Wednesday, December 2, 2020

तारापूर एमआयडीसीत पुन्हा एका कारखान्यात लागली आग.कामगारांची सुरक्षा धोक्यात?

तारापूर एमआयडीसीत पुन्हा एका कारखान्यात लागली आग.कामगारांची सुरक्षा धोक्यात?
बोईसर(प्रतिनिधी):-पालघर तालुक्यातील एमआयडीसी तारापूर क्षेत्रातील  दुसरी घटना ; दोन दिवसांपूर्वी ड्युरा टेक्स कारखान्यात लागली होती आगFC
सतत घडणाऱ्या आगीच्या घटनांमुळे फॅक्टरी इंस्पेक्टर चे दुर्लक्ष कायम  प्लॉट एस 1 (S1 )चॅम्पियन पॅकींग ह्या कंपनीत
सकाळी साडे अकरा च्या दरम्यान घटना घडली
यावेळी कामावर असलेला कामगार त्याचे नाव लक्ष्मण कुमार मंडल असे असून तो वय वर्षे 20 आहे.त्याच्या हातावर भाजल्याअसून दोन बोटे देखील भाजली आहेत.पण कंपनी च्या मॅनेजर श्री नितिन वाणी यांच्याशी  विचारणा केली असता लपवा लपवी करून असे काहीच घडले नाही असे भासवत होते.पण सदर कंपनीतील व्यक्ती बोईसर येथील संजीवनी हॉस्पिटल येथे उपचार घेत असल्याचे आमच्या निदर्शनं आले आम्ही सदर ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष त्याला हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असताना पाहून देखील कंपनी प्रशासन लपवत का होते हा प्रश्न निर्माण झाला आहे.  जखमी झाला असून त्या चा हात भाजला असल्याचे समजते कंपनी मात्र सदरचे प्रशासनाकडून प्रकरण कंपनीप्रशासनाकडून दडपण्याचा प्रयत्न केला गेला आहे. 
कंपनीला कुठले  कंसेंट सुरू आहे .याचा फलक लावण्यात आलेला नाही इतकेच नव्हे तर कंपनीचे नाव देखील प्रथम  दर्शनी भागात लावले गेलेले नाही त्यामुळे या कंपनीत नेमके कोणते उत्पादन घेतले जाते याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही .आग विझविण्यासाठी अग्निश्यामक दलाचे दोन अग्नी बंब घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी पोलिसांना कळविण्यात आले नसल्याने कंपनी प्रशासनाने जाणीवपूर्वक आगीची घटना दाबण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेला दुजोरा मिळत आहे. प्रदूषण नियंत्रण व  मंडळाच्याअधिकार्‍यांपासून देखील माहिती लपवण्याचा प्रयत्न कंपनी प्रशासनाने केला होता. सदर घटना पत्रकारांनी उजेडात आणल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी  उपस्थित झाले होते.
(विद्युत स्पार्कींग होवून खाली पडलेल्या कागदी पुठ्यानी आग घेतली असल्याचे कंपनी प्रशासनाने सांगितले)विचारणा केली असता येथे धागा तयार करण्यात येतो.असे टेक्स टाईल आहे.यात 80 कामगार कामावर होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करून तसेच विद्युत अधिकारी व फेक्ट्री इन्स्पेकटर यांनी पाहणी करून झाल्यावर ही कंपनी मालकाने सुरू करावी अशी मागणी (mpcb)  महारष्ट्र प्रदूषण मंडळ तारापूर यांच्या कडे महाराष्ट्र एकता पत्रकार संघटनेने केली आहे.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...