लायन्स क्लब ऑफ पालघरचे सामाजिक उपक्रमात भरीव योगदान
पालघर (पंढरीनाथ गायकवाड ) लायन्स क्लब ऑक्टोबर महिन्यात ऑक्टोबर सर्व्हिस वीक साजरा करतो. यावर्षी ‘समर्पण’ या शब्दाला केंद्रस्थानी ठेवून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.
कोविड काळात ढवळे मेमोरियल ट्रस्टच्या इस्पितळात रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित मिळावा म्हणून लिक्विड ऑक्सिजन बॅक प्रकल्प उभारण्यासाठी दहा लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली. सदर प्रकल्प इस्पितळाच्या आवारात तातडीने सुरू करण्यात आला. पाच लाख रुपये मुंबई येथील लायन्स क्लब ऑफ कार्टर रोड यांनी तर पाच लाख रुपये पालघर लायन्स क्लबने दिले.यासाठी पालघर मधील अनेक दानशूर लायन्स आणि इतर मान्यवरांनी आपले आर्थिक योगदान दिले.
लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे हे लक्षात घेऊन देवखोप शेलवली तसेच तारापूर येथील आदिवासी पाड्यातील महिलांना अन्नदान करण्यात आले.
शिरगाव येथील आंनद वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील वयस्क ज्येष्ठांशी सुसंवाद साधत त्यांना वाफयंत्र, चादर तसेच मास्कचे वाटप करण्यात वाटप करण्यात आले.
देवखोप येथील गोशाळेतील जनावरांना एक वेळच्या चाऱ्यासाठी आर्थिक मदत देण्यात आली तसेच तेथे काम करणाऱ्या कामगारांना चादर आणि मास्क वाटप करण्यात आले. पोलिसांना तसेच रिक्षाचालकांना देखील मास्क वाटप करण्यात आले. गरजु महिलांना दोन शिवणयंत्राचे वाटप करण्यात आले.
नेशन फर्स्ट या उपक्रमातर्गत ‘राष्ट्रासाठी आपण काय योगदान देतो’ या विषयावर ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. एनएसएस, एनसीसी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पालघर परिसरात समाजोपयोगी ऑक्टोबर सर्विस वीक राबवण्यासाठी लायन्स क्लबचे अध्यक्ष अतुल दांडेकर, सचिव पराग दोशी, खजिनदार विवेक कुडू आणि इतर पदाधिका-यांनी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.
No comments:
Post a Comment