सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये विवाह करणाऱ्या जोडप्यास अर्थसहाय्य
पालघर (प्रतिनिधी)दि. 04 : महाराष्ट्रात अनुसूचित जाती (नवबौध्दासह), विमुक्त जाती, भटक्या जमाती (धनगर व वंजारीसह) विशेष मागास प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या मागासवर्गीय कुटूंबातील सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होऊन विवाह करणाऱ्या जोडप्यांना रु.20 हजार इतके अर्थसहाय्य तसेच सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेस प्रत्येक जोडप्यामागे विवाहासाठी रु. 4 हजार देण्याची योजना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविली जात आहे. या योजनेसंबंधी अधिक माहितीकरीता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पालघर आफरीन अपार्टमेंट, बी-वींग, पहिला मजला, रुम नं.106, 107 रेल्वे फाटकाजवळ नवली, पालघर (पू.) येथिल कार्यालयाशी किंवा दूरध्वनी क्रमांक 02525-254277 वर संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment