मित्र फाउंडेशनचा, करोना योध्दाना मदतीचा हात,
सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्र + सफाळे पोलीस ठाणे यांना मोफत कोविड साहित्य वाटप
सफाळे प्रतिनिधी
दिनांक २४ एप्रिल २०२१ रोजी मित्र फाउंडेशन पालघर या सामाजिक व सेवाभावी कार्य करणार्या संस्थेच्या व्दारा करोना काळात स्वतःच्या कुटूंबा पासून दुर राहुन, सर्वसामान्य लोकांनचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी रात्र न दिवस आपली सेवा देणारे. सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, नर्स, आशा तसेच आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले इतर असे एकूण शंभर कर्मचारी यांना सॅनिटायझर, मास्क, हॅन्डग्लोज व रात्रंदिवस जागता पहारा देणारे सफाळे पोलीस ठाणे येथिल अधिकार व पोलिस कर्मचारी व त्यांचे सहयोगी असे एकूण चाळीस सहकारी यांना सॅनिटायजर, मास्क चे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळेस डॉक्टर मिलींद रणदिवे जेष्ठ आरोग्य अधिकारी , डाॅ. गायकवाड, उपस्थित होते. सहाय्यक श्री पाटील, श्री मनोज पिंपळे, श्री पवार, तसेच आरोग्य कर्मचारी आशा आदी उपस्थित होते
सफाळे पोलीस ठाणे येथे साहित्य वाटप प्रसंगी मा. श्री संदीप कहाळे सहा. पो.निरीक्षक प्रभारी अधिकारी, यांच्या उपस्थित साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजक मित्र फाउंडेशन चे अध्यक्ष श्री निलेश रमेश राऊत, संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप घरत, सल्लागार सदस्य श्री हिरालाल लोखंडे - पत्रकार,श्री रोहित मोरे, श्री उचित पाटील, श्री संकेत पाटील, श्री शेखर पाटेकर आदी मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला
No comments:
Post a Comment