Monday, March 15, 2021

वनविभाग जव्हार -- परिक्षेत्र वाडा, अवैधरीत्या - खैर - साग तस्कर - दगड खदान धारकांवर कारवाई.

वनविभाग जव्हार -- परिक्षेत्र वाडा, अवैधरीत्या -  खैर - साग तस्कर - दगड खदान धारकांवर कारवाई. हिरालाल लोखंडे ) जव्हार विभागातील तालुका वाडा  परिक्षेत्रात अनेक दिवसापासून खैर / साग तस्कर, अवैध रित्या वनविभागातील गौणखणिज यांची चोरी व चोरटी वाहतुकीचा बोलबाला होत असताना, गेल्या एक ते दीड महिन्याच्या कालावधीत श्री, एच, व्ही, सापळे वन शेत्रपाल वाडा परिक्षेत्र ( पश्चिम ) यांनी वरिष्ठांचे आदेश व हाताखाली असलेले वनकर्मचारी यांच्याशी विचारविनिमय करून, आपण करीत असलेल्या कारवाई बद्दलची खबर, कानोकानी कोणासही लागु न देता, ठिक -सापळे रचून किंवा अचानक पणे पाठलाग करून कारवाई करून खैर चोरांच्या गाड्या पकडल्या.वेळप्रसंगी वन शेत्रावरील गौणखणिज चोरावर योग्य वेळी कारवाई केली आहे. यामध्ये आपण यशस्वी झाले.         एक महिंद्रा स्काॅपिओ -० १, क्वालिस - ०१, टाटा पिक अप - ०२ , टाटा ए सी ई -०१, पोकलेन - ०१, ट्रक अथवा - ०२,   अशी एकूण ०८ वाहने, विविध गुन्हे नोंदवून जप्त केलेली आहेत. खैर  प्रजातीच्या वनोपज जप्त केलेल्या मालाची अंदाजे किंमत रूपये २,००००० /- (अक्षरी दोन लाख रूपये इतकी आहे. तर जप्त केलेल्या ०८ वाहनांची किंमत अंदाजे रूपये २,००,०००००/- (अक्षरी दोन कोटी ) च्या आसपास असावी असे सांगितले जात आहे. 
   वनविभागा तर्फे केल्या जाणार्‍या विविध प्रकारच्या कारवायांन मुळे, खैर तस्कर व वनविभाग हद्दीत अवैध कामे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. तर अशा प्रकारे विविध ठिकाणी वेळ - काळ  यांचा विचार न करता किंवा कोणाचीही भीडभाड - मुलाहिजा न ठेवता, धरठोक पणे ( प्रामाणिकपणे ) होणार्‍या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांन कडुन विविध स्तरावरून वनविभाग कर्मचारी यांचे कौतुक होत आहे. 
  सदर कारवाई श्री एच, जी, धुमाळ साहेब उपवन संरक्षक जव्हार .श्री, ए, एम, सोनवणे सहा, वन संरक्षक ( वनीकरण व वन्यजीव ) वाडा, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास श्री एच, व्हि, सापळे वन शेत्रपाल वाडा ( पश्चिम ) श्री जाधव, श्री कांबळे, वनपाल. श्री वारगुडे, निकम, केंद्रे, नफाद, ठाकरे, कदम, शिंदे, सोनवणे, मोहिते, सपकाळ, घुटे, गावड, कचरे, सर्व वनरक्षक जरी असले तरी ते जिवाची बाजी लावून वनसंपदा चोरणाऱ्याना अद्दल घडविणारे शूर सैनिक ( हत्यार नसलेले ) आहेत, त्यांना शतशः धन्यवाद.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...