भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीत तपोवन टाकळी परिसरात मोकळ्या मैदानात कचऱ्याच्या ठिकाणी आढळला तरुणीचा मृतदेह :अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल.
नाशिक प्रतिनिधी / तुषार बऱ्हे.
तपोवन टाकळी परिसरातील लक्ष्मीनारायण पुलाकडील रामटेकडी या भागातील मोकळ्या मैदानात वीस ते पंचवीस वर्षे वयोगटातील तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून तरुणीचा मृतदेह रामटेकडी परिसरात कचऱ्याच्या ठिकाणी फेकून देण्यात आला,
या घटनेची माहिती मिळताच उपायुक्त अमोल तांबे, सह आयुक्त दीपाली खन्ना, पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांच्यासह इतर अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला व अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तरुणीचा मृतदेहाजवळ कुठल्याही प्रकारचे ओळखपत्र व कागदपत्रे आढळून आलेली नसल्याने व तिच्या शरीरावरील कपडेही फाटलेले असल्याने मृतदेहाची ओळख पटू शकली नाही 3 ते 4 दिवसापूर्वी खून झाला असावा अशी प्राथमिक माहिती पोलिस निरीक्षक पवार यांनी दिली, दरम्यान ग्रामीण व शहरी भागातील बेपत्ता महिलांची माहिती व तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. या घटनेची पुढील तपास व चौकशी पोलीस निरीक्षक पवार हे करीत आहेत.
No comments:
Post a Comment