Saturday, March 20, 2021

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा केंद्रावर मनाई आदेश लागु

*महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा केंद्रावर मनाई आदेश लागु*.
पालघर दि. 19 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने राज्यभरात राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020, रविवार, दि.21/03/2021 रोजी घेण्यात येत असून सदरची परीक्षा पालघर तालुक्यातील एकूण 05 उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे  सदरच्या परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 144 (1)(2)(3) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग यांचेमार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यं सेवा पूर्व परीक्षा 2020 च्या  परिक्षा पुढील उपकेंद्रावर घेण्यात येणार आहेत    1) ट्विंकल  स्टार हायस्कूल, चार रस्ता, पालघर, ता.जि.पालघर 2) श्री.स तु कदम हायस्कूल (जिवन विकास), बोईसर-पालघर रोड, ता.जि.पालघर, 3) सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, खारेकुरण रोड, पालघर, ता.जि.पालघर part-A,4   ,            4) सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, खारेकुरण रोड, पालघर, ता.जि.पालघर Part-B, 5) सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, खारेकुरण रोड, पालघर, ता.जि.पालघर Part-C या परिक्षा केंद्रावर परीक्षा देणारे विद्यार्थी व परीक्षाविषयक कामकाज पाहणेकरिता नेमलेले अधिकारी/कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, तसेच अंध व अपंग परिक्षार्थी यांचे बरोबर आलेले नातेवाईकांखेरीज बेकायदेशिर जमावास परिक्षा केंद्राच्या सभोवताली 100 मीटर परिसरात रविवार दिनांक 21/03/2021 रोजी 00.01 ते 24.00 या कालावधीकरीता प्रवेश करण्यास मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...