*कोविडग्रस्त मुलांसाठी मानसिक समुपदेशनासाठी केंद्र शासनाची “संवेदना” टोल फ्री टेलि-कौन्सिलिंग सेवा कार्यान्वित*
अलिबाग,जि.रायगड, दि.09 (जगधिश घरत) :- राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग (एनसीपीसीआर) व इंडिया को-विन ॲक्शन नेटवर्क (आय-सीएएन) यांच्या संयुक्त प्रयत्नातून टोल फ्री “संवेदना”
(SAMVEDNA- Sensitizing Action on Mental Health Vulnerability through Emotional Development and Necessary Acceptance)टेलि-कौन्सिलिंग च्या माध्यमातून मानसिक प्रथमोपचार आणि भावनिक आधार देण्यासाठी नेटवर्क तयार करण्यात आले आहे.1800-121-2830 या टोल फ्री क्रमांकावर सोम ते शनि सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 तसेच दुपारी 3.00 पासून ते रात्रौ 8.00 पर्यंत ही सेवा उपलब्ध आहे. जी मुले कोविड-19 आजारामुळे ग्रस्त आहेत, ज्यांना विलगीकरण कक्षात किंवा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे, यांच्यातील ज्या मुलांना मानसिक आधाराची व समुपदेशनाची आवश्यकता आहे, अशा मुलांच्या उत्तम मानसिक आरोग्यासाठी हा टोल फ्री क्रमांक व त्याद्वारे होणारे समुपदेशन निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. यासाठी काम करणाऱ्या सल्लागारांना प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने तांत्रिक सहाय्य “निमन्स” (NIMHANS) ने केले आहे.
कोविड -19 या संकटाचा सर्वांनी अभूतपूर्व सामना केला आहे आणि कोविड -19 च्या वेगवेगळ्या स्तरावरील सर्वात महत्वाची चिंता म्हणजे लोकसंख्येच्या वेगवेगळ्या घटकांच्या मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम. अशा संकटाच्या वेळी, विशिष्ट गटांच्या, विशेषत: मुलांच्या भावनिक आणि मानसिक गरजा, ज्यांना कोविड-19 पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाल्यामुळे वेगळे केले गेले आहे आणि म्हणूनच त्यांना रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यास भाग पाडले गेले आहे, त्यांना तीव्र पातळीवर तणाव, चिंता याबाबतही तोंड द्यावे लागले आहे. भीती, चिंता, नैराश्य, भूक न लागणे त्याचप्रमाणे ज्या मुलांनी आपले पालक / कुटुंब गमावले आहेत किंवा ज्यांचे पालक / भावंडे, कुटुंबातील सदस्य विलगीकरण केंद्रात किंवा रूग्णालयात आहेत, अशी मुले अत्यंत तणावाखाली असण्याची वा चिंताग्रस्त असण्याची मोठी शक्यता आहे. या मुलांच्या मानसिक आरोग्य स्वस्थ राहण्याच्या दृष्टीने ही सेवा सुरु करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment