वसई येथिल विश्वराजा या मच्छिमार बोटीवर खोल समुद्रात मासेमारी करताना अज्ञात पर्ससीन बोटीकडून जिवघेणा हल्ला
-------
मच्छिमारांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून कायदयाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी व आपापसात सलोख्याने मासेमारी व्यवसाय करावा
--जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ
पालघर (प्रतिनिधी). 29 :- दि.28 डिसेंबर 2020 रोजी संध्याकाळी 6.30 वाजताच्या सुमारास दमण (गुजरात) समारीन 85 सागरी मैल अंतरावर वसई, जि.पालघर येथील 'विश्वराजा' क्र.IND-MH-6-MM-168 या नौकेच्या खलाशावर जीवघेणा हल्ला झाला असल्याची माहिती वसई मच्दिमार सर्वोदय सहकारी संस्था मर्या., वसई या संस्थेचे अध्यक्ष यांनी दिली आहे.
दि.25/12/2020 रोजी वसई येथील विश्वराजा हि नौका मासेमारीसाठी गेली होती. सदरची नौका वसई पासून 85 सागरी मैल अंतरावर आपली मासेमारीची जाळी पाण्यात सोडत असताना दमण येथिल DD/०3/MM/०338 या पर्ससीन मासेमारी नौकेवरील खलाशी यांचेशी मासेमारीच्या जागेबाबत मज्जाव केल्याने इतर 7 ते 8 दमण येथील पर्ससीन नौकाधारक यांचे सोबत भांडण झाले व दमण येथील या मासेमारी नौकेवरील खलाशांनी वसई येथील विश्वराजा या नौकेस चारी बाजूने घेरुन सदरच्या नौकेस ठोकर मारुन बुडवण्याचा प्रयत्न केला व त्याचेवर जिवे मारण्याचा हल्ला केला. या हल्ल्याच्या प्रकारामुळे नौकेचे 4 ते 5 लाखाचे नुकसान झाले असुन बोटीवरील खलाशी श्री मोजेस संज्याव अलिबाग (वय वर्ष 49) हे जखमी झाले आल्याचे वसई मच्छिमार सर्वोदय सहकारी संस्थेच्या अध्यक्षांनी मत्स्यव्यवसाय कार्यालयास कळविले आहे.
मत्स्यव्यवसाय विभागाकडून नौकेची पहाणी करण्यात आली असून बोटीच्या नालेचा व गनवेलच्या भागाचे धडक बसल्याने नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. झालेल्या प्रकाराबाबत नौका मालक श्री.नितिन नाझरेथ बुदुल रा.पाचुबंदर, ता.वसई, जि.पालघर यानी वसई पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. सदरचा गुन्हा पुढील तपासासाठी एलोगेट पोलिस ठाणे, मुंबई येथे वर्ग करण्यात आला आहे.
समुद्रात घडलेल्या या प्रकाराची गंभीर दखल पालघरचे जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांनी घेतली असून मच्छिमारांनी समुद्रात मासेमारी करताना कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे व आपापसात तेढ निर्माण होऊ नये याची दक्षता घ्यावी. कोणीही कायद्याचे उल्लंघन केल्यास सागरी कार्यद्यांतर्गत तसेच फौजदारी कायद्यान्वये संबंधीतावर कडक कारवाई करण्यात येईल अशा सूचना दिल्या आहेत.
याबाबत सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय. ठाणे (पालघर) श्री. आनंद पालव यांनी घडलेल्या प्रकाराबाबत वरीष्ठ कार्यालयास योग्य ती माहीती अवगत करुन दिली असून जिल्हाधिकारी, पालघर यांच्या सूचने प्रमाणे जिल्हातील सर्व सागरी मच्छिमार सहकारी संस्थांना मासेमारी करताना कायदयाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी व आपापसातील सलोख्याने मासेमारी व्यवसाय करावा असे आवाहन केले आहे.
**********
No comments:
Post a Comment