Wednesday, October 14, 2020

दि. 14 ऑक्टोबर 2020 16 ते 27 ऑक्टोबर 2020 कालावधीमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मनाई आदेश लागू

दि. 14 ऑक्टोबर 2020 16 ते 27 ऑक्टोबर 2020 कालावधीमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मनाई आदेश लागू पालघर( निलेश भोईर)दि. 14 :- पालघर जिल्ह्यात कोरोना संसर्ग व प्रादुर्भाव आहे. दि.17 ऑक्टोबर 2020 ते दिनांक 25 ऑक्टोबर 2020 या कालावधीत नवरात्रौत्सव साजरा होणार असून दि. 25 ऑक्टोबर 2020 रोजी दसरा सण आहे. तसेच विविध राजकीय पक्ष व संघटना यांचेकडून त्यांचे विविध मागण्यांकरीता मोर्चे, उपोषण, धरणे, आंदोलन व रस्ता रोको करण्याची शक्यता आहे. तरी पालघर जिल्ह्यात सर्वत्र शांतता व सुव्यवस्था तसेच जनजीवन सुरळीत रहावे म्हणून खालील कृत्यास बंदी करण्यासाठी पोलीस अधीक्षक पालघर यांचे कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) अन्वये धार्मिक मिरवणूका व कार्यक्रमांना वगळून दि. 16 ऑक्टोबर 2020 ते दिनांक 27 ऑक्टोबर 2020 या कालावधीमध्ये खालील बाबींसाठी मनाई आदेश लागू करण्यात येणार आहे. 1) शस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, सोटे, बंदुका, सुरे, लाठ्या अथवा काठ्या अथवा शारीरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे, 2) कोणताही क्षारक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, 3) दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, 4) व्यक्तीचे प्रेत किंवा आकृती किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, 5) सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजवणे, 6) ज्यामुळे सभ्यता अगर नीती यास धक्का पोहोचेल अशा किंवा सुरक्षितता धोक्यात येईल अशा प्रकारची भाषणे तत्वे, हावभाव करणे, सोंग आणणे किंवा चित्रे, चिन्हे, फलक किंवा कोणतीही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे किंवा लोकात प्रचार करणे. सदरचा आदेश प्रेतयात्रांना लागू असणार नाही. तसेच सदरचा आदेश केंद्र व राज्य सरकारच्या नोकरीत असलेल्या व त्यांच्या वरीष्ठांच्या आदेशानुसार अगर कर्तव्य किंवा अपंगत्त्वामुळे लाठी, काठी बाळगणे आवश्यक आहे अशांना लागू असणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी, पालघर डॉ. किरण महाजन यांनी अधिसुचनेद्वारे कळविले आहे. ********

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...