*कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व शासकीय यंत्रनानी समन्वयाने काम करावे*
पालघर दि.. २०:-महसूल विभाग,पोलिसयंत्रणा, आरोग्य विभाग,महानगरपालिका नगरपालीका
व इतर शासकीय यंत्रणानी समन्वयानी काम करुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखावा असे निर्देश कृषी,माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी शासकीय यंत्रनांना दिले. व्हिडिओ कॉन्फरन्स (V.C) च्या माध्यमातून पालकमंत्री श्री. भुसे यांनी कोव्हिड १९ चा आढावा घेतला त्यावेळी श्री. भुसे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिध्दाराम सालीमठ, पोलिस अधिक्षक दत्तात्रेय शिदे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ किरण महाजन,तसेच प्रांतधिकारी ,तहसिलदार उपस्थित होते.
मा.मुख्यंमत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली 'मी जबाबदार,
"मोहिम जिल्हयामध्ये प्रभावी पणे राबवावी. तसेच जिल्हयामध्ये लसीकरणाचे उदिष्ट. पुर्ण करुन कोव्हिड १९ चा प्रादुर्भाव रोखावा असेही निर्देश पालकमंत्री श्री. भुसे यांनी शासकीय यंत्रनांना दिले. ज्याना कोव्हिडचा प्रादुर्भाव झाला असेल अशा व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरणा मध्ये ठेवावे .ज्या व्यकतीच्या घरी अलगीकरणासाठी आवश्यक असलेल्या सुविधा आहेत. त्यांना घरीच अलगीकरण करण्याची परवानगी दयावी. ज्या व्यक्तीची कोरोना चाचणी
करण्यात आली आहे. अशा व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी फिरणार नाहीत याची दक्षता
पोलिस यंत्रनांनी घ्यावी असेहि निर्देश पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
***
No comments:
Post a Comment