दिग्गज वार्ताहर आजच्या बातम्या
दिनांक :-०२.०१.२०२१
वार। :- शनिवार
१) भारत-ब्रिटन विमानसेवा
८ जानेवारीपासून सुरु होणार; विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांचे ट्विट
२) देशात नव्या कोरोनाच्या स्ट्रेनमुळे संक्रमितांची संख्या वाढतेय; बंगळुरूत 10 अन् दिल्लीत 08 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
३) पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी प्रवीण राऊतांची 72 कोटींची संपत्ती जप्त; आर्थिक गुन्हे शाखेची धरपकड सुरू
४) जगभरातील दहशतवादी संघटनांची चार अब्ज रुपयांची आर्थिक रसद तोडली; अमेरिकेची कारवाई
५) वाढीव वीज बिलांवरुन मनसे आक्रमक! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर बॅनर लावून राज्य सरकारवर केली टीका
६) आठवडय़ात उधारी द्या, नाहीतर चहानाश्ता बंद; मंत्रालय उपाहारगृहाचा अधिकारी, कार्यालयांना इशारा
७) दिलासादायक वृत्त ! राज्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्यामध्ये दिवसदिवस वाढ, दिवसभरात 4 हजार 279 जण कोरोनामुक्त
८) खुशखबर ! अॅमेझॉनचा 50 इंची 4K स्मार्ट टीव्ही फक्त 29 हजार 999 रुपयांत उपलब्ध
९) करण जोहरच्या 'मुंबईकर' चित्रपटचा फर्स्टलुक प्रदर्शित, सोशल मीडियात जोरदार चर्चा
१०) न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनची कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी झेप; ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ व भारताचा कर्णधार विराट कोहलीला टाकले मागे
No comments:
Post a Comment