*बार्टी मार्फत संघ लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा-२०२० उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना आर्थिक सहाय्य*
पालघर(प्रतिनिधी) दि 4 :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी). पुणे मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याकारिता स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारी व प्रशिक्षणाकरिता (UPSC) मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य देण्यात येते. संघ लोकसेवा आयोगातर्फ नागरी सेवा पूर्व परीक्षा -२०२०. दि. ०४ ऑक्टोबर २०२० रोजी घेण्यात आली. व परीक्षेचा निकाल दि. २३/१०/२०२० रोजी संघ लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे. या वर्षी सन २०२० मध्ये अनुसूचित जातीचे जे विद्यार्थी संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२० उत्तीर्ण झाले आहेत व बार्टीचे पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेकरिता एकावेळी एकरक्कमी रक्कम रु. ५०,०००/- आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. बार्टी मार्फत मुख्य परीक्षेकरिता देण्यात येणाऱ्या आर्थिक सहाय्यासाठी जे विद्यार्थी पात्र आहेत त्यांनी बार्टीच्या संकेतस्थळावर भेट देऊन पात्रतेचे स्वरूप तपासून, अर्ज डाऊनलोड करून व अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून बार्टीच्या अर्जामध्ये असलेल्या ई-मेल वर दि. ०८/१२/२०२० रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत अर्ज पाठविण्यात यावेत असे आवाहन महासंचालक, श्री. धम्मज्योती गजभिये, बार्टी, पुणे यांनी केले आहे.
***********
No comments:
Post a Comment