कोरोना योद्धांच्या यादीत खासदार हेमंत गोडसे देशात सहावे तर राज्यात पहिल्या स्थानावर.
नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.
‘गव्हर्न आय’ संस्थेच्या सर्वेक्षणातील तपशील; नागरिकांनी दिली गोडसेंनी सर्वाधिक गुणांकन;
नाशिकचा नावलौकीक देशात पोहचविला
नाशिक : कोरोना या महामारीच्या काळात मतदारसंघातील नागरिकांना अधिकाधिक चांगल्या दर्जाची वैद्यकीय सेवा देण्यासाठी तसेच उपचाराविषयीचे उत्तम व्यवस्थापन करण्यासाठी विशेष उपाययोजना करणाऱ्या खासदारांच्या कामाचा गुणात्मक अहवाल दिल्ली येथील ‘गव्हर्न आय’ ( Govern Eye) या संस्थेने आज जाहिर केला आहे. या संस्थेच्या खास आणि विश्वसनीय सर्वेक्षणातून खासदार हेमंत गोडसे यांचा देशात सहावा तर महाराष्ट्रात पहिला क्रमांक आला आहे. खासदार गोडसे यांच्या उत्तम कामगिरीचा लौकीक या निमित्ताने अवघ्या देशभरात पोहचला आहे. कोरोना काळात खा. गोडसे यांनी दिलेल्या उत्तम सेवेची नोंद देशपातळीवर घेतल्याने जिल्हावासियांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोरोनाने देशभरात थैमान घातल्याने २४ मार्च पासून लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. गेल्या आठ महिन्यांपासून आपण सर्वजण कोविड-१९ संकटाशी झुंज देत आहोत. मात्र या काळात लोकप्रतिनिधींनी जनतेसाठी केलेली समाजपयोगी कामे सर्वाधिक लक्षवेधी ठरलेली आहे. याबाबत ‘गव्हर्न आय’ ( Govern Eye) संस्थेच्या प्रशासनाने दिलेली अधिक माहिती अशी की, या संस्थेतर्फे २४ मार्च २०२० ते ३० ऑक्टोबर २०२० या काळात देशभरातील खासदारांनी केलेल्या कामाचा सर्वे करण्यात आला. या कामासाठी संस्थेच्या संकेतस्थळावर विशेष नामांकन प्रक्रिया राबविण्यात आली. त्यातून प्रथम आलेल्या ५० खासदारांची निवड करण्यात आली. त्यानंतर संस्थेच्या विशेष पथकांनी गोपनिय पद्धतीने ५० खासदारांच्या मतदारसंघात जावून प्रत्यक्ष कोविड-१९ झुंज देण्यासाठी उभारलेल्या उपाययोजनांची तसेच कामांची पाहणी करण्यात आली. या ५० खासदारांमधून प्रथम पहिले २५ खासदारांची खास निवड करण्यात आली. त्यानंतर पथकांनी त्या-त्या मतदारसंघातील अधिकारी, लोकप्रतिनिधी, संस्था, सामाजिक संस्था, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिकांशी प्रत्यक्ष संपर्क साधून संवाद साधला. त्यानंतर ‘गव्हर्न आय’ ( Govern Eye) या संस्थेने देशभरातील ‘टॉप १०’ ची घोषणा आज केली आहे. यात खासदार हेमंत गोडसे देशात सहाव्या क्रमांकावर तर राज्यात प्रथम क्रमांकावर आहेत. पहिल्या दहा खासदारांच्या यादीत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा देखील समावेश आहे. या सर्वेक्षणात खासदार गोडसे यांना ६६ पॉइर्ट गुणांकन तर २३ हजार ८५३ गुणांची विशेष पसंती दिली आहे. त्यामुळे नाशिक मतदारसंघात कोविड-१९ काळात नागरिकांना अत्यावश्यक सेवा पुरविण्यात विशेष परिश्रम घेतले असल्याने नाशिकचा नावलौकीक देशात पोहचविला आहे.
No comments:
Post a Comment