वाडा ( हिरालाल लोखंडे ) -- दिनांक ४ फेब्रुवारी २०२१ रोजी गाला प्रेसिजन इंजिनीअर प्रायव्हेट लिमिटेड, मुसारने -- वाडा या कंपनीतील १५० कॉन्टॅक्ट कामगारांनी श्रमिक सेनेचा राजीनामा देऊन शिवसेना प्रणित कामगार सेनेचे नेतृत्व स्विकारले.
शिवसेनेचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर शिवसेना प्रणित कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे पदाधिकारी यांनी जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२२ या वर्षासाठी ११,६०० /-₹ (अक्षरी अकरा हजार सहाशे रूपये ) कामगारांना वेतनवाढीचा करार मंजूर करून काॅन्ट्रॅक्ट बेसेवर कामकरणारे ३ कामगार यांना कंपनीत कायम स्वरूपी कामगार करण्यात आले.
कंत्राटी कामगार सेना युनिटच्या फलकांचे अनावरण श्री राजेशभाई शहा शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमात श्री धनंजय पष्टे पालघर विधानसभा संपर्क प्रमुख, श्री तुकाराम बेहरे एच आर कंपनी मॅनेजर, श्री जनार्दन भेरे शिवसेना वरीष्ठ कार्यकर्ते, श्री संतोष पाटील कोंढला उपविभाग प्रमुख, श्री मिलींद चौधरी भारतीय कामगार सेना सचिव, श्री शरद शेळके चारमिनार युनिट अध्यक्ष, संतोष पाटील उपाध्यक्ष, या मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम साजरा झाला, या कार्यक्रमासाठी महेंद्र भोईर गाला कंपनी युनिट अध्यक्ष, सागर दिनकर भारतीय कामगार सेना रा. का. सदस्य, रविंद्र दुर्वे गाला युनिट उपाध्यक्ष, महेश पाटील,
दिनेश वालांजा, ज्ञानेश्वर पाटील, रमेश पाटील युनिट सदस्य याचा या कार्यात मोलाचा सहयोग आहे
No comments:
Post a Comment