Friday, January 1, 2021

निवड सूचीसाठी लोककला व पथनाट्य संस्थांनी 21 जानेवारीपर्यंत अर्ज करावेतजिल्हा माहिती अधिकारी राहुल भालेराव यांचे आवाहन

निवड सूचीसाठी लोककला व पथनाट्य संस्थांनी 21 जानेवारीपर्यंत अर्ज करावेत
जिल्हा माहिती अधिकारी राहुल भालेराव यांचे आवाहन
 
पालघर (प्रतिनिधी) दि. 1 लोककला व पथनाट्य सादर करणाऱ्या संस्थांची निवड सूची 20 डिसेंबर रोजी संपुष्टात आली आहे. याबाबत नवीन निवड सूची तयार करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील लोककला व पथनाट्य सादर करणाऱ्या संस्थांनी निवड सूचीसाठी जिल्हा माहिती कार्यालय, दुर्गा केशव बिल्डिंग ,नवली रेल्वे फाटका जवळ पालघर पुर्व 401404 पालघर येथे 21 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन  जिल्हा माहिती अधिकारी राहूल भालेराव  यांनी केले आहे.
निवड सूचीसाठी dgipr.maharashtra.gov.in व www.maharashtra.gov.in या संकेतस्थळा बरोबरच जिल्हा माहिती कार्यालय, पालघर  येथे अर्ज उपलब्ध आहेत. तरी इच्छुक संस्थांनी निवड सूचीसाठीचे अर्ज 21 जानेवारी 2021 पर्यंत सादर करावेत, असे आवाहनही प्र. जिल्हा माहिती अधिकारी राहूल भालेराव  यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...