Sunday, March 14, 2021

खुनातील प्रत्यक्ष साक्षीदारास पोलीस संरक्षण मिळणार का ?कि, वराती मागून घोडे !

खुनातील प्रत्यक्ष साक्षीदारास पोलीस संरक्षण मिळणार का ?
कि, वराती मागून घोडे !सफाळे ( हिरालाल लोखंडे )सन १९१८ साली मौजे, कामण तालुका वसई येथे यादव म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आलेला. त्यावेळी या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार त्यांचे बंधू श्री गंगाधर म्हात्रे हे आहेत. त्यांच्या साक्षेवरून ख-या आरोपींचा शोध लावून हा खटला अंतिम टप्यात आला आहे. या साठी गंगाधर म्हात्रे -- आदिवासी सेवक महाराष्ट्र शासन यांना ३२ वर्ष एकाकी लढा द्यावा लागत आहे. यामध्ये आदिवासी बांधवांचा नाहक बळी गेला, तर म्हात्रे यांच्यावर भ्याडपणे प्राणघातक हल्लेही करण्यात आले. म्हात्रे यातुन वाचले, पण त्यांच्यावर अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया कराव्या लागल्यानंतर आता ते बरे आहेत. या घटने नंतर म्हात्रे यांना विनामुल्य पोलीस संरक्षण देण्यात आलेले असताना,  त्यांना कोणत्याही पूर्वसूचना न देता, १७ मे २०१७ ला संरक्षण काढून घेण्यात आले. म्हात्रे यांनी मा, उच्च न्यायालयात दाद मागितली असता, मा, न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना एप्रिल २०१८  ला पुन्हा संरक्षण देण्यात आलेले, परंतु डिसेंबर २०१८ ला दिलेले संरक्षण परत काढून घेण्यात आले. 
   श्री गंगाधर म्हात्रे यांनी पुन्हा एकदा दिनांक डिसेंबर २०२० ला मा. मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य, सर्व मा. मंत्री  महोदय, मा. जिल्हा अधिकारी साहेब, मा. पोलीस आयुक्त, सी. आय. डी. यांच्या कडे संरक्षणासाठी मागणी केली असताना, डाॅ. किरण महाजन मा. अप्पर जिल्हाधिकारी - दंडाधिकारी पालघर. यांनी १२ जानेवारी २०२१ रोजी पुढील कारवाई साठी  सक्षम अधिकारी यांना सुचना दिलेल्या. तसेच मा. केतकी खोत उप अधिक्षक सी. आय. डी. कोकण भवन ( सी. बी. डी.) यांनी हि, मा. पोलीस आयुक्त पालघर यांना योग्य त्या सुचना दिलेल्या असताना,सुचना देऊन तिन महिन्याचा कालावधी उलटून  गेलेला आहे, तरीही म्हात्रे यांना कोणत्याही प्रकारे संरक्षण देण्यात आलेले नाही किंवा संरक्षण देण्यासाठी कोणत्याही हालचाली दिसुन येत नाही. यावर म्हात्रे स्वतः सांगतात, यादव म्हात्रे खून खटला  अंतिम टप्यात आलेला आहे.मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याने मला संपविण्यासाठी विरोधक प्रयत्न करतील, कारण यापुर्वी माझ्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे. आता कदाचित ते माझा अपघात घडवून आणतील किंवा गुंड प्रवृत्तीच्या आडदांड व्यक्तीन कडुन मला ठार मारण्याचा प्रयत्न ही करतील.

1 comment:

  1. अन्यायाला वाचा फोडणारी बातमी.खर तर मंत्र्यांना संरक्षण देण्यापेक्षा समाजासाठी काम करणाऱ्या अशा समाजसेवकांना संरक्षण मिळाले पाहिजे.दिग्गज वार्ताहर अशाप्रकारे अन्यायाला वाचा फोडते म्हणून त्यांचे विशेष आभार.

    ReplyDelete

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...