*अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना सन 2020-21 वर्षासाठी खावटी अनुदान योजना लागू*
पालघर (निलेश भोईर)दि 28 : कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावामुळे राज्यात उद्भवलेल्या अर्थिक संकटाच्या काळात अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजनेचे सन 2020-21 या वर्षासाठी पुर्नज्जीवन राज्य शासनाने आदिवासी विकास विभागाच्या दिनांक 09 सप्टेंबर 2020 च्या शासन निर्णयान्वये केले आहे . उक्त योजने अंतर्गत अनुसूचित जमातीच्या गरजू कुटुंबांना रू . 4000 / - ( अक्षरी रक्कम रुपये चार हजार ) प्रती कुटुंब लाभ ज्यामध्ये रू . 2000 / - ( अक्षरी दोन हजार मात्र ) अन्नधान्य वस्तु स्वरूपात वाटप आणि रु . 2000 / - ( अक्षरी दोन हजार मात्र ) रक्कम त्यांच्या बॅक / डाक खात्यात वितरीत करण्यात येणार आहे . खात्यात वितरित करावयाच्या रकमेसाठी त्या अनुसूचित जमातीच्या कुटुंबातील महिलेचे बॅक खाते असणे क्रमप्राप्त आहे . योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामस्तरावर खालील पात्रता धारक अनुसूचित जमाती कुटुंबाच्या याद्या तयार करण्यात येणार आहेत ,
दि . 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीत मनरेगावर एक दिवस कार्यरत असलेले आदिवासी मजूर , आदिम जमातीची सर्व कुटुंबे
, पारधी समाजाची सर्व कुटुंबे
, . जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार प्रकल्प अधिकारी यांनी निश्चित केलेली गरजू आदिवासी कुटुंबे ज्या मध्ये परितक्ता , घटस्फोटीत महिला , विधवा , भूमिहिन शेतमजूर , अपंग व्यक्ती असलेले कुटुंब , अनाथ मुलांचे संगोपन करणारे कुटुंब
, वैयक्तिक वनहक्क प्राप्त झालेली वनहक्कधारक कुटुंबे वरील प्रमाणे याद्या तयार करण्यासाठी सबंधित ग्रामपंचायत स्तरावर प्रकल्प कार्यालयाकडुन खालीलप्रमाणे 5 सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे . सदर समिती मध्ये
तलाठी, ग्रामसेवक, डाकसेवक
, कृषि सेवक
, मुख्याध्यापक / शिक्षक ( आश्रमशाळा / जि.प. ( उपक्रमशिल शिक्षक ) यांचा समावेश आहे.
शासन स्तरावरून अर्जाचा नमुना प्राप्त झाल्यानंतर सदर अर्ज वरील प्रमाणे समितीकडुन शासकिय निकषात बसणाऱ्या लाभार्थ्यांची छाननी करून लाभार्थी याद्या अंतिम करण्यात येतील . खावटी अनुदान योजना गरजू अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना सहाय्य करण्यासाठी शासनाचा महत्त्वकांक्षी उपक्रम असुन सद्धस्थितीत काही संघटना / व्यक्तिकडुन पैसे घेवून अर्जाचे वितरण लाभार्थ्यांना करण्यात येत असल्याची बेकायदेशिर बाब निदर्शनास आली आहे . गरजू अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना खावटी अनुदान योजनेचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने डहाणू प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी तसेच प्रकल्प कार्यालयाच्या अधीनस्त तालुक्याचे तहसिलदार तसेच गट विकास अधिकारी यांचे प्रयत्न सुरू आहेत तरी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी अधिक माहितीसाठी वरील ग्रामस्तरावरील समितीशी संपर्क साधावा इतर कोणत्याही बाबीवर विश्वास ठेवू नये .
No comments:
Post a Comment