Monday, January 11, 2021

सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र तर्फे मोफत वह्या वाटप व दुर्ग संवर्धन मोहीम यशस्वी हिरालाल लोखंडे सफाळे -प्रतिनिधी

सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र तर्फे मोफत वह्या वाटप व दुर्ग संवर्धन मोहीम यशस्वी 
हिरालाल लोखंडे सफाळे -प्रतिनिधी
 सफाळे सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र पुरस्कृत   सह्याद्री विध्यार्थी अकादमी आयोजित एक पाऊल शिक्षणाकडे ह्या उपक्रम अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदुळवाडी ता. जी. पालघर  येथे दिनांक दहा जानेवारी २०२१ रोजी इयत्ता पहिली ते आठवी च्या विध्यार्थी यांना मोफत वह्या वाटप कार्यक्रम करण्यात आला. तसेच सह्याद्री प्रतिष्ठान मुंबई व पालघर यांच्या संयुक्त विध्यमाने किल्ले तांदुळवाडी किल्यावर.दुर्ग संवर्धन मोहीम यशस्वी पार पडली. 
    मोहिमेत सुचना फलक लावण्यात आले, गडावरील पाण्याच्या टाकतील कचरा -दगड -माती आदि काढण्यात येऊन गडावरील कचरा जमा करुन त्यांची विल्हेवाट लावण्यात आली या कामी श्री, विजय भिसे ( डी.एफ.ओ.डहाणू ) श्री, रमेश चावरे -सरपंच तांदुळवाडी, श्री सुजित पाटील -पोलिस पाटील तांदुळवाडी श्री प्रसाद भावे -समाजिक कार्यकर्ते श्री नरेश वाघेला - फॉरेस्टर श्री अनिल बरड ग्रा, प, सदस्य होमगार्ड कु वैशाली बरड व मान्यवरांचे  आभार मान्यात आले तर गांवक-यांच्या वतीने सरपंच महोदय यांनी सह्याद्री प्रतिष्ठानचे पदाधिकारी श्री, गणेश रघुवीर श्री, अतुल पडवळ यांच्या कामाचे कौतुक करून त्यांचे व प्रतिष्ठानचे  पदाधिकारी यांचे आभार मानले

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...