Sunday, November 1, 2020

*“कोविड-19-करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! जिल्ह्यात 51 हजार 239 जणांनी केली करोनावर मात*

*“कोविड-19-करोना विषाणू” काळजी करू  नका..काळजी घ्या ! जिल्ह्यात 51 हजार 239 जणांनी केली करोनावर मात*
          अलिबाग (जगधिश घरत)**  स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 51 हजार 239 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 123 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve  असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-696, पनवेल ग्रामीण-298, उरण-56, खालापूर-63, कर्जत-13, पेण-65, अलिबाग-49, मुरुड-2, माणगाव-22, तळा-1,  रोहा-36, सुधागड-4, श्रीवर्धन-5, म्हसळा-1, महाड-14, पोलादपूर-4 अशी एकूण 1 हजार 329 झाली आहे.
          कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-22 हजार 367, पनवेल ग्रामीण-6 हजार 529, उरण-1 हजार 905, खालापूर-2 हजार 492, कर्जत- 1 हजार 648, पेण-3 हजार 707, अलिबाग-4 हजार 691, मुरुड-413, माणगाव- 1 हजार 864, तळा-161, रोहा-2 हजार 298, सुधागड-386, श्रीवर्धन-382, म्हसळा-308, महाड- 1 हजार 683, पोलादपूर-405 अशी एकूण 51 हजार 239 आहे.          
             आज दिवसभरातही पनवेल मनपा-82, पनवेल ग्रामीण-24,  खालापूर-7, पेण-2, अलिबाग-7, मुरुड-1,  महाड-1 असे  एकूण 124 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.
          आतापर्यंत पनवेल मनपा-553, पनवेल ग्रामीण-131, उरण-109, खालापूर-117, कर्जत-97, पेण-100, अलिबाग-138, मुरुड-24, माणगाव-37, तळा-9, रोहा-86, सुधागाड-26, श्रीवर्धन-21, म्हसळा-13, महाड-74, पोलादपूर-19 असे एकूण 1 हजार 554 नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.
        आज दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-83, पनवेल ग्रामीण-17,  खालापूर-2, कर्जत-2, पेण-7, अलिबाग-6, माणगाव-1, रोहा-2,  श्रीवर्धन-1, महाड-2, असे एकूण 123 ने वाढ झाली आहे.
           आजच्या दिवसात 2 व्यक्तींची (पनवेल (मनपा)-1, अलिबाग-1)  मृत व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे.
          आतापर्यंत जिल्ह्यातून 2 लाख 03 हजार 039 नागरिकांचे SWAB  तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, तपासणीअंती  रिपोर्ट  मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 130 आहे.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...