Wednesday, December 9, 2020

*मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणाचे सत्र एक जानेवारी पासून सुरू* पालघर(प्रतिनिधी) दि 9 : वसई

*मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणाचे सत्र  एक जानेवारी   पासून सुरू*                                               पालघर(प्रतिनिधी) दि 9 :  वसई मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रातून पालघर जिल्ह्याकरिता मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणाचे सत्र दि. १ जानेवारी २०२१ पासून सुरु होणार आहे.             सदर प्रशिक्षण हे सहा महिने मुदतीचे असून  या मध्ये मत्स्यव्यवसाय नौकानयनाची मूलतत्त्वे, सागरी डीझेल इंजिनाची निरनिराळ्या भागाची माहिती व दुरुस्ती, मासेमारीची आधुनिक साधने, प्रात्यक्षिक इत्यादीचे प्रशिक्षण दिले जानार  आहे .           सदर प्रशिक्षणाकरिता दरमहा दारिद्रय रेषेवरील प्रशिक्षणार्थी यांचेकडून रु. ४५०/- व दारिद्रय रेषेखालील प्रशिक्षणार्थी कडून रु. १००/- शुल्क आकारले जाते.

सदर प्रशिक्षणाकरिता उमेदवार किमान ४ थी पास व १८ ते ३५ वयोगटातील असावा. इच्छुक उमेदवाराने अर्ज विहित नमुन्यात, मच्छिमार संस्थेचे शिफारसपत्र, शाळा सोडल्याचा दाखला व एक फोटोसहीत दि. ३१.१२.२०२० पर्यंत मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र वसई येथे वसई मच्छिमार सर्वोदय सहकारी संस्था इमारत पाचुंदर वसई येथे पाठवावेत. अधिक माहिती करिता . अजिंक्य पाटील, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी वसई मो. नं. ९८९२१०३२३५ व   श्रीकांत इंगळे ९४२०१८६८७० यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी वसई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...