक असलेले आधारकार्ड, बँक पासबूक व इतर अनुषंगिक कागदपत्रे आवश्यक असतील. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी दिली आहे.
******************

Sunday, August 30, 2020

मुजोर रेशनिंग दुकानदार करवाई करा- ग्राहक संरक्षण फाउंडेशन

पालघर पंचायत समिति भ्रष्ट अधिकाऱ्यांना प्रशासन घालतय पाठीशी


पालघर पंचायत समिति भ्रष्ट अधिकाऱ्यांना प्रशासन घालतय पाठीशी






पालघर पंचायत समिति भ्रष्ट अधिकाऱ्यांना  प्रशासन घालतय पाठीशी कुडन ग्रामपंचायतीत माहिती अधिकाराला केराची टॉपली दोन वर्षापूर्वी पैसे भरून सुद्धा माहिती देण्यास केली टाळाटाळ  जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे ग्रामसेवक व विस्तार अधिकारी यांच्या विरोधात फौजदारी कारवाई ची मागणी केल्यावर घाबरून दिली अर्धवट माहिती मोबाईल वॉट्सऐप जमान्यत माहिती अधिकार सुनावनीच्या तारखे नंतर दोन महिन्या नंतर दिले पोस्टाने पत्र




ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...