*जिल्हा परिषदे मध्ये घेतली दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा*
पालघर (प्रतिनिधी)आज २१ मे रोजी स्व. राजीव गांधी यांच्या स्मृती दिना निमित्त दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची प्रतिज्ञा जिल्हा परिषद पालघर येथे घेण्यात आली.
"आम्ही भारताचे नागरिक , आपल्या देशाच्या अहिंसा व सहिष्णुतेच्या परंपरे विषयी दृढ निष्ठा बाळगून याद्वारे सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा आमच्या सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याची गांभीर्य पूर्वक प्रतिज्ञा करतो की आम्ही सर्व मानवबंधूंमध्ये शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवू व वर्धिष्णू करू, तसेच मानवी जीवित आणि मूल्ये धोक्यात आणणाऱ्या विघटनकारी शक्तीचा प्रतिकार करू."
अशा प्रकारची शपथ घेण्यात आली.
यावेळी अति.मु.का.अ.चंद्रकांत वाघमारे, उप.मु.का.अ.(सा.) संघरत्ना खिल्लारे,उप.मु.का.अ.(ग्रा.पं) टी.ओ.चव्हाण, उप.मु.का.अ. (पावस्व) तुषार माळी, कार्यकारी अभियंता ग्रा.पा.पु. गंगाधर निवडुंगे, कार्यकारी अभियंता बांधकाम खराडे, तसेच जिल्हा परिषदेचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment