Friday, January 1, 2021

ग्रुप ग्रामपंचायत नंडोरे यांनी कोविड योद्धा पुरस्कार वितरण केले.

ग्रुप ग्रामपंचायत नंडोरे यांनी कोविड योद्धा पुरस्कार वितरण केले.
पालघर (प्रतिनिधी)ग्रुप ग्रामपंचायत नंडोरे देवखोप यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 1 जानेवारी 2021 रोजी स्वातंत्र्य सेनानी सखाराम भिकाजी पाटील सभागृहात कोविड योद्धा म्हणून  सामाजिक कार्यकर्ते. 
आरोग्य सेविका.आशा वर्कर. अंगणवाडी ताई. मदतनीस.शिक्षक अश्या जवळपास 30मान्यवरांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य सौ अनुश्री पाटील अध्यक्ष म्हणून पंचायत समिती सदस्य सौ सीमा पाटील   माजी पं स सदस्य श्री विजय तरे ,सरपंच श्री रमेश बसवत ,उपसरपंच श्री दिनेश कान्हात ,माजी सरपंच आणि कोविड योद्धा म्हणून श्री केतन पाटील सर्व ग्रा, पं सदस्य  उपस्थित होते
या वेळी सामाजिक कार्यकर्ते श्री केतन पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला कोरोना काळात त्यांनी गरजवंत बांधवापर्यंत अन्नधान्य  विविध संस्था आणि व्यक्ती मार्फत पोचवण्याचे काम  असो किंवा वेळोवेळी प्रशासनाला मदत पोलीस महसूल खात्याच्या संपर्कात सतत राहून गावा प्रति सजग राहून  आपले उत्तरदायित्व पार पाडले होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  कोविड योद्धा श्री नितिन थालेकर यांनी केले तर ग्रामविकास अधिकारी निलेश देवरे यांनी आभार प्रदर्शन केले

No comments:

Post a Comment

ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द

* *ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन कार्यक्रम रद्द*           पालघर दि. 29 (जिमाका) :- जिल्हाधिकारी स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचे पह...