Tuesday, September 1, 2020

दिनांक:-०२. सप्टेंबर २०२०वार :- बुधवार

"दिग्गज वार्ताहर" आजच्या  बातम्या
दिनांक:-०२. सप्टेंबर २०२०
वार    :- बुधवार

● जेईई मुख्य परीक्षेला पहिल्या दिवशी ६० टक्के विद्यार्थी उपस्थित; या परीक्षेसाठी ८ लाख ५८ हजार विद्यार्थ्यांनी केली होती नोंदणी; ६६० केंद्रांतून सहा दिवस चालणार परीक्षा 

● एलओसीवरील रामपूर सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा हस्तगत; पाच एके-४७ रायफल्स, सहा पिस्तुलं, २३ ग्रेनेडसह हजाराहून अधिक काडकतुसं जप्त


● सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआय अधिकाऱ्यांचा मोठा खुलासा; हत्या झाल्याचे पुरावे नाहीत; सध्या सीबीआयकडून सुरू आहे तपास

● तरूणांना भाषण नाही, नोकरी पाहिजे; एसएससी व रेल्वे परीक्षांच्या मुद्यावरून प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा

● राज्याने पार केला ८ लाख कोरोना रुग्णांचा टप्पा; दिवसभरात  १५ हजार ७६५ नवीन रुग्णांची भर; २४ तासांत ३२० कोरोनाबळी

● पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ३० सप्टेंबरपर्यंत भाविकांसाठी बंदच राहणार; मंदिर व्यवस्थापनाचा निर्णय 

● खोकला सोडा, कोरोनावर जोक करणंही विद्यार्थ्यांना पडणार महागात; ब्रिटनमधील शाळांचं कडक धोरण; मुद्दाम खोकलणं येणार अंगलट; विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाणार 

● कोरोनाच्या धर्तीवर खेळवल्या जाणाऱ्या आयपीएलसाठी बीसीसीआय तब्बल २० हजार कोरोना चाचण्या करणार; यासाठी सुमारे १० कोटींचा खर्च अपेक्षित

● बिअर ग्रील्स, अभिनेता अक्षय कुमारचा सहभाग असलेल्या 'इंटू द वाईल्ड विद बिअर ग्रील्स' कार्यक्रमाचा टिझर प्रदर्शित; टिझरला अक्षयच्या चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...