*आकर्षक व पसंतीच्या वाहन नोंदणी चिन्हासाठी २५ मे २०२१ पर्यंत अर्ज करावे.*
पालघर (प्रतिनिधी)दि. २२ : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, वसई येथे परिवहन संवर्गाकरिता (ऑटोरिक्षा वगळून) वाहन नोंदणीकरिता सध्या BM ही मालिका सुरु आहे. सदर मालिका दि. २४.०५.२०२१ पर्यंत संपण्याची शक्यता असल्याने परिवहन संवर्गाकरिता (ऑटोरिक्षा वगळता) वाहन नोंदणीसाठी CB ही मालिका सुरू करण्यात येणार आहे.
सदर नवीन मालिकेतील आकर्षक वा पसंतीच्या वाहन नोंदणी चिन्हासाठी दि.२५.०५.२०२१ रोजी दुपारी १.०० वाजेपर्यंत सर्व संबंधितांनी अर्ज सादर करावेत. आकर्षक व पसंती क्रमांकाचे विहित शुल्क आकारून नोंदणी चिन्ह आरक्षित करण्यात येईल. जर एखाद्या नोंदणी चिन्हासाठी एकापेक्षा जास्त अर्जदारांनी अर्ज केले तर दुसऱ्या दिवशी संबंधित अर्जदारांनी आकर्षक व पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या शासकीय शुल्कापोटी पाकीट बंद स्वरूपातील धनाकर्ष या कार्यालयास जमा करावेत. दुसऱ्या दिवशी ४ वाजता सादर केलेले लिफाफे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे समोर उघडले जातील. ज्याचा सर्वाधिक रकमेचा धनाकर्ष असेल त्यांना नोंदणी चिन्ह देण्याची कारवाई करण्यात येईल.
*******
No comments:
Post a Comment