भिवंडी(प्रतिनिधी) दि.२४(स्व.रा.तो) ठाणे जिल्ह्यातील मराठी दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण विभागीय सरचिटणीस श्री किशोर बळीराम पाटील यांनी आपल्या कोकण विभागातील ठाणे,पालघर,रायगड, सिंधुदुर्ग,नवी मुंबई, व पुणे जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधु भगिनींना दैनिक स्वराज्य तोरण च्या माध्यमातून जाहीर आवाहन केले आहे की, कोरोना चा प्रादुर्भाव आता पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढत आहे.मागील २०२० या वर्षात पत्रकारांनी चांगल्या प्रकारे प्रशासनाला सहकार्य केले आहे .अशा माझ्या सर्व पत्रकार बंधु भगिनींनी कोविड योद्धा म्हणून कोरोना प्रतिबंधक लस प्राधान्याने प्रशासनाकडून तपासणी करून घ्यावी.व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.कारण कोरोना चा प्रादुर्भाव आता पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढत चालला असून रुग्णाची संख्याही वाढत आहे.त्यातच भिवंडी शहरातील ज्येष्ट पत्रकार तथा दैनिक सामनाचे प्रतिनिधी रतन कुमार तेजे यांचा कोरोना मुळे दि.२१/०३/२०२१ रोजी मृत्यू झाला. ही पत्रकारिता क्षेत्राला उतरती कळा लागली आहे.मागील वर्षीही अनेक पत्रकारांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.त्यामुळे आता आपण सतर्क राहिले पाहिजे माझा मास माझी सुरक्षा,माझे कुटुंब माझी जबाबदारी, मी जबाबदार या शासनाच्या नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे.आपण सर्वांनी लेटेस्ट बातम्या साठी कितीही धावपळ केली तरी आपल्या साठी काही बिकट प्रसंगी कोणीही धाव घेणारा नसेल. त्यावेळी फक्त आपले कुटुंबच आपल्या सोबत असते.आपण ज्यांच्या बातम्या लावण्यासाठी जीवाचे रान करतो त्या व्यक्तीही आपल्याला साथ देयाळा अशा कठीण परिस्तीतीत येत नाही.म्हणून आपण सर्वांनी वेळीच आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे.सर्व प्रथम आपण कोरोनाची लस घेणे गरजेचे आहे.त्यानंतर आपल्या कुटुंबाची जबाबदारी घ्यावी लागेल.कारण आपल्या साठी ती काळाची गरज आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सध्या कोरोना प्रतिबंधक लस नागरिकांना देण्याचे कार्य राज्यात सुरू आहे तसेच सर्व महानगर पालिका,नगर पालिका, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सुरू आहे . ही लस देताना विविध टप्पे ठरवले असून लाभार्थी प्राधान्य क्रम ही ठरवण्यात आला आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोलाचे योगदान देणारे माझे पत्रकार बंधू भगिनी अद्यापही या प्रतिबंधक लसीपासून वंचित आहेत. त्यांनी आपल्या संपूर्ण चाचण्या तपासून लस घेणे काळाची गरज आहे असे मला वाटते.असे संपादक श्री किशोर बळीराम पाटील यांनी सर्वांना आवाहन केले आहे.....
व ज्या माझ्या पत्रकार बाधवांचा कोरोना मुळे मृत्यू झाला त्यांच्या कुटुबियाना राज्य सरकारने तातडीने अंमलबजावणी करून मदत करावी अशी मागणी ही या प्रसंगी राज्य सरकारला करत आहे....
No comments:
Post a Comment