*दिग्गज वार्ताहर*
बातम्या
दिनांक :-१५.सप्टेंबर २०२०
वार :- मंगळवार
● देशांतर्गत बाजारपेठांमध्ये कांद्याचे भाव वाढल्याचे सांगत केंद्र सरकारची कांदा निर्यातीवर बंदी! कांदा उत्पादक शेतकऱयांना मोठा फटका बसण्याची शक्यता
● लॉकडाऊनच्या काळातील स्थलांतरित मजुरांच्या बळींबाबत केंद्र अनभिज्ञ; मृतांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई न दिल्याचेही स्पष्ट
● देशात समलैंगिक विवाहांना मान्यता देणार नाही; केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात स्पष्ट केली भूमिका
● जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिदला १० दिवसांची पोलीस कोठडी; रात्री उशिरा उमर खालिदला करण्यात आली होती अटक
● जेडीयूचे नेते हरिवंश सिंह यांची पुन्हा एकदा राज्यसभेच्या उपसभापती निवड; पंतप्रधान मोदींसह सर्वच नेत्यांनी केलं हरिवंश यांचं अभिनंदन
● राज्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा, सर्व जिल्ह्यांनी आगाऊ नोंदणी करावी; अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांचे आवाहन
● राज्यात दिवसभरात १७ हजार ६६ नवे कोरोनाबाधित, २५७ मृत्यू; १५ हजार ७८९ जणांना दिला डिस्चार्ज; एकूण संख्या १० लाख ७७ हजार ३७४ वर पोहचली
● अमेरिकेत मायक्रोसॉफ्टला मागे टाकून ओरॅकलने मिळवले टिकटॉक; त्यामुळे हे अॅप अमेरिकन नागरिकांना यापुढेही वापरता येणार
● यूएस ओपन २०२० : ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिमची अलेक्झांडर झेवरेव्हवर मात; सहा वर्षात पहिल्यांदाच युएस ओपन स्पर्धेला मिळाला नवा विजेता
● बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणीचा सिनेमा 'इंदु की जवानी'चं टीजर रिलीज, 16 सप्टेंंबरला 'सरप्राइज'
No comments:
Post a Comment