राष्ट्रवादीच्या पालघर विधानसभा अध्यक्षपदी महेश कोती
पालघर (रवि राठोड) राष्ट्रवादी पक्षाच्या पालघर विधानसभा अध्यक्षपदी महेश कोती यांची निवड करण्यात आली.प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी पालघर जिल्हाध्यक्ष आमदार सुनिल भुसारा यांच्या हस्ते महेश कोती यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. पक्षाचे वअध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाने सोपवलेल्या जबाबदारीचे भान ठेऊन पवारसाहेब यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करील. तसेच राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व जिल्ह्याचे प्रभारी जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी व पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचा मानस पालघर मतदारसंघ विधानसभा अध्यक्ष महेश कोती यांनी व्यक्त केला. यावेळी कार्यक्रमाला बोईसर मतदार संघाचे आमदार राजेश पाटील, पालघर नगरपरिषदच्या नगराध्यक्षा उज्वला काळे आदी मान्यवर उपस्थित होते.दरम्यान सर्व धर्मीयांतील समाज बांधवांना सोबत घेऊन जाणारे व समाजसेवेची नितांत आवड असणारे महेश कोती हे
पालघर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.
No comments:
Post a Comment