Friday, December 4, 2020

*'आमचा गाव आमचा विकास' जीपीडीपी आराखडा तयार करणेबाबत तालुकास्तरीय कार्यशाळांचे आयोजन*

*'आमचा गाव आमचा विकास' जीपीडीपी आराखडा तयार करणेबाबत तालुकास्तरीय कार्यशाळांचे आयोजन* 

   (प्रतिनिधी)  'आमंच गाव आमचा विकास' अंतर्गत  ग्रामपंचायत विकास आराखडा सन २०२१-२२ तयार करणेबाबत  दिनांक १८/११/२०२०  ते २२/१२/२०२० या काळात राबवण्यात येणाऱ्या  तालुकास्तरीय प्रशिक्षण  कार्यशाळा गटविकास अधिकारी यांचेमार्फत वसई ,तलासरी, मोखाडा, विक्रमगड ,जव्हार या तालुक्यात संपन्न झाल्या असून पालघर, वाडा ,डहाणू  या तालुक्यांत दिनांक २२ डिसेबंर २०२० पर्यंत आयोजित करण्यात आल्या आहेत.या कार्यशाळांसाठी  टी.ओ.चव्हाण उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप)  जिल्हा परिषद पालघर  हे सनिंयत्रण करीत आहेत.

        पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती स्तरावरील खातेप्रमुख, राज्य शासनाचे (Line Dept.) तालुकास्तरावरील खातेप्रमुख ,शैक्षणिक व सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी  यांचे पंचायत समिती स्तरावरील एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा दि.२२/१२/२०२० ते  दि.२९/१२/२०२० पर्यंत आयोजित केले आहे.  या कार्यशाळेत जीपीडीपी मागोवा, ग्राम सूची, मानव विकास व  शाश्वत विकास आराखडा ,15 व्या वित्त आयोगाच्या निधीचे नियोजन प्रक्रिया, संसाधन गटकार्य महत्व व भूमिका, ग्रामसभेची तयारी, जीपीडीपी प्रक्रिया, ग्रामपंचायत संसाधने, परिस्थिती चे विश्लेषण, लोकसहभाग, गावावर आधारित नियोजन प्रक्रिया, जीपीडीपी च्या माध्यमातून आदर्श गाव संकल्पना राबवणे, यंत्रणांची भूमिका ,कर्तव्य व जबाबदारी, आराखडा निर्मितीप्रक्रिया माहिती, ग्रामपंचायत विकास आराखड्याची अंमलबजावणी व इतर अनेक विषयांवर या कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्हास्तरावरील  प्रविण प्रशिक्षक नागेश्वर संखे,नरेश बरफ, प्रशांत पाटील  यांच्या मार्फत हे प्रशिक्षण दिले जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर  मास्क लावून सामाजिक अंतर ठेवून सभागृहाचे निर्जंतुकीकरण करून या कार्यशाळा संपन्न होत आहेत.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...