Tuesday, September 15, 2020

आज कृषीमंत्री ना. दादाजी भुसे पालघर येथे जात असतांना आंबोली येथे थांबून पाहणी केली.पालघर (प्रतिनिधी)

*आज कृषीमंत्री ना. दादाजी भुसे पालघर येथे जात असतांना आंबोली येथे थांबून पाहणी केली.पालघर (प्रतिनिधी)*

आज कृषिमंत्री ना.दादाजी भुसे पालघर दौर्यावर जात असताना   डहाणू  तालुक्यातील आंबोली येथे बांबू पासून वस्तू बनवणाऱ्या महिला मंडळ यांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन भेट दिली .या गावात काही क्षण थांबले.
त्यांना येथे एक ज्येष्ठ महिला भगिनी रानभाज्या विक्री करतांना पाहिली. अथक संघर्ष करत जीवन व्यतीत करणारी या माऊलीशी मंत्रीमहोदयांनी आस्थेने संवाद साधुन त्यांच्या जीवनातील गतीविधींबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
तसेच, रस्त्यालगतच्या *मोखाडा व विक्रमगढ* तालुक्यातील ग्रामीण भागात, काही महिला भगिनी ‘बांबू’ हस्तकलेतून विविध शोभिवंत वस्तू बनवताना त्यांना दिसले. त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधून या हस्तकलेविषयी त्यांनी अधिक जाणून घेतले. 
‘बांबू’ हस्तकलेपासून या माता भगिनी स्वयंरोजगार निर्मिती करून आपल्या दैनंदिन जीवनाचा कार्यभार सांभाळतात. सुमारे ३५० हून अधिक वस्तू बांबू हस्तकलेतून बनविण्यात येतात. हे दृश्य बघुन ना.दादाजी भुसे यांना या माय माउलींच्या अविरत कार्तुत्त्वाचा गर्व वाटला. 

*त्यांच्या या अथक संघर्षाला माझा सलाम!*
------ *कृषीमंत्री दादाजी भुसे*

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...