पालघर ( हिरालाल लोखंडे )वाडा तालुक्यातील शेल्टे गावाच्या शेजारी असलेल्या दगड खाणीत अनिल डोकफोडे वय वर्ष ३५ याचा मृतदेह आढळून आला असताना, खदान मालकाने मृतदेहा बद्दल पोलीसांना पूर्वसूचना न देता, परस्पर अनिलचा मृतदेह ट्रॅक्टर मधे भरुन त्याच्या घरी नेऊन टाकला असताना, नातेवाईक यांनी मृतदेहास अग्नि देण्याची तयारीत असताना, वाडा पोलीस स्टेशनला माहिती मिळताच प्रभारी अधिकारी कर्मचारी यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कारवाई साठी पंचनामा करून, मृतदेह पोस्टमार्टेम साठी वाडा ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आला आहे. अनिलच्या नातेवाईक यांनी हा घातपात असल्याचा संशय वर्तविला आहे मार्च २०२१ रोजी संध्याकाळी अनिल कामावरून घरी परत आल्यानंतर त्यांने रात्रीचे जेवण करुन झाले असताना कोणाचा तरी फोन आला असताना घरा बाहेर निघून गेला असता, रात्री परत आला नाही म्हणून रात्रीच शोध घेतला असताना मिळून आला नाही. परंतु सकाळी त्याचा मृतदेह खदान मालकाने नातेवाईकांना आणुन दिला. सदर घटनेचा पुढल तपास वाडा पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द
* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द* पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...
-
*नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी माैजे ऊसर येथील जागा हस्तांतरित* *नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी पालकमंत्री कु.अादिती तटकरेंच...
-
वाहतूक नियंत्रण अधिसूचना यांना करण्यात येत आहे. पालघर :-ज्याअर्थी उपोद्घातातील अ.क्र.१ वर अंतर्भुत असलेल्या पत्रान्वये पालघर पोलीस ठाण्याचे ...
-
*स्व. हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कुंदन भाऊ संख्ये यांनी आयोजित केलेल्या रक्तदान...
No comments:
Post a Comment