दोन तासात तांदुळवाडी किल्ला सर !
छोट्या ट्रेकरांची कमाल ( हिरालाल लोखंडे ) सफाळे तांदुळवाडी किल्ला हा इतिहास कालीन वेळेचा महत्त्वाचा नाकेबंदी साठी असलेला किल्ला. घनदाट जंगल,वळणा -- वळणाच्या खडतर, तीव्र चढ उतारावर असलेल्या पाउल वाटा. वा-या बरोबर वाहणाऱ्या उष्णतेच्या लाटा, अशा प्रकारचे सध्या वातावरण असताना. सात ते आठ वर्षाच्या विद्यार्थीनी तांदुळवाडीचा अति उंच किल्ला फक्त दोन तासात सर केला.
दिनांक १३ मार्च शनिवार २०२१ रोजी जे. व्हि. बॅडमिंटन क्लब सफाळे व्दारा या ट्रेक चे आयोजन करण्यात आलेले. हा ऐतिहासिक किल्ला समुद्र सपाटी पासून साधारणपणे १९०० फूट उंचीवर असून, सराईत ट्रेकर्स याकिल्ल्याचे शिखर अंदाजे एक ते दीड तासात सर करतात. तांदुळवाडी सफाळे रेल्वे स्टेशन ( पूर्व ) पासून सात किलोमीटर अंतरावर आहे. बस, रिक्षा, किंवा खाजगी वाहनाने जाता येते. नॅशनल महामार्ग नंबर आठ. वरई येथूनहि वाहनाने जाता येते.
लहान वयात न थकता खडतर कडे कपारीतून,आडवळणानाच्या वाटेने दोन तासात किल्ला सर करून, किल्याच्या वरच्या भागावर जाउन पोहचल्यानंतर, मुले आनंदाने शिवगर्जनेचा जयघोष करीत नाचू बागडू लागले. कु. द्वीप वर्तक,कु.आर्यविर ढाकणे, कु.श्रेयस भालके, कु.राजवीर गायकवाड, कु.आराध्य, कु. वेदांत, कु.धैर्या, कु. समर, कु. आयुष, कु. रूचा आदि धाडसी काटक मुला - मुलींनींचा समावेश होता. या ट्रेकिंग साठी श्री जितेंद्र वर्तक बॅडमिंटन प्रशिक्षक यांनी मोलाचे मार्गदर्शन करून, जबाबदारीने मुलांना सहिसलामत आणून पालक वर्गाच्या स्वाधीन केले.
No comments:
Post a Comment