सफाळे ( हिरालाल लोखंडे ) फन २ लर्न या संस्थेद्वारे जगभरातील विवीध शेत्रातील सीईओ, चेअरमन, डायरेक्टर, अर्थतज्ञ, राजकीय विश्लेषक, डाॅक्टर, इंजिनीअर, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, यांना " हि प्राइड अवॉर्ड " व्दारा सन्मानित करण्यात येते. यावर्षी पत्रकार श्री लक्ष्मण राजे यांना पत्रकारितेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातील, आजवर दिलेल्या योगदानाबद्दल दखल घेऊन मा. रचना भीमरजका - सीईओ यांच्या हस्ते " हि प्राइड अवॉर्ड " देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
फन टू लर्न या संस्थेच्या माध्यमातून आजवर संस्थेच्या सर्वोसर्वा माननीय रचना भीमरजाक सीईओ यांनी एक लाख पंचवीस हजार विद्यार्थीना प्रशिक्षण दिले असून, शैक्षणिक शेत्रातील फन २ लर्न. या एका मोठ्या संस्थेच्या कार्यक्रमात श्री लक्ष्मण राजे पत्रकार यांना सन्मानित करण्यात आल्याबद्दल राजे यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेचे प्रमुख व मान्यवरांचे आभार मानले.
" हि प्राइड अवॉर्ड " प्राप्त केल्याबद्द्ल श्री लक्ष्मण राजे यांचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आणि कला शेत्रातील अनेक मान्यवरांनी तसेच समाजातील सर्व स्तरांवरील लोकांकडून राजे यांचे मन:पुर्वक अभिनंदन करण्यात येऊन , पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.
No comments:
Post a Comment