*दिग्गज वार्ताहर* बातम्या
दिनांक :- ०९.नव्हेंबर २०२०
वार :- सोमवार
● नोटाबंदीनंतर टॅक्स कलेक्शन वाढलं; निर्मला सीतारामन यांचा दावा; नोटाबंदीचा मुख्य उद्देश मोठ्या कर्जबुडव्यांचं कर्ज माफ करणं हा होता : राहुल गांधी
● जम्मू-काश्मीरच्या मछिल क्षेत्रात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर रविवारी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न; चकमकीत एका लष्करी अधिकाऱ्यासह अन्य तीन जवान शहीद, तीन दहशतवादीही ठार
● संयुक्त राष्ट्राच्या व्यवस्थापकीय आणि अंदाजपत्रकीय प्रश्नांसंबंधीच्या सल्लागार समितीवर भारताच्या विदीशा मैत्र यांची वर्णी; ही समिती संयुक्त राष्ट्राच्या आमसभेशी संबंधित आहे
● अरूणाचलजवळून जाणाऱ्या रेल्वे मार्गाचं काम सुरू ठेवण्याचे जिनपिंग यांचे आदेश; अरुणाचल प्रदेशवर चीनने कायमच केला दावा, भारतानेही तो कायमच नाकारला
● मेट्रो प्रकल्पासाठी जर्मन कंपनीकडून ५४५ दशलक्ष युरोंचं माफक दरात कर्ज; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती; मुख्यमंत्र्यांनी साधला राज्यातील जनतेशी संवाद
● मुंबईत गुलाबी थंडीची चाहूल; चंद्रपूरमध्ये सर्वात कमी १० अंश सेल्सिअस तापमान; पुणे, जळगाव, महाबळेश्वर, मालेगाव, नाशिक, औरंगाबाद, परभणी, अकोला, गोंदिया, नागपूर, वाशिम आणि वर्धा येथील किमान तापमान १५ अंशांखाली
● बायडेन यांचे स्थलांतरितांबाबत सहानुभूतीचे धोरण; अमेरिकेत पाच लाख भारतीयांच्या नागरिकत्वाचा मार्ग सुकर
● भारत व अमेरिका यांच्यातील भागीदारी ही २१ व्या शतकास आकार देणारी ठरेल, दोन्ही देशातील संबंध आणखी मजबूत केले जातील; अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांचे संकेत
● आयपीएल २०२० : हैदराबादला १७ धावांनी हरवत दिल्लीची पहिल्यांदाच फायनलमध्ये धडक; रबाडाची भेदक गोलंदाजी
● बॉलीवूडचा अॅक्शन हिरो टायगर श्रॉफ याने आपल्या आगामी 'गणपत' चित्रपटाची नुकतीच केल�
No comments:
Post a Comment